Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९७
श्री.
१७०० मार्गशीर्ष शुद्ध ५
पुा राजश्री बाबूराव स्वामीचे शेवेसीः-
विनंती उपरी ममईकर इंग्रज तीन चार पलटणें व कांहीं तोफा ऐसे कोकणांत उतरले. पैकीं दोन तीन तोफा व कांहीं लोक घाटमाथा आले. हें वर्तमान कळतांच राजश्री बापू व आह्मीं हुजूरातसुद्धां, शिंदे होळकर समेत, वानवडीवरून कूच करून तळेगांवचे सुमारें त्यांचे रुखावर आलों. फौजेची समजाविश काहीं जाली. कांहीं होत आहे. हल्ली इंग्रज कोकणांत उतरले. घांटावर आले. त्यांचें पारपत्य कर्णे कठीण नाहीं सत्वरच ईश्वरइच्छेनें तंबी होईल. परंतु इंग्रजाचा बिघाड जाला हे गोष्ट खुल्ली ! हिंदुस्थानांत पलटणें आलीं तथापि पडदा होता. ते म्हणत होते कीं, आम्हांस ममईस जाणें, पंतप्रधान यांसीं बिघाड नाहीं. कलकत्याहूनहि पत्रें येत गेलीं. त्यातहि हाच भाव कीं, रावपंतप्रधान यांसी करार व आहदिया जाला तोच मंजूर. ऐसें पडद्याने होते. ते त्यांणी होऊन, उघडी गोष्ट करून, तालुकियांत चालून आले ! तेव्हां तंबी कर्णे प्राप्त. इंग्रजी चाल प्रामाणिक ऐसें होते! तें त्यांणीं लोभामुळे सर्व सोडून बदनजर धरली. ही गोष्ट दक्षणेस व दक्षणेंत नबाब, पंत प्रधान व भोंसले, हैदरखान सर्वांस वाईट ! चरकाची गत आणि इंग्रजांची चाल एक ! दौलतकतें दूरदेशीं आहेत तेच हें समजतील कीं, ही गोष्ट वाईट आहे. ज्या राज्यांत टोपीकरांची चाल झाली तेथील गति काय, हें कांहीं लोपलें नाहीं ! याचा विचार राजश्री दिवाकरपंतदादा यांणी काय केला? इंग्रजी चाल दक्षणेxतील मोडणें, त्याची कबज्या न होणें, याची त-हा व सलाह कशी योजिली, हें त्यांस पुसोन, काय मसलत सांगतात, करितात हें सत्वर लिहावें. गनीमाई राज्याची. आगत्य इकडे आहे आणि त्यास नाहीं ऐसें नाहीं. राजश्री सेनाधुरंधर व राजश्री दिवाकरपंतदादा, तुह्मी बसोन, दरदृष्टीनें पोख्त मनसबा विचारून नेक सलाह ल्याहावी. इकडे कोणतीही गोष्ट त्यांचे सलहखेरीज नाहीं. हे विनंती.