Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
माता अदिति सुंदरी ।। पिता कश्यपऋषि अवधारी ।।
वामने बळी घातला पाताळी ॥ मही रक्षिली ।। २३ ।।
ऐसा हा वामनप्रवतार ॥ साक्षांत ब्रह्म साकार ॥
ब्रह्मचर्य वेदाक्षर ।। निपुण सर्वस्वीं ।। २४ ।।
वैशाखशुद्धतृतिया ।। परशराम जन्मला क्षत्रिय निर्दाळावया ॥
माता रेणुका गुणालया ॥ पिता जमदग्नि ।। २५ ॥
सावा अवतार परशराम ॥ जो साक्षांत परब्रह्म ।।
अवतरला नारायण ॥ धर्म रक्षावया ।। २६ ।।
सातवा अवतार श्रीराम ॥ माता कौशल्या निधान ।।
तया उदरी ब्रह्मपूर्ण ॥ स्वयें आपण अवतरले ।। २७ ।।
दशरथा आनंद जाला ।। श्रीराम पाहे वेळोवेळा ॥
लावण्यरूप सांवळा ॥ अनुपम्य साजिरा ।। २८ ।।
चैत्रशुद्धनवमी ।। अलक्ष रूप जयाचें अवतरलें मेदिनी ।।
देखोन संतोष सर्वांचिया मनी ॥ श्रीराम परमानिधान ॥ २९ ।।
लावण्यरुपाचि मुस ।। कळे बाणला राजस ।।
उपमा न ये देतां तयास ।। श्रीराम दृदयां सदृढ धरावा ॥ ३० ॥
आठवा अवतार श्रीकृष्ण ।। देवकी उदरी जन्मला जाण ॥
श्रावणवद्यअष्टमी बुधदिन ॥ अवतार आठवा जाला ।। ३१ ।।
वसुदेव पिता देवाचा ।। एक म्हणति देव नंदाचा ॥
ठाव नाहि मायबापाचा ॥ अकुळी साचा श्रीकृष्ण ॥ ३२ ॥
तयासि कुळ ना गोत्र ॥ शाखा ना प्रवर ।।
स्वयें साक्षांत ब्रह्माकार ॥ देवादिदेव ।। ३३ ॥
तयाचें विंदान सांगतां ।। विस्तारें जाईल कथा ॥
म्हणोन तयाचे चरणी माथां ।। ठेविला भावें ॥ ३४ ॥
जो साक्षांत ब्रह्म सदोदित ।। आठवा अवतार श्रीकृष्णनाथ ॥
तयाचे चरणाचि मज आर्त ।। हृदई स्फुर्ती हरिनामें ।। ३५ ॥
नवम अवतार बोध्यरूप ।। माघशुद्धनवमी जन्मतिथ ।।
माता लिळावति आद्यवंत ।। पिता व्यासऋषी ॥ ३६ ॥