Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २६८

श्री
१७०३ आश्विन वद्य १३

रा. मल्हारराव सोमवंशी गोसावी यांसी:-

सुा। इसन्ने समानीन मया व आलफ, तुह्मी आपले गांवीं मौजे जवळेपैकीं पारनेर एथें कलाल बाळगून दारू करवीत होता, ह्मणून हुजूर विदीत झालें. त्यास, कलाल यास सरकारांत आणून चौकशी करितां, तुह्मी सरकार आज्ञेशिवाय कलालाकडून दारू करवीत होता, हा अन्याय तुह्मांकडेस लागू झाला. त्यास, सदर्हू अन्याय तुह्मांस माफ करून, नजरेचा ऐवज सरकारांत द्यावयाचा करार केला. त्याप्रमाणें बदला देणें तो रंगो गोपाळ कारकून कुलशिलेदार यांजकडे खासे चाकरीच्या बायकांस व मुलांस व सुनांस सन समानीनचे व सालगुदस्तचे मोईनपैकीं रुपये ४००० हजार रुपये देवविले असत. तरी तूर्त पावतें करून पावलियाचें कबज घेणें, जाणिजे, छ २६ सवाल.