Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५२१

मसुदा.

श्री.
१७२२ फाल्गुन शुद्ध.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांसी:-

प्रती लक्ष्मीनारायण दीक्षित कृतानेक आशीर्वाद येथील क्षेम ता। फालगुन शुद्ध + पावेतों मुकाम औरंगाबाद येथें आपले कृपेंकरून कुशलरूप असों. विशेष. राजश्री जिवाजी यशवंत बावनपागे फौज सुद्धां कायगांवीं शुद्ध ३ रविवारीं येऊन राहिले. त्यांचे मागे पेंढार एक हजार दुसरे दिवशीं आलें. त्यांची व यांची लढाई जाली. पेंढार चारपांचशें जखमी व दोनशें ठार बाक्नपागे यांणीं केले. पेंढारास तीन कोश हटविलें, मागाहून कंपू पलटणें व तोफा घेऊन आला. त्यानें तोफा सुरू केल्यावर, जिवाजी यशवंत फौजसुद्धा गंगापार उतरून गेले. नंतर कंपू व पेंढार कायगांवावर मुकाम करून, पेंढा-यानें गांवात लूट केली. ब्राह्मण आदिकरून सर्वत्रांस वस्त्रहरण जालें ! श्री. कृपेंकरून बायकांची आबरू व ती। रामचंद्र दीक्षित यांचा व आमचा वाडा ऐसे दोन वाडे मात्र निरोपद्रव राहिले. वरकड कायगावासच पेंढा-यांनी उपद्रव केला. हा ईश्वरीक्षोभ! असो ! सर्व गेल्याची क्षीत नाहीं. आपले प्रतापेंकरून मागती सर्वत्रांस प्राप्त होईल. वर्तमान श्रुत असावें ह्मणोन लिहिलें आहे. विशेष काय ल्याहार्वे ? लोभ असों द्यावे.