Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
तस्मात् द्विज त्रिमूर्ति ।। ही वोळख जया चित्ती ।। तेथे असे निजशक्ति ।। तदर्धतेज ।। ६६ ।। ते गायित्री परमाक्षरा ।। ब्राह्मणासिं अर्पिली परोपकारा ॥ ब्राह्मणपदस्पर्शे मुक्ति नरां ॥ कलयुगि साक्षांत भूदेव ।। ६७ ॥ ते निरंजन शक्ती ।। ब्राह्मणासि दीधलि जगन्मूर्ती ।। आपण जाले बोध्यस्थिती ।। योगनिद्रे ॥ ६८ ॥ तदर्ध मी तुह्मासि देणे ॥ रुद्रशक्ति पूर्णपणे ।। रुद्रगायित्री ऐक्यनेमे ।। भवाब्धि तरणे ।। ६९ ॥ लोकि वर्तला अनाचार ।। तुह्मी न सोडावा रुद्र ॥ रुद्रशक्ति जप-मंत्र ॥ आचरावा नेमे ॥ ७० ॥ आणि लोपलि सर्व भक्ती ।। रुद्रलिंगे उपटोन टाकिती ।। परि तुह्मी न सांडावि गायत्री ।। रुद्रत्रिपदा ।। ७१ ॥ ऐसे बहुत अपिवत्र ॥ अदृश्य असति हरिहर ।। ऐसें सांगो तरी विस्तार ॥ होईल ग्रंथाते ॥ ७२ ।। निंदा ब्राह्मणाचि न किजे ।। स्वधर्म आपला चालविजे ।। अन्योन्य रुद्रासि होईजे ।। ब्राह्मण पुजिजे सदाकाळी ।। ७३ ।। ब्राह्मण नामे ब्रह्म पूर्ण ।। ब्राह्मण त्रिमूर्ति जाण ॥ किंवा सूर्य तत्समान ।। पुजावा सदा ।। ७४ ।। येक ब्राह्मण दुजा सूर्य ।। हे प्रळयांति राहाति द्वीवर्य ।। या ईत्तर ते सर्व म्लेंछप्राये ॥ होंत सहजें ॥ ७५ ।। हा वर्णवर्ण-भेद ॥ अवघे होति महाम्लेंछ ।। येक ब्राह्मण दुजा सूर्य ॥ प्रळयांती ।। ७६ ॥ अवघा होईल यकाकार ।। येक ब्राह्मण-वर्ण राहेल निर्धार ॥ तया उदरि कल्कि नारायण-अवतार ।। संहार करिता ।। ७७ ।। यैसें सांगुनि मुनिश्वर ॥ मग गेला तो सत्वर ।। पश्चमसागरि अधउर्ध्वाकार ।। तप करिता होये ॥ ७८ ॥ तवं येरि कडे काये वर्तलें ।। म्लेंछे फार व्यापिलें ।। क्षेत्रियांसि भये उपजलें ॥ रुषिवचनी ।। ७९ ॥ तवं काये करि आहामद ।। क्षेत्रियांसि आरंभिताहे युद्ध ।। पत्रे धाडिता होये प्रसिद्ध ।। देशोदेशीं ।। ८० ।। राज्य सांडावें सत्वर ।। नाहि तरि युद्धास यावें लवकर ।। समरंगणि राहावें स्थिर ।। क्षेत्रियानो ॥ ८१ ॥ ऐसें पाठविलें पत्र ॥ मग क्षेत्रियांसि पडला विचार ।। सांगोन गेला मुनेश्वर ॥ तरि संग्राम न करावा ॥ ८२ ॥ परि वोडलिया उचिता ।। आपुला स्वधर्म सांडितां ।। जाईजे नर्कपाता ।। ऐसिं बोलति पुराणे ।। ८३ ।। आपण राज्ये करणे ॥ तरि मरणासिं का भिणे ।। जरि जाईजे काळासि शरण ।। तरि न रक्षि तो ॥ ८४॥ मग समस्तिं करोनि विचार ।। आणि दूत पाठविती नृपवर ॥ संग्राम करणे हा निर्धार ।। म्लेछांसी ॥ ८५ ।। आह्मि मुळारंभ-क्षेत्री ।। युद्ध करणे निर्धारी ।। रणस्तंभ घातला सत्वरी ।। महास्थानी ।। ८६ ।। सत्व धैर्य मिळाले रणी ।। हंकारा केला सकळ सैनी ॥ म्लेंछ ते हि आपुले पुरुषार्थपणी ।। मिळाले युद्धी ॥ ८७ ।। मोहोरे युद्धाचा प्रसंग ॥ म्लेंछासि होईल युद्ध ।। श्रोते आईका सावध ।। चित्त देवोनियां ॥ ८८ ।। कृता त्रैता द्वापार कलि परियंत ॥ सांगितले जे क्षेत्रि वर्तले भुमंडळांत ।। कलयुगिं म्लेछ-उत्पति सकळित ।। सांगितलें ।। ८९ ।। हे पुराणिची कथा ।। स्वयें वदला ऋषिताता ।। महेशें कथिलें मुळावस्ता ।। पार्वति प्रती ।। ९० ।। तें उचिष्ट मज लाधलें ॥ ह्मणोन अन्वयें आणिलें ।। भविष्यार्थ कथिलें ।। परउपकारा स्तवं ।।९१ ।। वंशउत्पतिकथा गहन ।। प्राकृत बदलों परोपकारार्थ जाण ।। ऐकतां हरति दोष दारूण ।। श्रोतयांचे ॥ ९२ ॥ इति श्रीचिंतामणिकौस्तभपुराणे ईश्वरपार्वतिसंवादे वंशविवंचनकथानाम तृतियोध्यायः ॥ ३ ॥
समरंगणि मिळाले समस्त ॥ आले म्लेंछ हि बहुत ।। सिष्टाईं-पत्रें प्रविष्ट होत ।। येकमेकां ।। १ ।। धीःकारोन ह्मणति म्लेंछासी ।। जयो नाहि रे तुह्मासी ।। नीःपात तुमचिया वंशासी ।। होईल येथे ।। २ ।। तुह्मी दुराचारि दुर्जन ।। युद्धि कापोन रे तुमचि मान ।। या उत्तरासि अनुमान ।। नाहि तिळभरी ।। ३ ।। अरण्यी मिळालि चतुस्पदे ।। मृग रिस करिती गद्यपद्यें ।। हें घडेल काये दुर्बुघें ।। म्लेंछमंडळी ।। ५ ।। तुह्मा उपमा कायेसि दिजे । जैसि वनिची सावजें ॥ धरोनि श्रुंडादंड गजे ।। पिळोनि टाकिजेती ॥ ६ ॥ तुह्मी असा रे आपुला भुवनी ।। नांदा रे सखे सोहिरे मिळोनी ॥ सिंहनाद नाईकीला कर्णी ।। तवं परियंत अतुर्बळि बडिवार ।। ७ ।। खांबा जवंळि रक्षणाईत ।। ठेविले असति बहुत ।। परसैन्याचा करिती अनर्थ ।। ह्मणेानियां ।। ८ ।। आणि निती तरि ऐसि असे ।। शस्त्रार्थिं सांगितलि दिसे ॥ स्तंभ पुरला मग रात्रदिवसे ।। सांडो नये ।। ९ ।। जवं युद्ध उभयदळिं नाहि आरंभलें ।। तवं परियंत पाहिजे स्तंभासि रक्षिलें ।। ह्मणोन ठाणे ऐसें बसविलें ।। महाराजयाने ।। १० ।। तवं येके रात्रि जालें अपुर्व ॥ देवतें तेज सांडोनि गेलिं सर्व ॥ मध्ये रात्रि ह्मणोन रायें गर्व ।। व्यर्थ धरिला असे ॥ ११ ॥ येश नाहिं आपुला बाही ।। म्लेंछासि जयो पाही ।। रायाचा गर्व काई ।। ह्मणोन सिद्ध होये ॥ १२ ।। वाग्वाणि वचने उमटती ।। रक्षणाईत श्रवणि आईकती ।। देव्या जालि बोलती ।। तें परियेसा तुह्मी ।। १३ ॥ रायें काये हो आरंभिलें ।। वोखटें बळत्कारें आंवतिलें । दैवतें तेज टाकिलें ।। तेथे राखणे काये ॥ १५ ।। जैताचि न धरावि आस ।। संग्रामाचा सांडावा सौरस ।। यैसे कुळदेव्या बहु उदास ।। बोलिलो ते समईं ॥ १६ ।। यैसें बोलिली कुळदेवता ।। रणभुमि येश न दे सर्वथा ।। ह्मणोन तुकितसे माथां ।। वेळोवेळा ।।१७।। बहुत जालि कासाविस ।। ह्मणे ब्रह्मनी धरिला म्लेंछवंश ।। अनाचार घडला विशेष ।। अवनि वरी ॥ १८ ।। तदुपरि काये वर्तमान वर्तला ।। तो पाहिजे श्रवण जाला ।। युक्तार्थ असे कथिला ॥ प्राकृत वाणी ॥ १९ ॥ राजा राजधानि बैसला ।। प्रधान मुख्य पाचारिला ।। समर्था सह वर्तमान मांडिला ।। आला च ते प्रसंगी ।। २० ॥