Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २७०

श्री
१७०३ फाल्गुन शुद्ध १५

पो छ १४ रावल, फालगुण, इसने समानीन. आंचीवर आलें. दोन बंदरास.

वैसी आनंदरावजी बाजी व गणेश केशव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता छ २६ सफर मुकाम मुसळीपाक येथें स्वामीच्या कृपावलोकनें करून वर्तमान यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री नाना यांनीं छ ६ मोहरमचीं पत्रें जासूदजोडीबराबर राजश्री कृष्णराव तात्या यांस पाठविलीं तीं छ १६ सफरीं पावलीं. पत्रीं आज्ञा जेः बंगाल्याकडे फौजेच्या रवानगीची सिद्धताच आहे. पैक्याची सरबराई तर्तूद करून, जाबसाल उरकोन, उत्तरप्रत्योत्तराचा प्रसंग न पडतां, ऐवजाची रवानगीच होऊन येई तें करावें, छत्तिसांची तरतूद न होय, तर निदान तिसांचा जाबसाल उरकून पाठवावा ह्मणून. व दुसरें, पुरवणीपत्रीं लिहिलें जे: इंग्रजांच्या कबजांतील मुलुख मारून ताराज करावा. रसदेची वगैरे आमद रफ्ती होऊं नये, यास्तव सरकारातून लोक रवाना केले होते. ते स्वा-या करितात. यापुढें इंग्रजाकडीलही जमाव मुकाबल्यास येऊन, झटपट जागांजागां चालविलीच आहे. च्यार गलबतें भरून कांहीं जिन्नस व लोक मुंबईकडून इंग्रजांचे लोक मुकाबल्यावर कोहेजेकडे होते. त्यांच्या उपराळ्यास मनोरचे खाडींतून येत होते. त्याची बानेमी राखून, किल्ले कोहज येथील सरकारचे लोक कांहीं मेले व कांहीं पाण्यांत उड्या टाकून बुडाले. गलबतें सरकारच्या लोकांनी शिकस्त करून पाडाव आणिलीं. याजमुळें इंग्रजाकडील जमाव तिकडे रवाना झाला आहे. सरकारचे लोक तेथें आहेत. ते मजबुदीनें आहेत. व येथून भरतीस लोक वरचेवर रवाना होत आहेत. ह्मणून विस्तारें लिहिलें. ऐशियास, बंगाल्याचे मसलतीचे सरबराईविशीं सरकारांतून पत्रें आंचीवर जीं जीं आलीं तीं तीं नबाब बाहादुर यांस श्रवण करून, पत्राचे भाव समजाऊन, उत्तरें निरोत्तरे जालीं. त्या अन्वयें आंचीवर लिहित गेलों. सांप्रत, मुंबईहून वकील पुण्यास आल्यामुळें यांच्या बातम्या परभारे नानाप्रकारच्या येतात. तेणेकरून त्यांच्या चित्तांत विकल्पाचे वृक्षच वाढले आहेत. याचीं परिमार्जनें करावयाचीं ती करीतच आहों. सरकारचीं व स्वामीचीं पत्रें नबावास येतात. परंतु स्वामीच्या लिहिल्यानें व आमच्या बोलण्यानें खातरजमा होत नाहीं. याचे संशय निवारण व्हावयाचा विचार तर, मुंबईकर वकील माघारा लावून द्यावा व नबाब निनिजामअल्लीखा कराराप्रमाणें मसलतीस नमूद होत नसल्यास कृष्णराव बल्लाळ यांणीं नबाबाशीं रुष्ट, तुटक भाषण करून उठोन यावें. याप्रों जालें. ऐसीं परभारें वकीलांची लिहिलीं नबाबबाहादूर यांस आलीं ह्मणजे संशयाचा वृक्ष निर्मूल होईल. जाल्यास सरबराई तर्तुद, बंगाल्याची मसलत केल्यास, वीस लक्ष रुा ची होईल. तें प्रस्तुत घडत नाहीं. तेव्हां गुजराथ वगैरे प्रांत सोडवायाचे तजविजेस फौज रवाना केली ह्मणून वकिलांचीं लिहिलीं आलीं. म्हणजे साल मजकुराचे बारा लक्ष रुा पाठवून देतील. याच अन्वयें पत्र जासूदजोडीसमागमें राजश्री कृष्णराव तात्या यांनी राजश्री नानास व आह्मीहि सेवेसीं पाठविलीं आहेत. जासुदास पोहोंचावयास दिवसगत लागेल, याजकरितां आंचीवरही रवाना केलें आहे. सारांश, यांच्या चित्तांतील आशंकापरिहार, विना मुंबईकर वकील पुण्यास आला आहे तो तुटक गोष्टी सांगून माघारा लावून दिल्याखेरीज होत नाहीं. हा प्रकार घडावयाचा विचार कसा असेल, तो कळेना. स्वामीकडील बातनीनिसांची पत्रें विकल्पयुक्त येऊन बेमर्जी होती. नबाबसाहेब यांचा शोध फार सूक्ष्म, केवळ गंभीरपणेंच हा काल पावेतों आहेत. दुसरें कोणीं असतें तरी काय करतें कळेना. यांनी यांनीं आपले जागां निश्चय केला आहे कीं, आपल्याकडून अंतर पडेलसा शब्द लाऊन घेऊ नये. तिकडूनच न घडावयाची गोष्ट घडल्यास मग कळेल त्यारीतीनें आपला मतलब साधावा. या विवंचनेंत आहेत. आह्मांस सांगितलें आहे कीं, तुह्मी दररोज कळेल त्याअन्वयें येथील स्थितीचें व चहूंकडील ऐकण्यांत येत जातील तीं कोणे विषयींचे अंदेशे ध्यानांत न आणतां खुलाशाने लेहून आंचीवर मोहोरेनिशीं रवाना करीत जाणें. आह्मीं तुमचा लाखोटा कदापि फोडून पाहणार नाहीं. याप्रमाणें आह्मीं लिहिण्याकरण्यांत कांहीं आदि. पश्चात पाहूं ह्मणून खातरजमा करितात. व आजपावेतों तसेंच चालवितही आहेत. याजकडे दोष ठेवावयाचा प्रकार कांहीं दिसण्यांत तूर्त येत नाहीं. वरचेवर पत्रें उगऊन लिहून सेवेसीं रवाना करितों. स्वामीकडून समर्पक उत्तरें व त्या अन्वयें नवाबास परभारें बातन्या निखालस येतील तो सुदिवस होईल. सारांश, नबाबसाहेबांच्या चित्तांत विपरियास परिच्छिन्न आला आहे. स्वामी पत्रें लिहितात व आह्मी खातरजमा करितों. परंतु खातरजमा होत नाहीं. याउपर सर्व अर्थ ध्यानांत आणून, नवाबसाहेबांची खातरजमा होऊन, बोलावयाची उजागरी होय, ऐसें करणार स्वामी समर्थ असत. तपशील कोठवर ल्यांहावा ? ज्यांत सुदिवस दिसे तें करणार स्वामी समर्थ असत, सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.