Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
माध्यंदिनशास्त्री देवदत्त पुरोहित, रखमाजी कायस्थ कुळकरणिक, गंगाजी नाईक सरजमातदार, यशवंतराव सरसबनीस, हे चार अधिकारी बरोबर घेऊन तो दळभारा सह ठाण्यास प्रगट झाला. जनार्दनासि युद्ध झाले. जिंकला. मग त्या जनार्दनास च आपला प्रधान करून बिंबांचें सर्व राज्य नागरशानें काबीज केलें. नागरशा माहिमास राजमहाली राहिला. तेथें देसाई, चौगुले, चौधरी, म्हातरे, साहाणे, पाटील, हवालदार, महालदार, हाट बकाल, ब्राह्मण वगैरे सर्व मुख्य मुख्य जमवून, त्यांचे कागदपट नागरशानें तपासले, देसायांना देशाच आदाय विचारिला. चौदा परगणे, चौदा महाल, दोन खापणे असा चौफेर हिसाब रायासि रुजू झाला. उपज एकंदर १४ लक्ष सजगाण्या भरला. ज्यांच्या खतपत्रांवर
बकदालभ्यं यदा गोत्रं प्रभावती कुलदेवता
ठाणे स्थाने कृतं राज्यं मम मुद्रा विराजते
हा केशवदेवाचा शिक्का होता त्यांच्या वृत्त्या त्यांज कडे पूर्ववत् चालवून नागरशानें आपली कारकीर्द शक ११६३ त सुरू केली. देशाच्या संरक्षणार्थ नागरशानें ठिकठिकाणीं सैन्य ठेविलें त्याचा तपशील:-
चेऊल | घोडे | २००० | हत्ती | १ |
सजणगांव | घोडे | ०९०० | हत्ती | ६ |
सैलान | घोडे | ०२०० | हत्ती | ५ |
चिखलीनवसारी | घोडे | ०५०० | हत्ती | + + + |
परतापूर | घोडे | ०२०० | हत्ती | १ |
मूळगांव | घोडे | ०१०० | हत्ती | + + + |
ठाणे | घोडे | १००० ४९०० |
हत्ती | ५ ३० |
देशाचा असा कडेकोट बंदोबस्त करीत असतां नागरशास त्रिपुरकुमरनामक पुत्र झाला. तो वयांत आल्या वर, बापाच्या बरोबरीनें राज्यकारभार पाहूं लागला. नागरशानें जेव्हां कोंकणा वर प्रथम स्वारी केली तेव्हां त्याच्या दिमतीला त्याचे तीन मेहुणे होते. त्रिपुरकुमर वयांत आलेला पाहून, आपण आपली कांहीं तरीं स्वतंत्र व्यवस्था पाहिली पाहिजे असें ह्या तिघा मेव्हण्यांना वाटूं लागलें. करतां, नागरशाशीं त्यांनीं असें बोलणें लावलें कीं राजाने आपणास ठाणे, मालाड व मरोळ हीं तीन गांवें बक्षीस द्यावीं.