Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

हे राजे सविता-सूर्यवंशि कोकणि आले शाळिवाहन शके १२१५ ।। याउपर सोमवंशि त्यांचि वगत ।। छ ।। वशिष्ट गोत्र शीवदासराव पैठणा होवोन माहिमास आला।। १ ।। गोतम गोत्र + + + + + गोदापुरा होवोन कोकणि आला ठाणियां राहिला ।। २ ।। नानाभ्य गोत्र नारायण बिंबल प्रभु कोकणि आला ।। ३ ।। नारायण गोत्र भुरदास तस्य सुरदास भीमापुरा हेावोन कोकणि आला ।। ४ ।। कुशगोत्र त्रिंबक प्रभु त्रिपुरा नगरा होवोन ठाणे कोकणि आला ।। ५ ॥ भीमराज प्रभु क्षवण गोत्र माहिमास आला तेथोन परतापुरी राहिला ॥ ६ ॥ कृष्णराज पारश्वत गोत्र मुहिलि राहिला ।। ७ ।। भीमराज निळापुरा होवोन गौतम गोत्र तो नरसापुरि राहिला ॥ ८ ॥ भोज गणेश दातार भीमापुरा होवोन पारश्वत गोत्र मालाडिं राहिला ।। ९ ।। त्रिपाळराज हारित गोत्र तो कोकणि आला ॥ १० ।। भुदास प्रभु आपुले समुदाये चिंचगावा होवोन पारश्वत गोत्र तो कोकणि आला ।। ११ ।। वशिष्ट गोत्र रायेण प्रभु कोकणि आला ॥ १२ ॥ या खेरिज दालिबंद प्रभु सविता-वंशि तथा सोमवंशि बहुत कोकणि आले ।। त्यांचि नाभाभिधाने सांगतां ग्रंथ वाढेल ।। ह्मणोन मुख्य जे काहि ते सांगितले ।। या प्रकारे सेना-समुदाये व तथा सेवकजनसभवेत कोकणि आले ।। या उपरांत पंधरा माहालाचि कमाविस राया बिंबाने केलि ।। त्याची वगत ।। माहाल मालाड गावें ५७ तेथें सेना ठेविली गज २ अश्व १२००२।। माहाल मरोळ गावें ६६ तेथे सेना ठेविली गज २ अश्व १५०० ॥ त्या माहालि रायांचे सिंहासन ।। तेथे टेकरि होति तेथे राजमाहाल नावं परतापुर ॥ व ३ माहाल ठाणे गावे १७ तथा ४ माहाल पांचनदि गावें ७७ तथा ५ माहाल तळोजें गावें १४ तथा ६ माहाला पूर्णे गावे २८ एवं माहाले ६ समंध गावें १३६ ॥ मिळोन सेना हस्ति ४ अश्व २७०० ।। माहाल सायवन गावें २९ तेथे सेना हस्ति २ अश्व २७०० ।। माहाल २ मणोर गावे ३९ तेथे सेना हस्ति ३ अश्व १००० ।। माहाल ३ आसेरि गावें २४ तेथे सेना हस्ती २ अश्व १००० ।। माहाल केळवें माहिम ४ गावें २४ तेथे सेना ठेविली गज १ अश्व ९०० ।। माहाल ५ तारापुर गावं १४ तेथे सेना हस्ति १ अश्व ५०० । माहाल ६ सांजे गावें १४ तेथे सेना हस्ति १ अश्व ५०० ।। माहाल कल्याण ७ गावें १४ तेथ सेना हस्ति ५ अश्व २००० ।। माहाल ८ चेंभुरकें गावें ८ तेथे सेना अश्व ५००।। यवं गावें ४३५।। य वितरिक माहिम बिंबस्थान माहाले १५ गावें ९ ।। यवं ग्रामसंख्या ४४४ ।। या नंतरे हे गावं मोकासे सविता-वंश तथा चंद्रवंश आणि शेषवंश ।। जे यांस राया बिंबाने दिधले।। आणि कित्येक गावं सरकारा मध्यें राहिले ।। त्या मध्यें माहाले दोन मालाड आणि मरोळ त्यांचि वगत ।। माहाल मरोळा खालि गावें ६६ ॥ त्या गावांचा उपज त्याचि वगत ।। गावं मरोळास उपज सरकार-भात मुडे ३५८ त्यामध्यें राजभाग २५४ धर्म २९ सिळोतरे २७५ नगद दाम १४००० ।। १ ।। गावं कोंडिवटें उपज सरकार-भात मुडे १०३ राजभाग ८९ धर्म २८ सिळोतर २२४ नगद दाम १३०० ॥ २ ॥ गावं प्रतापपुर सरकार-भात मुडे ५३ राजभाग मुडे ३५ धर्म मुडे १८ नगद दाम १४०० ॥ ३ ॥ गावं दळघर सरकार-भात मुडे १९ राजभाम मुडे १८ धर्म मुडे १ नगद दाम ३०० ॥ ४ ।। मुळगांव सरकारभात मुडे ८८ राजभाग मुड ५५ धर्म १५ सिळोतर १८ नगद दाम ९०० ॥ ६ ॥ कडपें सरकारभात मुडे ४३ राजभाग मुडे १५ सीळोतर १८ ।। ६ ।। सांखि सरकारभात मुडे ५३ राजभाग ४५ धर्म ८ नगद दाम ९०० ।। ७ ।। + + + + + + + + + मुडे ५ सिळोतर १८ नगद दाम ९०० ।। ८ ।। तुंगवें सरकारभात मुडे ५९ राजभाग ४९ धर्मदातृत्व २ सीळोतर २८ नगद दाम १४०० ।। ९ ।। वरवेंस सरकार-भात मुडे ३२ राजभाग मुडे ३२ ॥१०॥ पावै सरकारभात मुडे ६८ राजभाग–मुडे ५६ धर्म सीळोतर ८ नगद दाम ३०० ॥ ११ ॥ तिरीदाद सरकारभात मुडे ७१ राजभाग ४५ धर्म ८ सीळोतर १८ नगद दाम १००० ॥ १२ ॥ पस्पौलि सरकारभात मुडे ११२ राजभाग ९५ धर्म ४ सिळोतर १३ नगद दाम २१०० ।। १३ ।। व्याड सरकारभात मुडे १३९ धर्म ६ सीळोतर २४ नगद दाम १५०० ॥ १४ ।। गुंडगावं सरकारभात मुडे ४७ राजभाग ४५ धर्म ४ नगद दाम ३०० ।।१५।। तुळसि सरकारभातं मुडे १५ धर्म १ सीळोतर २ राजभाग १४ नगद दाम ५४ ॥ १६ ।। साहि सरकारभात मुडे १९८ राजभाग मुडे १९ ॥ ७ ।। आसनपं सरकारभात मुडे १३ नगद दाम ७४ ।। १८ ।। मुहिलि सरकारभात मुडे ७७ राजभाग ३५ धर्म ५ सीळोतर ७ नगद दाम ९०० ।। २० ।। साहार सरकारभात मुडे १५४ राजभाग ११२ धर्म १७ सीळोतर २५ नगद दाम १४०० ॥ २१ ।। कुराळें सरकारभात मुडे १५९ राजभाग १३५ धर्म ७ सीळोतर ७ नगद दाम १४०० ॥ २२ ।। कल्याण वजदार चंद्रप्रभु सरखेल भात मुडे १२७ राजभाग १४५ धर्म १९ सीळोतर ३३ नगद दाम १३०० ॥ २३॥ किरोळ सरकारभात मुडे ६५ राजभागमुडे ६५ नगद दाम ३५० ।। २४ ॥ कोंपरें वजदार नारायणप्रभु गोत्र वाशिष्ट भात मुडे ९४ राजभाग ७५ धर्म ११ सीळोतर २८ नागद दाम ३२९ ॥२५॥ चेंभुर सरकारभात मुडे १२३ राजभाग मुडे ९५ धर्म सीळोतर २४ नगद दाम १३०० ।। २६ ।। गावं घाटलें सरकारभात मुडे २४।९ राजभाग २४।९ ॥ २७ ।। गावं बोरलें सरकारभात मुडे ९७ राजभाग ७४ धर्म १ सीळोतर २२ नगद दाम ३०८ ।। २८ ।। गावं देवनरें सरकारभात मुडे ५७ राजभाग मुडे ४२ धर्म ३ सीळोतर १२ नगद दाम ७०० ॥ २९॥ गावं मानि नामाचि सरकारभात मुडे ४०।८ राजभाग ३४ धर्म १।१८ सीळोतर ५ नगद दाम २५० ।। ३० ।।