Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १६४

श्री ( नक्कल )
१६९८ अश्विन वद्य ५

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार, सुा सबा सबैन मया व अलफ, कोकणांत गांवखेडी भरलीं आहेत. त्यास, तुमचे लष्करीचे लोक उपद्रव लावतील, लुटतील, जाळतील व भातें आणून चारितील, तेव्हां बाकी राहणार नाहीं. सरकारची मोठी नुकसानी होईल. कोंकणांतील किल्लेकोटाचा खर्च भारी. त्यांचे बेगमीचा ऐवज कोंकणीचाच. कोंकण खराब जाल्यानें ऐवज हुजुरून पाठवावा असें होईल. त्यास, ओढीमुळें हुजुरून बेगमी होण्याचा अर्थ समजतच आहे. तेव्हां, किल्याकोटाच्या बेगमीवांचून गळाठा होईल. याजकरितां कोंकणास काडीमात्र उपद्रव लागों न देतां, आबाद राखिलें पाहिजे. ऐशियास, तुह्मी आपले फौजेस वरचेवरीं निक्षून ताकीद करून, रयतेस व रयतेच्या घरादारांस, शेताभातास किमपी तोषीस लागों न देणें. जे इरामखोर तोतियास मिळाले असतील, त्यांचें पारपत्य केल्यास, पैका घेतल्यास, चिंता नाही. तसे आढळल्यास करणे. वरकड रयत गरीब व कोंकण ह्मणजे केवळ सरकारचा खजाना. त्यास उपसर्ग लागलियाने सरकारनुकसान फार आहे. दुसरें, फौज लूट करील, तत्रापि रोजमुरा सोडणार नाही. याजकरिता काडीमात्र उपद्रव न लागे असा पक्का बंदोबस्त करणे. रखवाली करवीत जाणे. ऐसे करितां जो ताकीदीस न ऐके, त्याचे पारिपत्य करावयाची मुरवत न धरणे. जाणिजे. छ १७ रमजान बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.