Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३३
श्री.
१७२३ आषाढ वद्य ३
पैवस्ती आषाढ वद्य ५ बुधवार.
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी परशराभमट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना ता। आषाढ वद्य ३ मंगळवार प्रहर दिवसपर्यंत वर्तमान यथास्थित असे. विशेष. रा सर्जेराव बापू घाटगे यांचे कूच कालच होणार होतें. परंतु कांहीं आरबांचे तंट्यामुळें काल मुकाम जाला. कालच मोठें विघ्र होतें. बावनपागे यांचे भांबड होतें. अरबांसी व त्यांसी कटकट लागली होती. सेवटीं अरबांनीं रु। घेऊन आपले जबरीनें रात्रीं निघून गेले. आज रा सरजेराव बापूंचेंही कूच करून सेंदूरवाधेयास मुकामास गेले. वरकड सविस्तर वर्तमान लिहून पाठऊं, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.