Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १६५


तेव्हां या तोडमोडींत राहून, सेवट, बाईचे बुद्धीनें बाई लुटली गेली. तीस लाख तलब देणें, याजला ते वांचली. खंडेराव दरेकर व आपाजीराव पाटणकर बाईचे मध्यस्तींत असतां, बाई चुकतां गारत जाहली. सेवट, अबरु वांचली. तात्यांनी तह केला. बाईस एक किल्ला द्यावा. वरकड साबाचीबावास पागा, हत्ती, सिलेखाना द्यावा. हा तह केला. दिवाकरपंतांनीं बाईकडून सेनासाहेबसुभा यास कराराप्रों मिळावें, ऐसें साधन राखावें, हें तात्यांनीं करून; भवानी शिवराम याचे कामांत तिडण न करावी, जें जाहलें तें जाहलें. हे इमानांत चुकले, आतां याजविसीं शपथ मजशीं करावी, कारभार यानें करावा, वडिलपणें आपण सल्लामसलत देत जावी, हें तात्यांनीं करून; निरोप दिल्हा. दिवाकरपंतांनी आक्षेप केला कीं, पुरंधरास जाऊन उभयतां बापू व नाना यांच्या भेटी मीं घेऊन येतों. तेव्हां सेनासाहेबसुभा यांनी आक्षेप फार केला, आणि तात्यांनी समाधान केलें. बहुमान केला असतां हे पुरंधराकडे पाहतात हें दिसलें. याकरितां यासमागमें वराडांत आलों. पंचवीस दिवस बाईकडे जाणें. बाईचें व नानाचे प्रेम निस्सीम जाहलें. एक जागा जेवावें. नानाचें कसें विचारावें. फारच ममता. मागील लुटणें दुःख सर्व विसरलें. बाईनीं तात्यास पत्र लिहिलें की, माझी खातरजमा नानांनीं केली, यांनीं लिहिलें कीं, बाई माझी जाहली, आतां तूट जन्मभर पडत नाहीं. हें नाना जोशी यांचे प्रत्ययास आणून दिल्हें. नानास नेऊन सर्व दाखविलें. बाईनें फौजेच्या समजाविशीं नुपर पडली तर पैका द्यावा, किल्ले द्यावे, नाना साहेबांचे सर्व साहित्य करावें. हे पुत्र ती आई, हें पंचवीस रोजांत जाहलें. हें पाहतांच, मागती काय जाहलें, नकळे, बाईकडे मी जाऊ नये. आणि बाईचा क्षोभ, मन मानें तें बोलों लागली. तेव्हां शोध मनास आणितां कारभारी यास हें असह्य जाहलें. बाईचें व नानासाहेबांचे एक, आणि जवळ मी, हे मसलतेंत असतां मीं राहणार नाही याकरितां यजमानास कळों येत नाहीं, ऐसे दर्शविलें व बाईस अनेक प्रकारें दर्शविलें, जर हे बाईकडून जातील, तर आपण बाईपासून चैरोजांत किल्ले घेईन. यजमानानीं नानास पुसिलें. त्यांनींहि संमत दिलें. हें वर्तमान आपणास कळलें, तेव्हां आम्ही तिकडील वस्त सोडून उगेच राहिलों. ऐसें दिवाकरपंतांनीं कित्तेक प्रकारें कारभारी यांच्या चुक्या सांगितल्या. त्या पत्रीं कोठपर्यत ल्याहाव्या ? दिवाकरपंतानी मसलत नासिली. नाट करावी, ते कारभारी यांनी ह्मणावें कीं, हें मीं अगोदरच केलें होतें. तेव्हां आपण व्रत धरिलें, नाना जोशी यांचे घरीं बसावें. आपणाकडे नानाचीं पत्रें गेली, तर मी नानापासी आहें, ऐसें आपणास ल्याहावें. याचें कारण कीं विरस न दाखवितां बापूची व नानाची भेट घ्यावी. मामाचे मसलतींत श्रम फार केले आळा घातला. साबाजीबावाचें व मामाचें नीट करून दिल्हें. भवानी शिवराम यास कारभारांतून काढावें, हें मामास सेनासाहेबसुभा यांनी सांगितलें. मामानींहि मान्य केलें. त्याप्रों भवानी शिवराम यास तगीर करावें. तेव्हां मींच मामाशीं अट धरिली कीं भवानीपंत माझा पुत्र होय.