Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९१
श्री
१७०० श्रावण-भाद्रपद-आश्विन
पुा राजश्री रावजी स्वामीचे सेवेसी:-
विनंती उपरी इकडील वर्तमान विशेष लिहिणें तरी एक वेळ आंग्रेजाचा मजकूर. त्याचा इतल्ला वरचेवरी आपले पत्रीं लिहिण्यांत आलाच आहे. आंग्रेजांची पत्नावरी पत्रें दाट आलीं कीं, आह्मीं दरमजल तुमचे प्रांतावरून मुंबईस जातों. येथून उत्तरें त्यास वरचेवरी एकदोन रवानग्या तेथील आज्ञा प्रों गेली कीं, फरांसिसांचे वकीलास बिदा केलें, तुमचा व श्रीमंतांचा स्नेह जो आहे तोच आहे. आणि दोन चार उत्तरें पाठविलीं कीं, मार्ग विशम आहे. पर्वत आहेत, मार्गांनी पाणी.............हि हरवख्त मिळणार नाहीं. अशी इकडून पत्रें लिहीत गेलों. कदाचित् कठोर ल्याहावें, तरी कटक प्रांतांत अपाय करतील, हें जाणोन उत्तरें पाठवित गेलों. परंतु त्यांची पत्रें वरचेवरी हींच येत गेलीं कीं, आह्मी दरमजल याच मार्गे येतो. त्यास अलीकडे त्यांच्या लष्करांत काशीद जोड्या होत्या, व रा बेणीराम शिवभद्र वकील त्याजवळ आहे. आपणास ठाऊकच आहे. त्यास, त्यांणीं पत्र पाठविलें जे कर्णेल लस्लीन * आणि साहा पलटणें काल्पीस आलीं आहेत. तेथून कर्णेल गांजर यास तीन पलटणें देऊन, काल्पी अलीकडे जलालपूर आहे, तेथील मजल सांगितली. त्यांणीं कूच करून, दोनप्रहर रात्रीस फौजबंदी करून, राजश्री बाळाजी गोविंद व बुंदेले यांच्या फौजा जवळपास जाणोन, रात्रीस निघाले ते जासुदांनी मार्ग भुलविला. अरण्यांत जेथें पाणी नाहीं तेथें पडले. दोन अडीच प्रहर दिवस जाहला. इतकियांत कुल लोक तृषेनें व्याकूळ होऊन रानोरान जाले. कर्णेल गाजर सरदार मातबर व तीनशें गाडदी व पन्नास गोरे ऐसे तरी मेले. हें वर्तमान कर्णेल लसलीनांस कळतांच त्यांणीं कूच करून त्याजवळ आला. यांची इतकियांची गत करून, तेथेंच मुक्काम व्यत्रवतीवरी केला. प्रथम इकडे येण्याविशीं शकून याप्रमाणें जाहला ! पुढें न यावें तरी बुंदेल्यांचे व बाळाजीपंताचा शह खाऊन माघारे हलले, ऐसें होईल. याजकरितां छत्रपुरा.........आणि तेथें छावणी केली .........हिंदुस्थानांत व बंगाल्यांत भ्रम राहतो. याअर्थी छत्रपुराजवळ आले. इकडील येण्याची चाल सुस्त आहे. पुढे वर्तमान येईल तैसें लिहिण्यांत येईल. आंग्रेज निवळ श्रीमंत दादासाहेबांचेच पक्षावर नाहींत. कांहीं आणिक चालीवर आहेत. शुजायतदौरेचे लो-लेक आपली कंपु तयार करितात. नजफखानाचें सूत्र आहे. हें वकिलीचें लिहिणें नाहीं, वर्तमानें सावकारी पक्की आहेत. याहीवर न कळे! विनंती.