Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २७१

श्री.
१७०३ फाल्गुन वद्य ४

पौ छ १९ रावल फाल्गुन, इसन्ने समानीन हा आंची.

पुरवणी शेवेसीं विज्ञापना विशेष. स्वामीकडून ब सरकारांतून निवळ पत्रे येतात, त्यांत दिकतीचा प्रकार कांहींच नसतो. त्याजवरून आह्मीं नबाब बहादूर यांसी खातरजमा करून बोलतों. आज पावेतों आमचें बोलणें व स्वामींचें लिहिणें यथार्थ जाणून बंगाल्याकडील वगैरे मसलतीविशीं जें जें बोलणें झालें तें वरचेवरी अंचीवरील पत्रें रवाना केलीं आहेत. अलीकडे इंग्रजाकडलि वकील पुण्यास येऊन जाबसालचें बोलणें निश्चयांत आले ह्मणून वकीलाचें लिहिणे; व बातम्या चहूंकडून खचित आल्यामुळें, यांच्या चित्तांत नानाप्रकारच्या कल्पना उत्पन्न होऊन, स्वामीस लिहिण्याचा प्रकार सांगून, आह्माकडून लिहविलें आणि अंतरगें विनंती पंताकडून चैनापटणकरांशीं संधानाचा सिलसिला लाविला. त्याजवरून इंग्रज सर्वप्रकारें मान्य करून मशारनिलेस पाठवून देणेविंशी लिहिले आहे, म्हणून वर्तमान ऐकण्यांत आलें. अद्यापि प्रगट नाहीं. खरेच असल्यास निदर्शनास येईल. बहुतकरून खरें असेल. येविशीं शोध करून मशारनिलेस त्याजकडेस पाठऊन देणार अगर कसें काय, तें मागाहून लिहून पाठवितों. आजपावेतों इंग्रजांच्या तंबीविशी दोन आधार होते, त्यापैकीं स्वामीकडील आधार बिलकुल तुटलासा झाला. दुसरा फरांसिस येण्याचा. तो कसा होतो तो पहावा. एकूण नबाबचें चित्त अंदेशांत पडून, इकडील मसलतीविश उदासीनता जाली. न जाणो, स्वामीकडील कायमी यथास्थित राहुन आठपंधरा रोजांत फरांसिसांचीं आमदानी जाल्या, योजिली मसलत सिद्धीस जाऊन नक्ष होतो. नाहीं तरी, हें इंग्रजाकडील राजकारण हरकसेंही समेटून घेऊन चाल कोण्हीकडे करतील, हें नकळे. याच बेतावरी इकडील प्रांताची आस्था न ठेवतां बेचिराख केला. अर्काट व अरणी हीं दोन मातबर स्थळें तींही खालीं करून तमाम सावकारा वगैरे लोक व तोफा घांटावरी लाऊन दिल्ह्या. किल्ला न पाडतां ठेवितील जरूर. असा प्रकार येथील जाला आहे. सर्व स्वामीस कळावयाकरितां विनंति लिहिली आहे. सर्व दूरंदेशीनें जें करणें तें नुमूस न पड़े ब लौकिकांत स्वामीचा नक्ष विशेष घडे असा प्रकार करावा. फरांसिस करार आलेच असले, तर एक दोन रोजांत तहकीक वर्तमान येईल तें जलद सेवेसी लेहून पाठऊं. फरांसिस यावयाचा प्रकार नसला, तर ही आवई पाहून इंग्रेजांसीं राजकारण हर त-हेनें समेटून घेतील. सेवेंशीं श्रुत होय. हे विज्ञापना.