Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६५
लोकांच्या बोल्या पांच पांच हजार जातीचे मनमानेशा आपल्या यादी खासगत करून द्याव्या. जितका हरामखोर सरदार फंदी तितका आपले आंगीं लाऊन घेऊन खावंद जरबेंत असावा. पैका त्यास द्यावा तेव्हा उपाय काय ? देणें घेणें त्याचेच स्वाधीन. कांहीं बोलावे, तर दिवस नाहींत. कैसेंहि करून. परंतु, एक वेळ मसलत सिद्धीस जाऊ, या अर्थीं तेंहि सोसिलें. परंतु, नागपुरीं अडीच महिने जाहले मामलत अगर कोणताही इतल्ला खावंदास नाहीं. ऐवज कोठील करावा ? आणि कोणास द्यावा ? हा इतल्ला नाहीं. हिशेब मात्र एक मास जाला ह्मणजे दप्तरदारास यादी दाखऊन जमाखर्च ल्याहावा. हे चाल आज दोन वर्षें आहे. मामा व तात्याचे विद्यमानें पांच लाख रुपये बराणपूरपर्यंत रोजमरा पावला. त्यांपैकीं नाना जोशी याचे विद्यमानें पंधरा हजार रुपये मात्र ठाऊक ! वरकड दाखला देण्याचा नाहीं. सवा लक्ष रुपये दरमहा येत असतां, दाणा घोड्यास नाहीं. उंटें मेलीं ! चार रोज तीन रोज मुदबक नाहीं ! नाना जोशी यांचे घरीं जेवणें. अगर तात्याकडे गेलों, तर तेथें जेवणें. चौं रोजा आड मुदबक व्हावा. हें वर्तमान आईकोन मुस्ताक जाहलों, सवा करोड़ रुपये बारा हजार फौजेस दोन वरसांत वसूल असतां, हा गजब ! तेव्हां यजमानांचे सर्व आइकून कारभारी यांस पुसिलें. त्यांनी विजातीय कांहीं सांगितलें. ते पत्रीं काय ल्याहावें ? यजमानाच्या बोलण्यास दाखला पडत चालला. तेव्हां खातरजमा जाहली. पुढे सेनाधुरंधर आमजेरावर आले. लोक डे-याजवळ एक नाहीं ! खाविंद एकला ! याची तजवीज कारमारी उभयतांस पुसिली. तरी उभयतां एकांत एक नाहींत. रा. भवानी काळो याजकडे फौजेची समजाविसी लोकांची हजिरी हिशेब पांच सात वर्षांचा आला. ते लोक मातबर. बोल्या करून भवानी शिवराम यांनीं आपणाकडे आले त्यास पैका द्यावा. भवानी काळो याजकडे यादव, पांढरे वगैरे यांस पैका न द्यावा. तेव्हां कुल सरदारांची झोड, श्रावणमासाच्या दक्षणेसारखी दोन रुपये अधिक तिकडे ब्राह्मणांनी जावें ! हे चाल दोन वरसें चालत आली. रा भवानी काळो यांस तगीर करावे, आपल्या कामांत यांनीं न बोलावें, हे केलें. घरीं बसविलें. तेव्हां राजश्री सेनासाहेबसुभा यांस बोलणें प्राप्त झालें. कोणचि राहिलें नाही. पुढे संदेह. न जाणो काय होतें ! एक यादव मात्र यांचे पक्षीं राहिले. तेव्हां राजश्री सेनासाहेबसुभा यांनी संमंध, एका बाणदारांचें जमातदारास कामावर न घालतां बिडी घातली इतका संमंध, लाऊन आपल्या जिवावर आलें. पोटकरारी करावी. भरावें ? पागोटें टाकिलें. मोठा त्रास केला. हें आयकोन धांवोन गेलों, समाधान केलें तों भवानी शिवराम याचे गार्दी व लोक मिळाले. हें वर्तमान आलें तेव्हां मारनिले यास घरास लाऊन दिल्हें. भवानी शिवराम याचें बिनसलें, तेव्हां आह्मी व राजश्री नानाजोशी ऐसे राजश्री दिवाकरपंत दादा यांच्या घरास गेलों. त्यांसीं भाषण केलें.त्यांनीं मागाहून कथा सांगितली कीं, मीं नागपुरीं असतां मजला चारसें लोक पाठवून गेले. मामांचा व यांचा युद्धाचा समय ते वेळेस पोहोंचलों. मामांची व यांची भेट, केली. पुढें मामांनीं कांहीं खुणेच्या गोष्टी सांगितल्या. त्या आधारावर मामाजवळ जाऊन राहिलों, सेनासाहेबसुभा रघोजी बावास जाहला असतां, कटेश्वरीं गंगातिरीं मामांनीं गंगेचें उदक गंगेंत बसोन राजश्री सावाजी वावाच्या हातीं घातलें कीं, सेनासाहेबसुभा तुह्मांस दिला, ऐसें इमान देऊन मग मसलतेच्या रीतीनें भवानी शिवराम व जिवाजीपंत फडणीस व दिवाकर पंत यांस सांगितले कीं, दर्याबाई मुलास घेऊन जात होती ते मोठ्या प्रेत्नें रा त्रिंबकरावपंत वर्तक व पत्रें पाठऊन आणिली. तिणें यादी पाठविली होती. ते करार करून दिल्ही. तेव्हां ते आली. नाहीं तर इंदुरावर गेली होती. नागपुरास जाती.