मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १९६

श्री.
१७०० आश्विन वद्य ४

राजश्री आनंदराव हांडे देशमुख सरकार जुन्नर गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो सुभानजी जाधवराव रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकोय लिहित गेलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावोन सविस्तर वर्तमान विदित जालें. तर्थिरूप राजश्री खाशांचा मुहुर्त वसईस जावयाचा कधींचा आहे तो लेहून पाठवावें, ह्मणोन लिहिलें. ऐशीयास, ममईच्या बायावरी दहा फरकतें थोर व दाहा बारा हजार फिरंगी आला आहे, वसईवरी यावयाची दाटी फार आहे. ह्मणोन श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांची पत्रें आलीं कीं, तुह्मीं अविलंबें स्वार होऊन जाणें. त्यावरून त्या मार्गे जावयाचा मजकूर राहिला. उदैक आश्विन वद्य पंचमीस सोमवारी भोजनोत्तर स्वार होऊन जाणार. मुक्काम उदैक आळंदीचा आहे. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries