Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३७
श्री
१७२३ भाद्रपद शुद्ध प्रारंभ
पौ छ ८ जावल सन इसन्ने, मुा। कोपरगांव.
पुा सां नमस्कार विज्ञापना, पाछापूरचें सांप्रत वर्तमानः सरजेराव घाटगे यांजकडून आपा देसाई निपाणकर याजकडे सांगितलें आहे. आपा देसाई याजकडून निळकंठराव ह्मणोन कमावीसदार आहेत. निळकंठराव, लिंगो केशव व बापू देशपांडे यांचे आप्त आहेत. देशपांडे व कमाविसदार एकलक्षानें चालतात. देशपाड्यांचे व शेखमिराचें वांकडें. तेव्हां देशपांड्यांचें राहणें प्राछापुरी होईना. यास्तव, शेखमिराचें पारिपत्य करावें हा सर्वांचा मानस, यास्तय, दोन हजार लोकांचा जमाव केला. शेखमिरास कळलियावर पहिले चारपांचशे लोक त्याजवळ होतेच. हालीं शैदोनशें नवे ठेऊन यांची त्यांची नवी लढाई झाली ! पहिले लढाईस शखमिरा कचकरला. दुसरे लढाईस निळकंठराव कचरले. यामुळें देशपांडे मंडळी देवजीरुद्रसुद्धां पळून गोकाकेस गेला, दाहावीस माणूस ठार जाहाले, एकादोघांचीं डोकीं मारिलीं. एकास तीरमार करून मारिला, पांच साहा आ कारकून अंकल्याच्या ठाण्यांत कमावीसदाराकडून होते, ते धरून नेले. ते जिवानिशी मारणार ह्मणून बोली आहे. मग यापुढें काय करील नकळे. सांप्रत कित्तूरकर तीनच्यार हजार जमावानिशीं शेखमिरास सानुकूळ जाहाले आहेत. तेव्हां ( बंड १ )++++++ मोठेंच जाहलें. दाहापांच हजार फौज व तोफा ( येऊन ? ) + जांबेटी व कित्तूर व शेखमिरा याचे पारपत्य करतील तेव्हां वस्ती होईल, झाडून तालुका उज्याड, पुंडावा मांडिला आहे. तुह्मी पाछापूरची सनद पाठविणार, तेव्हां सनदेनें अमल बसविणें अर्थ नाहीं. सनद निघाल्यास फौज इकडे येणार, त्यास, सरकारांतून ताकीद करवावी कीं, पाछापूरचें ठाणें खर्च न घेतां बसऊन द्यावें. नाहीं तर, उगीच सनद घेऊन सरकारचा उपकार कामाचा काय ? यामागें परशरामभाऊ मिरजकर यांची फौज या प्रांतीं राहून संस्थानिकांचीं पारपत्यें सालास करीत होते. अलीकडे या प्रांतांत दाब अगदींच नाही, याप्रों जालें आहे. आपणांस कळावें. ह्मणोन लिा आहे. शेवेसीं श्रुत होय हे विज्ञप्ति.