Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३८
श्री.
१७२३ श्रावण वद्य ५
पो भाद्रपद शुद्ध १ शके १७२३.
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न महाराज राजश्री तात्यासाहेब स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी यशवंतराव दत्तात्रय व नारायणराव बाळकृष्ण कृतानेक सां। नमस्कार विनंती उपरी येथील क्षेम ता। श्रावण वा। पंचमी शुक्रवार जाणून स्वामीचे आशीर्वादंकरून स्वस्थ क्षेम असों. विशेष. कृपा करून आशीर्वाद पत्र श्रावण शुद्ध सप्तमीचें मुजरद हरका-याबराबर पाठविलें तें वद्य तृतीया बुधवारीं संध्याकाळी पावोन दर्शणातुल्य लाभ जाला. मासलाबतखां बहादूर व सुभान खांबाहादूर सहसैन्य साता-याचे शिवारांत उतरले आहेत. शेतांमळ्यांस व गांवास फर्मायश आदिकरून उपसर्ग फार होतो. यास्तव उभयतां सरदारांचे नांवें येथून निक्षून ताकीदा पाठवाव्या. या प्रकरणीं कृपासागर राजश्री राजे रघोत्तमराव राजेंद्रबाहादूर यांसही आपण पत्र लिहिलें. आज्ञेप्रमाणें राजेमवसुफांस समक्ष सविस्तर निवेदन करून, उभयतां सरदारांच्या नांवे निक्षून ताकीदपत्रें, यथास्थित काडीमात्र उपद्रव शिवारांत व गांवांत न व्हावा व हरएक साहिता करीत असावी. श्रीमंत पंतप्रधान याचें गुरुस्थान व याही राज्यांत यांची मान्यता विशेष आहे, ऐसें बहुत अगत्यवादेंकडून लिहिलें असे. इतपर कोने गोष्टीचा उपद्रव होणार नाहीं. ती IराI यादवरावबाबा यांहीं पत्रीं एतद्विषयीं आह्मांस बहुत लिहिलें. ऐसियास, आह्मीं आपले आज्ञांकित प्रसंगानरूप यथानशक्त्या जे सेवा घडेल ते थोडीच जाणतों. राजेंद्रबाहादराचे पत्राचें उत्तरही सेवेसी पाठविलें असे. उभयतां सरदारांस पत्रें पाठविलीं त्यांचा मसविदा या पत्रांत पाठविला आहे. श्रवणगोचर होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दिजे, हे विनंती.