Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३१
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध ७
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां नमस्कार ता। आषाढ शुद्ध ७ भृगुवार प्रहरदिवसपर्यंत वर्तमान यथास्थित असें. विशेष. काल आपणाकडे पत्र पाठविलें. त्यावर दोंप्रहरा रा सरजेराव घाडगे यांची स्वारी प्रवरासंगमीं दाखल जाली. अगोदर कंपू पुढे आला. त्याची कही प्रवरासंगमांत गेली. त्यांनीं लाकूडफांटा वगैरे फार गर्दी केली. पांचच्यार घरें झोंबाडले. दोंचव घरची पांघरुणें, भांडीं, वस्तभाव वरचेवर हातीं लागले ते नेली. त्यावर खांसा स्वारी आलियावर, चाळीस तुरुक स्वार रखवालीस देऊन, कहीं मारून काहाडली. नंतर वो रा। बाळंभट आपाचे भेटीस गेले. भेट घेऊन हात जोडून उभा राहिला कीं, तुमची आज्ञा होईल तर बसेन. मग आपा बसा ह्मणाले, तेव्हां बसला. भोजन आपांचे घरींच जालें. त्यावर आपानीं सांगितलें कीं, कालेगांवास गंगा उतरावयास जावें. नांवाहि दोनच्यार तिकडेच आहेत. तेव्हां, त्यानें कबूल तर केलें. व लखमापूर, वरखेडे, कायगांव टोंके, प्रवरासंगमास पांचागांवास काडीमात्र उपसर्ग न करणें. तेव्हां त्यानें कबूल तर केलें. परंतु कंपूचा आग्रह आहे कीं, याचघांटें उतरावें. नावाहि सावखेड्यापर्यंत काल आल्या, ह्मणोन बातमी आहे. पुढे रामडोहाचे खडकावरून नाव चालत नाहीं. आज पाणीहि दोन हात उतरलें. त्यापक्षीं नाव तर खडकावर चढणारच नाहीं. मग नाववाल्यांनी युक्तीनें चढऊन आनलियास उपाय नाहीं. परंतु बहुतकरून कालेगांवास जाईलसें दिसतें. परंतु कंपूचा आग्रह आहे. अलीकडे उतरल्यास फार खराबा करतील. काल प्रवरासंगमकरांस शंभर रुो खर्च पडला. शिवाय, तुरुक स्वारास चाळीस रुो पडले, ते सरजेरावानें आपले जवळून दिल्हे. पुढे येथेंच उतरावयाचा बेत जाला, तर सर्वांचे मानस कीं, दोन तुरुक स्वार आणावे. + + + आज पलीकडे सहश्रभोज्यन करणार. दोनतीन मुकाम आहेत. मागाहून नवल विशेष वर्तमान जाल्यास लिहून पाठऊं. + ++ गांवातील लाकूड व......पूल तोफांस नांवेंत घालायाकरितां नेतील. धूमहि करतील, परंतु आपण चिंता न करावी. उतरणें फार करून येथें होईल.