Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९४.
श्री.
१७०० आश्विन शुद्ध १.
राजश्री लक्ष्मणपंत स्वामीचे सेवेसीं:-
विनंती उपरी तिकडील वर्तमान राजकी श्रीमंत पुसतात. त्यांस, कांहीं लिहित जावें, ह्मणून लिहिलें. त्यास, इकडील वर्तमान फाल्गुन मासीं रा। मोरोबा दादा फडणीस वाफगांवास जाऊन तेथून होळकर फौज सुद्धां व यांनींहि पांच हजार पावेतों ठेविली होती. रो बजाबा पुरंदरे व चिंतो विठ्ठल ऐसे पुण्यास येऊन येथील शिक्का कट्यार व निशाण घेऊन पुढें सासवडावर मुक्काम केला. मध्यस्त रा सखारामपंत बापू व कृष्णराव बल्लाळ व माधवराव जाधवराय हे ऐसे येऊन, रा नाना फडणीस यांनीं व त्यांनीं एक विचारें कामकारभार करावा ऐसें ठराविलें. त्याप्रों कांहीं चाललें नाहीं. चैत्र व वैशाख दोन महिने तसेच रोखानें गेले. पुढें रा हरीपंत तात्या फौजसुधां कर्नाटकांतून आले; व शिंदे कोल्हापुराकडे होते, तेहि आले. तेव्हां मसलत ठरून, यांचा त्यांचा बिघाड पडोन, मोरोबादादा यांसीं नगरचे किल्यांत ठेविलें. बज्याबा चंदन किल्ला येथें ठेवलें. चिंतो विठ्ठल मुंबईस पा होते ते तेथेंच आहेत. होळकर येथें आहेत. शिंद्याच्या लगामानें चालतात. उभयतां सरदार येथें आहेत. इंग्रजांचे पारपत्य उभयतां सरदारांनी करावें, कर्नाटकांत सखारामपंत बापू व नाना यांनीं फौजसुधां जावें, याप्रों मार ठरला. फौजांची तयारी होत आहे. दसरा जालियावर मुहुर्ते करून डे-यास दाखल होणार. याप्रों मजकूर आहे. रा आश्विन शुद्ध १ बहुत कार्य लिहिणें ? हे विनंती.