Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२३
श्री.
१७२३ चैत्र शुद्ध ३
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दिक्षीत स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी यशवंतराव महादेव सां नमस्कार विनंति येथील कुशल ता। चैत्र शद्ध ३ जाणुन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहीजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. रा जिवाजी यशवंत याचे व कंपूचे दंग्यांतून कायगांवकर यांची तसनस बहुत जाली, ह्मणोन विस्तारें मजकूर लिहिला, तो सविस्तर कळला. ऐशास, ईश्वरी क्षोभ ! त्या गोष्टीस मनुष्याचा उपाय राहिला आहे, असा अर्थ नाहीं. सारांश, दंग्यापूर्वी निघोन साता-यास जाऊन राहिलां ही गोष्ट फार उत्तम केली. कायगांवकर ब्राह्मणाविशीं श्रीमंत राजश्री दादांस सांगावें. साहित्य होईल तेथवर करावें, ह्मणोन लिहिलें. त्यांस, सांप्रतचे दिवस सर्वास काळजीचेच आहेत. त्यांत ही सवड पाहून सूचना करितों. चिरंजीव नारायणराव यांचें लग्नकार्य फाल्गुन वा अष्टमीस उरकून घेतलें. आपणांस कळावें. बहुत कार्य लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.