Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
तयाचे अगणित महिमान ।। सर्व क्षेत्रि जयासिं शरण ।।
तेथे सूर्याचि आंगवण ।। पुरु सके ॥ २६ ॥
मंत्रविद्या संपूर्ण ।। युद्धी महादारुण ।।
पवाडे बंदिजन ।। म्हणति ज्याचे ।। २७ ॥
सूर्य जिंतिला क्षण न लगतां ॥ शरण म्हणोनि रक्षिलें आदित्या ।।
मग सुलक्षणा अर्पिली दुहिता ॥ श्रावणा लागी ।। २८ ॥
तेथोनि सोमवंश आधार ।। धरिला असे साचार ।।
परंपरा भविष्योत्तर ।। सांगतसे ॥ २९ ॥
सोभद्र १ परीक्षिती २ भीम प्रदिप्त ३
शांतन ४ विचित्रवीर्य ५ पंडु ६
अर्जुन ७
पांडवकथा अनुपम्य ।। अनुपम्य वदला ऋषिवर्य ।।
शोमवंशि नृपवर्य ।। महाक्षेत्रि दारुण ।। ३० ।।
ज्यांसि कळिकाळ शरण ।। क्षेत्रधर्मि निपुण ।।
ज्यांसि साह्य नारायण ।। सर्वार्थि तीष्टत ॥ ३१ ॥
बळाढ्य भीमा सारिसा ।। कवण पुरे तयाचे आयासा ।।
मुशळ गदा अतुल्य बहुवसा ।। प्रचंड जी हे ।। ३२ ॥
तैसा च अर्जुन शुभट ।। जो क्षेत्रिया माजि मुगुट ॥
हनुमा ध्वजस्तंभि नीकट ।। पणि जिंतिला ।। ३३ ।।
जेण्हे अधोदृष्टि वींधिलें चित्र ।। श्रुभद्रा जिंतिली पवित्र ।। ३३ ।।
अभिमन्य तयाचा कुमर ।। त्याची परंपरा ।। ३४ ॥
जे नांदति हस्तनापुरी ।। त्याची परंपरा चालली अवधारी ।
ते कथा सांगितली कुसरी ।। भविष्योत्तर पुराणी ॥ ३५ ॥