Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २७२

श्री.
१७०३ फाल्गुन वद्य ४

पो छ १९ रावल फाल्गुन, इसन्ने समानीन हा आंची.

पुरवणी शेवेसीं विज्ञापना. छ ५ रबिलावलीं संध्याकाळीं नबाबसाहेब यांनी राजश्रीं भुजंगराव यांस दरबारास बोलाऊन वर्तमान सांगितलें जें: फ्रांसीसाकडील जाहाजें येणार याची वार्ता होतीच. आतांच वर्तमान आलें जे फरासिसांची चाळीस जहाजें लढवाई पाण्यांतून चेनापटणास दाखल होऊन तीन रोज जाले. जाहाजांस लंगर टांकून इंग्रजांशीं व फरांसिसांशी लढाई षुरूजाली ह्मणोन वदंता आहे. याखेरीज वीस जहाजें खुषकीवरी उतरोन लढाई करावयाचे (इराद्यानें) फुलचरीस येऊन दाखल जाले. जमियत किती आहे, सरदार कोण आला आहे, हें वर्तमान कांहीं तहकीक लिहून आलें नाहीं. एकदोन राजांनी तपशीलवार लेहून येईल, म्हणजे मदारुलमहाले यांस लेहून पाठऊं. सांप्रत वर्तमान ऐकण्यांत आलें तें रावअजम कृष्णराव नारायण यांस सांगावें, तहकीक बातनी आली. त्यास बोलाऊं पाठऊन सविस्तर वर्तमान सांगू. मदारुलमहाम यांचा भरंवसा खचित जाणून, फ्रांसिसांत आणावयाचा उदेग केला. तेहि येऊन पोहोंचले. अशा समयांत मदारुलमहाम यांनी इंग्रजाच्या वकीलाकडे वचन गुंतऊ नये. तमाम खुषकींतील सरदारांनीं एकदिल होऊन इंग्रजांचें तंबीवरी कमरबंदी केली आहे. याजकरितां यावरी फरांसिस आले. मदारुलमहाम यांजखेरीज वरकड सरदारांचे भरंवसे समजले! असो ! आतांहि मदारुलमहाम यांनी कायमी राखिली तरी. आह्मी मदारुलमहाम वे फरांसिस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करू, अशास, त्याप्रमाणे राव मशारनिले याजकडून मदारुलमहाम यास साफ लेहून पाठवावें. इंग्रजांच्या तंबीचा समय प्राप्त जाला आहे. असा वख्त वारंवार यावयाचा नाहीं. याप्रमाणें राजश्री भुजंगराव यांस सांगितलें. सविस्तर स्वामीस कळवण्याकरितां लिहिलें आहे. आठ दिवसांत पंधरा दिवसांत खामखा येतात असें होतें. आतां लांबणीचा प्रकार नाहीं. दोन तीन रोजांत समजेल. सविस्तर श्रीमंत राजश्री नानांस राजश्री कृष्णराव तात्यांनी लिहिलें असे. याउपर फरांसीस येतात, ऐसें आहे. फरांशीस आलियावर इंग्रजांचें पारपत्य नवावबहादर यथास्थित करितात. मागाहून आणिक एखादे दिवशीं वर्तमान सेवेशी लिहून पाठऊं. वरकड सविस्तर अर्थ, आंचीबरोबर वरचेवर पत्र सेवेसी लिहिली असत, त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.