Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३२
श्रीगजानन,
१७२३ आषाढ वद्य ३
पैवस्ती आषाढ वद्य ५
विद्यार्थी गोपाळभट दामले सां नमस्कार विनंती येथील क्षेम ता आषाढ वद्य ३ मंगळवार, दीडप्रहर दिवस, पावेतों यथास्थित असे. विशेष, सर्जेराव घाटगे फौजसुद्धां कूच करून आज सेंधूरवाद्यास गेले. कूच कालच होणार होता परंतु आरब चाकरीस होते, त्यांची तलब चढली होती, सबब अडून बसले. नंतर तहरह होऊन, तलबेचा फडशा करून दिल्हा आणि रुकसत केले. याजमुळे काल राहिले. आज फौजसमेत गेले. गांवांतून बेगारी माणसे पंचवीसतीस गेले आहेत. मळ्यांतील सालवकडबल वांचलें. सर्व ईश्वरकृपेनें व कैलासवासी नानांचे पुण्यप्रतापें करून पार पडलें, जात्या दुष्टच ! याचा विश्वास आबालवृद्धांस नवता परंतु श्रीरामेश्वरकृपेनें पार पडलें ! बैल साता-यास आहेत, ते उदईक चंद्रोदई तेथून रा। करावयासी आज्ञा व्हावी, ह्मणजे येथें च्यार घटका दिवसास पावतील. +++ हे विज्ञप्ती.