Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

D Fraser in a book publisbed this year gives a photograph of a brigand buried alive by order of a governor of Ispaban; the present writer had an interview with another persian governor in 1901, who was said to have cut a prisoner to pieces, and a photograph is said to have been taken of the same process in the market-place of a Persian city. In independent Moslem states such practices were common; to our sensitive minds the perusal of most chronicles in Moslem languages is in consequence harrowing. Hand-cutting, wbich is the legal punishment for theft, can scarcely be regarded as other than mutilation, and it is strange that the Prophet should have paintained it. That this still exists in Persia is attested by travellers: "Such horrible punishments, ” says Miss Ella Sykes (in I910), as being plastered up alive, being crucified or blown from a cannon, are practically punishments of the past; but a petty thief is still liable to have his hand severed." The punishment assigned by law for abandoning Islam is death. सोम देसल्या वर असा सूड उगविल्या नंतर, भागडचुरी मलिकाच्या जोरा वर देसलकी करूं लागला. तो देशांतील रयतांना मान्य हेाई ना. चहूं गावींचे भलेभले लोक एकत्र मिळून पापरुताचा मुलगा दादरुत देसला यास भेटले. भागडचुरींचा भाऊ कमळ. चुरी याज वर हल्ला चढविला. भागडचुरी हरबादेवीच्या यात्रेस गेला होता, त्याला गांठून घायाळ केलें. भागडचुरीनें कांदरडाह्यांत उडी घेतली. तेथें होडी वर गोम तांडेला होता. गोम तांडेल्यास सीमल म्हात-यानें भागडचुरीला मारण्यास सांगितलें. जर आपली कन्या देशील व जातींत घेशील तर मारतों, म्हणून तांडेल्यानें उत्तर केलें. तें सीमल म्हात-यानें मान्य केलें. तेव्हां गोम तांडेल्यानें भागडचुरीस वर्मी पालकोयती हाणिली आणि पाण्यांत उडी टाकून वल्ह्याचा चुडा मारिला. भागडचुरी मुक्ती पावला. कामगिरी बद्दल, गोम तांडेल्यास देसल्यांनीं आपल्या जातींत घेतलें व दरण्याची कन्या दिली. गोत्र कश्यप ब्राह्मणीं दिधलें.

२५. भागडचुरीचा असा अंत झाल्या वर निका मलिकाला लोकांची मोठी जरब बसली. लोकांच्या तंत्रानें थोडे बहुत वागल्या खेरीज निभाव लागणें कठिण असें जाणून, वृत्त्या, मानपान, वगैरे ज्यांच्या त्यांज कडे निका मलिकानें जाहीर रीतीनें चालू केल्या, इतकें च नव्हे तर नागरशाच्या माहीमच्या गादी वर नागरशाचा पुत्र लाहूरशा यास बसविलें, लाहूरशानें माहीमास राज्य नऊ वर्षे केलें. पृष्ट ५० त नऊचा आंकडा नकलकारानें बरोबर लिहिला आहे, परंतु पृष्ट ६२ त दोहोंचा आंकडा चुकीचा दिला आहे. लाहूरशाच्या नऊ वर्षांच्या अमदानी नंतर, निका मलिकानें माहीमचें राज्य शक १२७९ त नायत्या राजांच्या स्वाधीन केलें. हे राजे मूळचे प्रतिलोभ हिंदू होते, परंतु ते पुढें मुसलमान बनले. जन्मानें व कुळानें देशी आणि धर्मानें मुसलमानी असे हे दुरंगी राजे हिंदू देसल्यांस हि मानवले व निका मलिकास हि आवडले. ह्या नायत्या राजांची वंशावळ बखरकार येणें प्रमाणें देतो:-