Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
चांद्रसेनीय ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ चांद्रसेनिसंबंधक जो तो. चंद्रसेनस्य अपत्यं चांद्रसेनिः असा चांद्रसेनि या शब्दाचा अर्थ होतो. चंद्रसेन नामें कोणी राजा. त्याचा पुत्र चांद्रसेनि. तत्संबंधक जो तो चांद्रसेनीय. चांद्रसेनीय कायस्थ म्हणजे चंद्रसेन राजाचा पुत्र जो चांद्रसेनि त्याचे कायस्थ म्हणजे कुळकरणी. हा चंद्रसेन राजा कोण ? उत्तरकोंकणीय शिलाहारांच्या वंशांत अगदीं शेवटलें नांव सोमेश्वर शिलाहाराचें येतेंह्. हा सोमेश्वर शिलाहार शक ११७१ व शक ११८१ त हयात होता. ह्याचा प्राण व राज्य यादव चक्रवर्ती जो देवगिरीचा महादेव (शक ११८२-शक ११९३) त्यानें घेतलें. सोम म्हणजे चंद्र व सोमेश्वर म्हणजे चंद्रसेन. सोम, चंद्र, इंदु, शशांक, हे एका च नांवाचे व अर्थाचे प्रतिशब्द ग्रंथकार व कवि सररहा योजत. असें दिसतें कीं सोमेश्वर ऊर्फ चंद्रसेन शिलाहारानें आपल्या पुत्राच्या अधिकारी खालीं, इतर सर्व आधार सुटल्या वर, कायस्थां करवीं आपला राज्यशकट चालविण्याचा उपक्रम केला. सोमेश्वर शिलाहाराचे सर्व अधिकारी कायस्थ जातींतील व्यक्ती झाले. कायस्थांच्या साहाय्यानें सोमेश्वर शिलाहार राज्य करीत असतां, त्याचा प्राणान्तक पराभव महादेव यादवानें केला. त्या वेळीं सोमेश्वराच्या ताब्यांत पेण, पनवेल, महाड इत्यादि कोंकणप्रांत राहिला होता. माहीम वगैरे उत्तरे कडील प्रांत नागरशा कडे हेाते. सोमेश्वराच्या पेण, पनवेल, महाड या प्रांतांत कायस्थ जे एकदा स्थापित झाले ते अद्याप पर्यंत त्या प्रांतांत बाहुल्यानें वसती करून आहेत. महादेव यादवानें सोमेश्वर शिलाहाराचें राज्य खालसा केल्या नंतर, रामचंद्र यादवाच्या कारकीर्दीत बिंबदेव यादव आपल्या पातेणे सरदारांस घेऊन माहीम प्रांत आक्रमून राहिला व कायस्थांची जागा पातेण्यांनीं भरून काढिता झाला. सोमेश्वर शिलाहाराच्या कारकीर्दीस कायस्थ लोक गांवोगांवचे दहा पंधरा वर्षे प्रभू म्हणजे इजारदार व मोकाशी झाले होते. त्यांच्या जागीं बिंबदेवाचे पातेणे सरदार तीस चाळीस वर्षे प्रभू झाले. ठाणे, पेण, चौक व महाड या च लहानश्या टापूंत चांद्रसेनीय ऊर्फ सोमेश्वरीय कायस्थ प्रभू कां सांपडतात व माहीम प्रांतांत च तेवढे पातेणे प्रभू कां सांपडतात, ह्या बाबींचा खुलासा हा असा आहे. कायस्थांचें व पातेण्यांचें विळ्याभोपळ्या एवढें सख्य कां त्याचा हि उलगडा वरील तपशिला वरून उत्तम होतो. कायस्थांचें पातेण्यांनीं उच्चाटण केल्या मुळें, पातेण्यांच्या संबंधाच्या लिखाणांत कायस्थां संबंधानें किंचित् उल्लेख करणें प्रसंगप्राप्त झालें. कायस्थांना येथें च सोडून, पातेण्यांच्या प्राचीन इतिहासाचा धागा पुन: धरूं. पातेणे प्रभू पैठण, चांपानेर वगैरे प्रांतांतून कोंकणांत आले ही हकीकत बखरींत आली च आहे. प्रभू हें पद पातेण्यांना केव्हां व कसें प्राप्त झालें हें हि बखरींच्या अनुरोधानें आपणास कळून चुकलें. आतां पातेणा व पाठारा हीं दोन विशेषणें ह्या लोकांच्या नांवा मागें कां लागतात त्याचा शोध करूं. सध्यां पाताणी असा उच्चार प्रचारांत बाहुल्यानें आढळतो. परंतु हा अपभ्रंश अर्वाचीन आहे. प्राचीन उच्चार पातेणा होता. पाताणा हा उच्चार खरा व प्राचीन धरून, पातानप्रस्थ ह्या ग्रामनामा वरून पाताणा व पाठारा हे शब्द व्युत्पादण्या कडे माझी प्रवृत्ति पूर्वी झाली होती. परंतुं, प्राचीन उच्चार पातेणा असा एकारयुक्त आहे, हें जेव्हां तोंडी व लेखी पुराव्यानें माझ्या ध्यानांत आलें तेव्हां पातानप्रस्थ ह्या ग्रामनामा वरून व्युत्पत्ति सिद्ध करण्यानें काम भागणार नाहीं हें स्पष्ट होऊन चुकलें. बृहदारण्यकोपनिषदाच्या चवथ्या अध्यायाच्या तृतीय ब्राह्मणाच्या परिसमाप्तीस खालील दोन कंडिका आहेतः--