Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

मुख्यत्विं नामांकित ।। सांगितलें जे ऋषि प्रतापवंत ।।
जे चाळक श्रृष्टिमाजि समर्थ ।। वित्पन्न सर्वश्र्वी ॥ ९ ॥
जयांचा आधार सर्वांसि ।। धर्मस्थापना जयां पासी ।।
त्यांचिया उत्पन्नतेसी ॥ निंदी ऐसा कवण असे ॥ १० ॥
ज्यांची स्थापित कर्मे ।। तीं चालति शुद्ध नेमे ।।
तीं कवण ऐशीं भविष्योत्तरपुराणें ।। साकल्य आहेत ॥ ११ ॥
त्यातिल हा एक अध्याये ।। जेथें सांगितला सूर्यवंशशोमवंशसमुदाये ।।
क्षेत्र पवित्र ऋषि अनुभवपर्व ।। भविष्यार्थ बोलतों ।। १२ ।।
कृता त्रैता द्वापार कलि ॥ एकाकि एक चाललीं ।।
परि रुषिवाक्यें राहिली ॥ युगा युगा ठाईं ।। १३ ।।
प्रथमवर्ण ब्राह्मण ।। जो सर्वशास्त्रिं निपुण ।।
तयासि हा चि अवगुण ।। प्रतिग्रहकार यत् ॥ १४ ॥
ऋग् यजु साम अथर्वण ।। ऋग्वेदा अष्ट भेद जाण ।।
शाहासि भेद यजुर्वेदा लागोन ॥ वेदि निवाडा असे ॥ १५ ॥
त्या परता क्षेत्रिवर्ण ।। जो क्षेत्रधर्म दारुण ।।
मंत्रविद्या रुषि पासुन ।। शिष्यवर्ग म्हणोन पावले ॥ १६ ॥
ते क्षेत्रि कवण कवणा पासुन ॥ सूर्य सोम दोघे जण ।।
सोमवंशउत्पती येथुन ।। सांगतों आतां ॥ १७ ॥
ब्रह्मदेवा पासोन अत्रि जन्मला ।। तया पासोन सोम जाला ।।
तो वंश वृद्धि पावला ।। कवणे परी ॥ १८ ॥
चंद्रा पासाव बुध ॥ १ ॥ बुधा पासाव पुरुरवा ॥२॥ पुरुचा दक्ष ।।३।।
दक्ष पुस्करदिपी रहिवास ।। जो क्षेत्रि महाराजस ।।
अजिंत सर्वासि सुरस ।। नांदत असे ॥ १९ ॥
तयांसि कन्यारत्न जालें ।। आदिती नाम ठेविलें ॥
कोटिदिनकरतेज फांकलें ॥ महास्वरूपता ते ॥ २० ॥