Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६५
त्यास कारभारांतून काढिल्यास मी करणार नाहीं, व तुम्हांजवळहि राहणार नाहीं. ऐसें कित्तेक प्रकारें मामास विनंती करून राहिलों. याचें कारण कीं एक वेळ पुरंधरास जावें, उभयतांची भेट घ्यावी, ते आज्ञा करितील त्याप्रों वर्तणूक करावी, ऐसें कथन दिवाकरपंतानीं बहुतच सांगितलें. कोठपर्यंत ल्यहावें? तेव्हां आम्ही व नानानीं बहुता प्रकारें सागितलें कीं, सेनाधुरंधर आमजेरास आले, येथें समजोत कोणतीहि नाहीं. या समयीं तुम्ही चित्त घालावें. त्यास उत्तर केलें कीं विठलपंतास वराडांत ठेवावें. आधी तुह्मीच नागपुरास जाऊं नये. ऐसें यजमानास बहुता प्रकारें सांगितलें. आठ रोज नाना तुह्मांस घेऊन सर्व सरदारांच्या घरास फिरलों. सर्वांस सांगोन अलजपुरावर रहावें, हे मसलत केली. तुह्मीं पाहिली. ते विचारास न आली. तेव्हां विठलपंतास ठेवावें ऐसें केलें. समईं मसलत सांगावी ते आइकू नये. तेव्हां आतां आह्मीं तों श्रीहरीचें चिंतन करीत बसलों. तात्यास सेडिल्यापासून कांहीं इतल्ला कामाचा आपणास नाहीं. आणि आतां काय ह्मणतां ? त्यास आह्मीं येथें आलों. त्या दिवसापासून द्रीष्टीनेंहि पाहिलें. हे कोणत्याहि कामांत नाहींत. आणि तुह्मीं उभयतांस पुरंधास पत्रें लिहिली. त्यांत उभयतां कारभारी एकत्र आहेत. ऐसें कैसियावरोन लिहिलेंत? व आपंली पत्रें दिवाकरपंतास दोन तीन आलीं कीं, सेनासाहेबसुभा यास घेऊन सत्वर फौजेंत यावें. त्यावरून दिवाकरपंत नाना जोशी याशीं ह्मणों लागले कीं. तुह्मीं उभयतांस काय लिहिलें, ते आह्मांस ऐसीं पत्रें लिहितात, तेव्हां आह्मीं येथे कारभार करितों, आणि त्यानें लिहिलेप्रों आमच्यानें घडत नाही, हें लिहिणें तुमचें उचित नाहीं, आतां मीं उभयतांस पत्रें लिहून अपली प्रथम जोडी पाठवीन. हें आमचे समक्ष भाषण जाहलें. शहरचे लोक व शिपाई व रयत-सावकार, वाड्यांतील बायका, सर्वांचा एकच प्रकार कीं, दौलत, जर दिवाकरपंत कारभार करतात तर, निभत्ये हें पाहोन व समय पाहोन आह्मीं फारच निकड केली कीं, आपण, बापू व नानापर्यंत हें जात, ऐसें करावें. तेव्हां भवानीपंतासच पुढें करून, सावकारांच्या घरोघर जाऊन, आठ रोज मोठा श्रम तीन तीन प्रहर रात्रपर्यंत आह्मांसुद्धां घेऊन बसावें. कामाची व बोलण्याची व जलदीची हातवटी पाहिली. सावकार मामलेदार राजी. पूर्वी कारभार केला. त्यास आपले विद्यमानेंच कर्ज कोणाचा एक रुपाया सरकारांत बुडों न दिल्हा. हें सर्वांकरवीं आह्मांसी भाषण करविलें, आणि आमचे दृष्टोत्पत्तीस आणून दिल्हें. आठा रोजांत दाहा लाख रुपये ऐवज, कांहीं मछदी व कांहीं सावकार व रयत व कटकची मामलत ऐसा ऐवज, नवीच कल्पना करून ठरविला. आणि आतां फौजेस देऊन निघणार, यजमानाचा बेत कीं, कैसेंहि करून यांस फसवून कामांत आणावें. हें आह्मांसी भाषण व दिवाकरपंतांसही भाषण बहुत नम्रतेनें काकळूत करून करितात कीं, तुह्मी चित्तावर घेत नाहीं तर, माझा प्राण वांचत नाहीं. मी पूर्वी सर्व प्रकारें चुकलों. ऐसें शंभर वेळ यजमानानें म्हटलें. परंतु दिवाकरपंतांची एकच जिंद कीं पुरंधरास बापूनानाकडे जाऊं. ते आज्ञा करितील तैसे करीन. तेव्हा आम्ही यजमानाच्या मर्जीकरितां बोलिलों कीं, उभयतांचीं पत्रें येथें आणवितों. आणि पत्रेंही वरचेवर तुह्मांस येत आहेत. परंतु यांचा बेत कीं, रुबरू जावें, श्रम कोणाचे केले हें सर्व विनंती करीन, रुजवात सर्वांची व तात्यांची करीन. यजमान व आह्मी त्रासलों ऐकत नाहींत, पत्रें आलीं तरी रुबरू जाऊन मग करीन. तेव्हां याला बाहेर तरी काढा, हें मात्र केलें. आतां ऐवजावर चिठ्या करून निघावें. सेनाधुरंधराचा नेट बसतां, विठ्ठलपंत तात्याजवळ होते, ते बोलाविले. ते व हे मिळून पंधरा हजार जमा होतील. महमद इसफ व इस्माइलखान व सेनाधुरंधर यांणीं गारद तोफा मोगल जाहालें. हे गनीम याकरितां रुकुनूद्दौले यांस पत्रें जावीं की, वराडास सुभा इस्माईलखानास तगीर करून दुसरा केला असेल तर तो जावा, नसेल तरी खानानें फंदास सोबत देऊं नये, अमर जाबितजंग वराडास पाठवावा. जाबितजंग व हे एक जाहाले म्हणजे अलजपुरचें खूळ तुटतें, जाबितजंग वराडांत जरूर जरूर यावा; नाहींतर मोंगल गनीमीची लढाई, नागपूर मजबूत नाहीं, शहर गालत होईल, किंवा न जाणो कैसें होईल. सेनासाहेबसुभा यांचा निश्चय शपथपूर्वक कीं, सेनाधुरंधर यांसीं लढाई हत्तीवर बसोन घेईन! हे संकट सर्वांस वाटतें. हे हत्तीवर बसोन त्याजवर जाणार. ते तो मोंगली सामान यांत पाटणकर, निंबाळकर वगैरे मोठमोठे सरदार' काळजी करतात कीं, तोफा गारद येथें नाहीं, आहे त्याचें साहित्य नाहीं. हे कसें होईल ? याकरितां जाबितजंग जरूर पाहिजे व आपणही सेनासाहेबसुभा यास वडिलपणें ल्याहावे की, आपणास रक्षून शत्रूस मारावें. हेंही जरूर ल्याहावें. वरकड येथें संचार फंद यजमान अगर कोणी याचे एक लक्ष श्रीमंत राजश्री पंतप्रधान येथील दैवत. दुसरा अर्थ नाहीं. आवांतरी आमचे संकटी आवांतर उत्पन्न जाहला, ऐसें नित्य ह्मणत असतात. दुसरा अर्थच घडणार नाहीं. हे निशा पक्की आहे. श्रीमंतांनीं रोकड वीस लाख पाठविली. धबी याजला श्रम ! पैका नाहीं! है दिवस परंतु पाहणार नाहींत. वस्ताद मसलत समयास जाऊन सांगणार आणि यजमानच एकनिष्ठ हे खातरजमा, दिवाकरपंत कायवंगमनसा बापूनानाचा नायब. हे बोलतात. करणीहि पाहतो. एकदां उभयतांस पहावें हाच मानस आहे, हेहि निशा, जाहली. एक भवानी शिवराम याची व धन्याची चित्त शुद्ध नाहीं. हें त्यांसही उमजलें आहे. आपलें आचरण आपणांस कळतें. आचरणच ऐसें दिसलें कीं, यजमान फार जाल ! फार फार अंगेज केली. नाहींतर एक दिवस निभों नये. ऐशी चाल पाहिली. यांतून न जाणों काय निघतें ? सर्वदा लक्ष आश्रय लोकांचा मोंगलांकडून कोठेंहि जोरानें कारभार असावा. ऐसें साधन चाल रीत आहे. ते एकदां सर्व आपल्याजवळ येतात. दरमियान सेनाधुरंधर मात्र आले. हा गुंत आहे. हे दरमियान नसते तर, न बोलावितां तात्याकडे जाऊन, तेथून शंभर पन्नासानिसीं पुरंधरास जावें, हे येथील मर्जी आहे. यांत सेंनाधुरंधर याचा योग पाहावा, कैसा घडतो व लढाई कैसी होती. आतां युद्धाचाच प्रकार दिसतो. हें वीस कोस असतां टाळा देतां नये. टाळा दिला तर नागपूर शहर गारद होतें. किल्ला एक गडीं नाहीं. आस्त्रा, मंडले किंवा निर्मळ दुसरा आस्रा नाहीं. कबिले समागमें घ्यावे, सरंजाम टाकावा, ऐसें संकट आहे. ज्याबितजंग मात्र असावे, अगर जे आज्ञा येईल तैसें करतील, कच्चें वर्तमान लिहिलें आहे. कित्येक आंतील बाहेरील अर्थ मी भेटेन तर सर्व निवेदन करीन. सर्व प्रकारें सेनासाहेबसुभा यांस लक्ष आपलें आहे. आपली आज्ञा तेंच मान्य, ऐसें आहे. येविसीची खातरजमा जाहली. पत्राचें उत्तर सत्वर येणें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ करावा, हे विनंति.