Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३९
श्री
१७२३ आश्विन शुद्ध १०
पौ छ ८ जावले सन इसने, मु कोपरगांव.
पुा सां नमस्कार विज्ञापना. हवालदार यांणीं पुण्यास पत्रें आह्मांकडेस माणसें विचा......कळवून पाठविलीं. परंतु पत्रें कोणाकडे आणि त्यांत मार काय, हें समजलें नाहीं. ऐकण्यांत श्रीमंतांस व मोरोबादादांस पत्रें लिहिलीं आहेत. हिंमतअल्ली जमादारास, बाळूमियास पत्रें लिहून हीं पत्रें त्याजकडे पाठवा, असें ह्मणत होते. मग, तो जाबसाल राहिला. मग त्यांनी आपलींच माणसें पाठविलीं. त्यास, त्या पत्राचा शोध बाळूमियाकडे करावा, ह्मणजे समजेल. त्यांणी आपल्या श्नेहितांसी पत्रें लिहिलीं असतील, त्याचाही शोध करावा, सनगांविशी लिहिलें होतें. त्यावरून हल्लीं मजुरदारावरून धोत्रजोडे पाठविले आहेत त्याची याद अलाहिदा आहे. यादीप्रमाणें पावलियाचें उत्तर पाठवावें. मातुश्री लक्षुमीबाईकडे तीन हजारांचा नेट लाविला आहे. परंतु, उरफाट्या गोष्टी सांगतील. सोईस येत नाहीं. लक्षुंबाईची प्रकृत परम अवघड, आपणास परस्परें ऐकून माहितगारच आहे. आजपर्यंत किल्यांत होती. आह्मी आंत आलियावर बाहेर पुसोन गेली...तात्या व मी एकत्र होऊन ऐवजाचा साबसाल करणें, तें बाहेर गेलियावर यांचें त्यांचें बोलणें जाहलें. सर्वांच्या मतें संध्यां तीनहजार रुा। बाईनें द्यावे. बाई कोणाचेंच ऐकत नाही! येविशींचा मजकूर पेशजींच्या पत्रीं लिहिलें आहे. उत्तर येईल त्याप्रो करीन. गांव व किल्लां गाद्याचा त्रास करितो. मग, वाम कां करितात, हें न कळे. याची चवकशी तुमची तुह्मीं करावी. आह्मांस चवकशीचें ज्ञान नाहीं. यास्तव बाईस व तात्यांस पुणियास आणविल्यास पा देतों. आपलें व त्यांचे विचारें होईल तसें करावें; व किल्याच्या बंदोबस्तास कोण विश्वासूक असेल तो पा। काम मोठें. प्रामाणिक, एकामी, जातीचा पाहून पाठवावा. त्याचे स्वाधीन किल्ला करून, आह्मी पुणियास येतों. कुसाजी पेशक हुज-या पाठविलात. त्याप्रमाणें येथें येऊन आमचे रजेतलबेंत राहून सांगितल्याप्रों वर्तणूक करून कार्यसिद्धी केली. माणूस बहुत चांगला. प्रसंगाने कळतें. कुसाजीविशीं पेशजीं लिहिलेंच आहे. लिहिल्याअन्वयें हवालदारांचें काम याजकडेस जाहल्यास, दादा! बहुत सुख पावाल, ह्मणोन लिहिलें आहे. युक्तीस येईल तसें करावें. आमचा आग्रह कोणती गोष्टीचा नाहीं. गार्द्यांची चौकशी आह्मांस करा ह्मटल्यास, आह्मी साफ करणार नाहीं. मागें, अंबूनानाच्या चौकशीस आपण पाठबीत होता. परंतु आपण कबूल केलें नाहीं. यास्तव, हालीं करणें तें समक्षच करावें. येथें कारकून मंडळी आहे. त्यांत बुधवेव्हार हशमनीस, कोणाच्या तंट्याबखेड्यांत व लोभांत अगदीं नाहींत. बापूराव बापट कामकाजाच्या उपयोगी मात्र आहेत. पुढें हि बाबूराव उपयोगींच पडावयाचे. शाहणा माणूस, दमाचा, प्रामाणिक आहे. इतर सारे रोजगारेच आहेत ! रोजगार करावासा वाटतो. धन्याचें हित हो अगर अनहित हो, त्याची काळजी त्यांस नाहीं ! रामचंद्र लळतो, रामचंद्र मरसि, रामचंद्र भिकाजीपंत जवराचा (!) मेहुणा व्यंकपा च्यार असामी कोणत्याहि उपयोगाचे नाहीत. दरमहा पैका कोठून द्यावा ? पैक्यास ठिकाण नाही. यास्तव च्यार असामीस सध्या निरोप देण्याविशीं पत्र पाठवावें. काडीचा उपयोग नाहीं ! राजश्री दाजीबा गर्दै यांचे तीन आहेत, आप्त ह्मणोन चालवावें खरें. परंतु यजमानाचें हित करावयाचें ज्ञान नाहीं. आणि बळवंतराव याजकडे जाऊन आमचेंहि अनहित इच्छितात ! असो ! याउपर आमचे नांवें पत्र पा कीं, दाजीबाचे स्वार सध्या पैक्याच्या वाढीमुळें दूर करावें, पुढें ठेवावयास येतील. ठेविले असतां कामास येणार नाहीं. ह्मणोन अलाहिदा पुरवणी दाखवावया उपयोगी लिहाव्या. असाम्यांची वेगळी स्पष्ट लिहून पा म्हणजे असाम्यां बंद घालितों. याउपर पुढें बारीक...... टें समजेल तें लिहून पाठवितों. उत्तर येईल, त्याप्रों करावयास येईल. मृगापासून आजपर्यंत पर्जन्य आठप्रहर नित्य पडतो. शेतें गेलीं. सध्या धारण अडीच पायलीची च्यार महिनें जाहाली आहे. माहागाईमुळे सिबंदीचा रोजम-याचा नेट विशेष होतो. त्याचाहि उपाय नाहीं. गांवांत खर्चामुळें पेशजीं पट्टी करीत होतों. परंतु बखेड्याने गांवांतहि बखेडा होऊन पैंव व रयत पळून गेली. तेव्हां स्थलपत्र जांबेटकरांस देऊन गांवावर आणिलें. हालीं किल्यांत बखेडखोरांस बेड्या घातल्या. हे वर्तमान कोष्टयांनीं ऐकून सलाबत खादली कीं, आह्मीं बखेडा केला होता, पुढें आमचें पारपत्य ऐसेंच करतील. यास्तव दोन च्यार असामी जाबीटीस गेले आहेत. आह्मी तो पट्टीचें नांव घेतलें नाहीं. किल्याप्रकरणींच बंदोबस्तास गुंतलों, त्याची त्यांणीच कांक्षा घेऊन गेले आहेत. वरकड सारे गांवातच आहेत. जाहालें वर्तमान लिहिलें आहे. याऊपर आह्मीं आपले तर्फेनें दिलदिलासा देऊन, गेले त्यांस आणवितों. सारांष.........साधन करावयास जावें तो मसक ( ? ) साधत नाही. अशा गेष्टी किल्याच्या एका बखेड्यामुळें जाहल्या आहेत. कच्चें वर्तमान लिहिलें आहे. कळावें, सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञप्ति.