Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५२७

श्री. नकल.
१७२३ ज्येष्ठ शुद्ध ३


वेदमूर्ती राजमान्य राजश्री परशरामभट नाना व समस्त ब्रह्मण क्षेत्र प्रवरासंगम स्वामींचे सेवेसी:-

सेवक त्र्यंबकभट सभारंजक मुा। वैजापूर सा नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। जेष्ठ शुद्ध ३ दोनप्रहरपावेतों मुकाम मजकुरीं सर्व मंडळी कुशलरूप असों. विशेष. आपणापासून स्वार जालों ते मुा मारीं दोनप्रहरीं पावलों. यानंतर लष्करचें वर्तमान तरी फत्तेसिंग माने यांची फौज आठ हजार आंपरखुल येथें आहे. मोंगलाईंत कांहीं उपद्रव नाहीं. शिंदे यांची ठाणीं उठोन आपलें ठाणें बसवितात. वेरुळाकडे दोनतीन हजार फौज ठाणें बसवावयासीं गेली आहे. तिचा शोध करून बनलें तर वेरुळाकडे होऊं. इकडील फौज तूर्त कांहीं आपल्याकडे येत नाहीं, वेरुळाकडील बातनी राखीत जावी. धामधूम विशेष कांहीं दिसत नाहीं. एखादें पत्र जोख्यास पाठवावें. तिकडोन बंदोबस्त जाल्यास उपयोगीं पडेल. आपल्याकडील सविस्तर वर्तमान ता। लिा। पाठवणें. स्वस्थ असावें, कळावें. बहुत काय लिा ? कृपा लोभाची वृधी करीत जावी. हे विनंती.

ता।, हेंच वर्तमान टोंक्यास कायगांवीं पावतें करणे.