Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १६७

श्री मोरेश्वर.
१६९७ मार्गशीर्ष वद्य १२

विनंती उपरी. मेस्तर हेष्टन यांजकडून बंगाल्यांतून वकील कर्नेल आपटेन कलकत्ताहून श्रीमंताकडे पुरंदरास जावया निमित्त आले. दोघे मुख्य आहेत. बरोबर तीन अंबा-या, व रिकामे वोझ्याचे वगैरे हत्ती नव, एकूण बारा हत्ती, व फिरंगी पांच सातसें पर्यंत, व चार शंभर आहेत, व नेहमीं वोझीं शंभर, व हजीर बेगारीची तीस, व उंटें तटें वगैरे खडदूर शेंपन्नास आहे. सुरतेकडील इंगेरजाचा व श्रीमंताचा सलूख करून द्यावा, या अर्थी आला. बरोबर श्रीमंताकडील कारकून व जासूद जोड्या व दस्तक आहे. दस्तकावरून आह्मीं नांवे लिहून घेतलीं आणि आपणास लिहिलीं. फिरंगी भाषेचीं नांवें आहेत. रजबचें दस्तक आहे. ठिकाण सोडून च्यार महिने जाले. आणखी आठ रोजांनी पुरंधरास जातील. वैजापुरीं रविवासरीं आले. शहरींहून नबाबाकडून दर्गाकुलीखानाचा भाऊ मेजवानींची वस्त्रें व दुशाला दोन व हजार रुपये नक्त घेऊन आला. त्याकरितां सोमवारीं वैजापुरीं मुकाम जाला. आज मंगलवारीं बाबूलगांवावरून चितली ता बेलापूर येथें मुकामास गेले. मार्गी कोणास कांहीं उपद्रव किमपी देत नाहींत. जें लागेल तें पैसा देऊन घेतात. हे विनंती.