Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६५
श्री. १६९७ कार्तिक शुद्ध १२ नंतर
.......... तीन पत्रें आपलीं वरचेवर आली. तेथें राजश्री......सेनासाहेबसुभा यांनीं जलदी करून आपले फौजेंत यावें. श्रीमंत नेमल्या स्थळास येतात. उभयतां सरदार समागमें आहेत. चिंता नाहीं. परंतु श्रीमंताची बुध शास्वत नाहीं. याजकरितां जलदीनें यावें. वे राजश्री हैरीपततात्यांचींही पत्रें एका रोजाचे अंतरानें याजप्रकारें येत गेलीं. तेव्हां राजश्री सेनासाहेबसुभा यांजकडे दररोज जावें. कारभारी यांसीं बोलावें. कारभारी यांणीं उत्तर करावें कीं, ऐवज तयार जाहला, करितों, निघतों. तें प्रमाण वा. टावें. जेव्हां राजश्री सेनाधुरंधर व महमद इसफ, सात हजार फौज तीन हैजार गारदी व तोफा चार घेऊन, अलजपुरींहून निघाले ते नागपुरावर चाल धरून वीस कोस अलीकडे आले. नागपूर पन्नास कोस राहिलें. त्यांनीं जुने फौजेची समजावीस काढून नवी फौज आणीक मेळवून आले. तेव्हां येथें गलबल फारच जाहली. मसलत ठहरली कीं, राजश्री सेनासाहेबसुभा यांनीं डेरादाखल व्हावे. पुढें अस्त. मुहूर्तही नाहीं. याकरितां, छ १० रमजानीं
डेरेदाखल जाहले. तों डेरे मात्र उभे करून सारवान, फरास, खास चौकीचे गारदी, खिजमतगार यांपैकी दोनसें मनुष्य के पंचवीस जासूद आणि खांसी त्या माणसांत रोजमुरा नाहीं. मारेकरी यांचे बजिन्नस कागदच पेशजीं सांपडले, घरचा फंद ! कोणाचा प्रकार कैसा, हे कसें समजावें. गांवांतच मारेकरी असलियास कैसें वोळखावें ? खांसा, तर, हवेलींतून बाहेर आले आणि दशा, तर, या प्रकारची ! पांच राऊत डे-याजवळ कोणाचे उतरत नाहीं. तेव्हां भास ऐसा जाहला कीं, हा फंद सर्वांचा एक जाहला. काम नासेल. तेव्हां कारभारी राजश्री भवानी काळो व भवानी शिवराम यांजला हें काय, ऐसें पुसिलें, त्यांनीं सांगितलें कीं, दों वर्षांचा गळाठा, लोकांस पोटास नाहीं, नागपुरांत वाणी उच्यापत देतात त्यावर लोक आहेत, बाहेर निघाल्यास पैका घेतल्याखेरीज एक समागमें येणार नाहीं, पैका तर दिसेना. तेव्हां सरदारी बुडाली हें परिछिन्न वाटलें. कारभारी यांनी तों साफ सांगितलें की, ऐवज नाहीं, सावकार बुडाले, रयत बुडाली. यजमानाजवळ खासगत दौलतीपैकीं वीस लाख रुपयाचें सोनें व रुपें होतें. तें कुल कारभारी यांनीं, अलजपुरावर गुदस्तां रावसाहेबांचें वर्तमान आलें त्या गर्दींत लोकांनीं गवगवा केला, त्या संधींत कुल ऐवज भरतीस घातला. तेव्हां ओला होऊन घांट चढले. पुढें राजश्री मामांच्या यांच्या भेटी जाहल्या. ते समईं मुलखांतहि पैसा घेतला व सरकारांतूनहि खर्चास मिळालें. त्यामुळें ते दिवस गेले. हालीं तों खासापासीं एक रुपाया नाहीं. पुढें उपाय काय ? सेनाधुरंधर तों दरमजल अमजेरास तीन कोसांचा तफावत राहिला. येथें, तर, तरतूद नाहीं. शहरांत गर्दी जाहली. उमज पडेनासा जाहला. कारभारीयांचे व यजमानांचे आंत आंत पाहिलें तर परस्परें विक्षेप. याचें कारण मनास आणितां, दौलतीचा नाश जाहला. आजपावेतों सवा करोड रुपये रोकड व मुलूख दाहा हजार फौजेस दों वर्षांत खर्च जाहला. व सात लक्षाचें कापड, चाळीस हत्ती, दोनसें घोडे खासे इतका वसूल लोकांस पावोन, पांच पांचसें माणसांचा एकच गोंधळ ! धरनी ! उपास ! कारभारी यांनी एका दिवसा आड जेवणें. धन्यास दोन प्रहर रात्रीस अन्न मिळावें. खासे यांची ही दशा ! कारखाने घोडीं उपाशीं ! दाम नाहीं. हत्ती बारा पंधरा ते दोन दोन मुछदी यांनीं रतीब द्यावा. उंट दाण्याविना तीन चारसें मेलें, ऐसें वर्तमान मुख्यांनी सांगितलें, तें आईकवलें नाहीं. तेव्हां विनंती केली कीं, हा इतल्ला कैसा दिला नाहीं ? याचें उत्तर केलें कीं, पठाण दोन हजार व मराठे ऐसे आपले मलईंत मेळऊन त्या लोकांनी रामरामास येऊं नये, सलाम करू नये, समागमें चालूं नये. कांहीं विषादानें बोलतात. ते कुल मिळोन धरणें बैसावें. उपास पाडावे. तेव्हां खुशामत करावी. ह्मणतील तें आईकावें, तेव्हां उठावे. करारमदार करून घ्यावें.