Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठी धातुकोश
आढ १ [ आढ्य ( ना.) आढ्यता बाणणें, दाखविणें.
-२ [ आ + धि ६ धारणे { धि = ढ } ] आंबे आढणें ( आढींत पिकण्याकरितां ठेवणें ) इतर रूप-आढव
-३ [ आ + घ्यै १ स्मरणे { आध्यै = आढ } ] ताठ होणें, अडणें.
आढव [ आ + धि ६ धारणे ( णिच् ) धायय = आढव ] आंबे आढवणें. ( आढ २ पहा )
आढळ आढळणे. ( या धातूची माहिती लिहिलेली चिठी सांपडली नाहीं.)
आण १ [ आ + नी १ प्रापणे ] जवळ नेणें.
-२ [ आह्वानम् - आणाणँ - आणणें ] उ०- राजानें अमात्याला आणून = राज्ञा अमात्यं आहूय.
-३ [ आ + अन् , अण् २ श्वसने ] श्वासोच्छ्वास करणें. ( नाम ) ] आणि = श्वास.
उ०- तैसी जाणीव जेथ न रिगे। विचारू माघौता वाउलीं निगे ।
तर्क आणि ने घे । आंगीं जेयाचां ॥ ज्ञा. ७-५
-४ [ ज्ञा ९ ज्ञाने { ज्ञा - जाना - आण - ( सविकरण ) } ] मनांत आणतो - मनसि जानाति.
आणव [ आ + नी - ( णिच् ) आनायय - आणव, आणाव ] इतर रूप - आणाव
आणाव [ आ + नी ( णिच् ) आनापय = आणाव ] ( आणव पहा )
आत [ आ + अत् १ संततगमने अतति ] व्यापिणें.
आतळ [ हस्ततल ( ना. ) { हस्ततल = हत्तल ( वर्ण लोप ) = पूर्व स्वर दीर्घ = आतळ } ] स्पर्श करणें, चोरी करणें. इतर रूपें - हातळ, हाताळ.
आताट [ आ + तट् नाशने (णिच् ) ताटयति ] नाश करणें.
उ०- तैसें आज्ञान आताटुनीयां । ज्ञान एत एत उवायां ।
ज्ञाना ज्ञानें गीळुनियां । ज्ञानचि होय ॥ अमृतानुभव १९१
आतार [ आ + तृ १ प्लवने { णिच् । आ + तारय } आतार्यते ] उद्धरणें.
उ०-जेव्हलि तुवां देखिले । माझां वदनिं पडिले ।
तेव्हांचि एयांचें सरलें । आतारिती सुखें ॥ ज्ञा. ११ - ४७१
आतुड १ [ आ + तुड् १ संयोजने सान्निध्ये ] जवळ आणणें, प्राप्त होणें, सांपडणें. कर्मणि-आतुड्यते-आतुडे. उ० गुरुभजनीं आतुडे । ब्रह्मज्ञान विशेष पैं । ज्ञा.
-२ [ आ + तुज् १ आदाने लाभे { तुज् = तुद् = तुड् } ] मिळविणें, सांपडणें.
-३ [ आतृद् १ हिंसायाम् छेदने { आतृद् = आतुड; ऋ = उ; द् = ड् } ] छेदणें, फोडणें.