Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३६
श्री.
१७२३ श्रावण शुद्ध ११
पौ छ ८ जावल सन इसने मयातैन, भाद्रपद मु।। कोपरगांव.
शेवेसी लक्ष्मण आपाजी सां नमस्कार विज्ञापना तागायत छ ९ रारवर पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. ठाणसिंग याजबरोबर पत्रें, किल्यांत बाहेरील झाडून मंडळी लोकसुधां आंत आल्याचें वर्तमान लिहून पा, त्यावरून सविस्तर कळलेंच असेल. महत्कार्य जाहलें ! किल्ला हस्तगत होणें दुरापास्त होतें. परंतु आपले पुण्यप्रतापें कार्य सिध्धी जाहली. अलीकडील वर्तमानः जोतिबा निंबाळकर याजकडेस मोठाच अपराध, याजकरितां पायांत बेड्या घालून कैद केला. व ह्माकोजी ना नांदगीकर व गोंदजी व दादजी ना पेडणेकर, येकूण असामी तीन यांसीं बेड्या घातल्या. व लछीराम याचा भाऊ आनंदराम यास बेडी घातली. सदर्हू पांच असामींस बेड्या घातल्या. शिवाय गोपाळराव बेड्याशिवाय कैद करून ठेविला आहे. बाकी मोठ्याच अपराधाचे च्यार आ सुलतानराव, शिव सावंत, गणोजी वाघ, गणोजी बोरकर मोकळेच सध्या आहेत. त्यास, याचेपुढें कसें काय करावयाचें, त्याविशीं सरकारची आज्ञा घेऊन लिहून पाठवावें. आज्ञाप्रमाणें पुढील कर्तव्य करुं. काल श्रावण शुद्ध १० दशमीस लोकांची हजिरी घेतली. गयाळ असामी बाद घातली. व दोषी पंचवीस तीस असामी दूर केली. आणखी पंनाससाठ आ बदलावयाची आहे. ती एकदमच बाद घालू ह्मटल्यास, ठीक नव्हे. पुढें सोईसोईनें जसें जसें दिसेल तसतसें करूं. बाहेरील सवाशें लोक रायचंद, जुमारामबकस व बारगीर, गोलंदाज व किरकोळ आह्मांजवळ चौकी पाहा-यास आहेत. जिभींत पंनास लोक आरबांचे आहेत. दुर्गाडींत जुमाजमादार पंचवीस लोक सुधां आहेत. बाकी शंभर लोक देहुडी व कचेरी मिळोन आठ प्रहर जवळ असतात. किल्यांतील ब्राह्मण सरदार याचे लोक व भंडारमंडळ व सजणाजीराव यांची अनुकूळता पक्केंपणें आहे. याउपर किल्याविशी आपण किमपि काळजी न करावी. सुलतानराव यांचे वळण * बाळाजीपंत पटवर्धन याजकडे आहे. सध्या दरबारीं चाल बाळाजी पंताची. यास्तव पारिपत्य तो मोठेंच केलेंच पाहिजे, यास्तव सरकार परवानगी घेऊन उत्तर पाठवावें. त्या प्रमाणें करू शेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.