Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

बाण टाकि अतिचपळ ॥ यका मागें येक प्रबळ ।। दावितसे आपुलें बळ ।। पारकियासीं ।। ६६ ।। प्रथम तो बळियाढा ।। हरिहराचा वरदि गाढा ।। तुळित हातिं मेढा ।। धडधडा टाकि बाण ।। ६७ ॥ आंता वर्तलें क्षेत्रियां कडे ।। कैसे आले विर गाढे ।। ते वर्णिजेति वाडें कोडें ।। नामे तयांची ।। ६८ ॥ येक आले गजा वरी।। येक आले रहंवरी ।। कितेक ते अश्वा वरी ।। ऐसे क्षेत्रि वर्णिले ।। ६९ ।। क्रोधाच्या उल्का सांडिती ।। महापुरषार्थे डुल्लती ॥ वारु नाचवित येती ॥ राजमंडपासीं ।। ७० ।। त्याच्या पराक्रमास नाहि मिती ।। पुढें दिसे ठेंगणि क्षिती ।। ह्मणति तुर्काचि गणणा किती ॥ धोका कायेसा ॥ ७१ ।। ऐसे उठावले रणके सरी ।। वस्त्रें ल्याले परोपरी ॥ टिळे माळा नाना कुसरी ।। धरिल्या देही ।।७२।। टिळे रेखिले कुसरी ।। चंदनमीश्रित नाना परी ।। सुगंध केशरि नाना परी ।। शोभती ।। ७३ ।। चंदनचुवा आणि बुका ।। शरीरी लेपिला बहु निका ।। वस्त्राळंकार केशरि देखा ।। केले ते समईं ॥ ७४ ॥ यैसे आले व्येष्टित फौजा ॥ शस्त्रास्त्रिं तुळिती भुजा ।। समस्ती नमस्कारिला राजा ॥ रामराणा ॥ ७५ ॥ ह्मणति आला हो अंतसमयो ।। वर्जोनि गेला आह्मा श्रीगुरुराव ।। परि युध्द न सांडावें ऐसा भावो ॥ सत्यार्थ चि करावा ।। ७६ ॥ रामदेवराजा ह्मणे सर्वांसी ।। प्रसंग वोडवला दुर्जनासी ।। रणवट बांधणे कवणासी ॥ ऐसें बोलिला ॥ ७७ ॥ मग पाहिल सर्वां कडे ।। प्रतापाचे जैसे मेहुडे ॥ बोलते जाले महावीर गाढे ।। आज्ञा करणे आह्मासी ।। ७८ ॥ तवं पाहिलें भुरदास–प्रभुसी ।। वृद्धविष्णु गोत्र जयासी ।। उपनाम वानठेकर तयासी । काये ह्मणता जाला ॥ ७९ ।। रणवट बांधणे हो तुह्मासीं ।। आरूढावें उत्तम रथासी ॥ ऐसें ह्मणोनियां तयासी ।। गौरविलें बहुतेक ।। ८० ।। कितेकासि दीधले तोडर ॥ यैसे नावाजिले विरें विर ।। प्रतापाचे जैसे डोंगर ।। आरूढले बहनी ॥ ८१ ।। शस्त्राचे घेवोनियां भार ।। मुखीं ह्मणति मर मर ।। माहामदा रणी पडो रे सिर ।। तत्काळ धरणी ।। ८२ ॥ येक क्षेत्रि महाधनुर्धर ।। येक प्रतापि महाशुर ।। बरवा करोनियां श्रृंगार ।। युध्दा लागि प्रवर्तले ॥ ८३ ।। ऐसे उठावले महाधिट ।। येकमेकांसि अलोट ।। घाये वाजति साट ।। तेण्हे भडभडां रुधिर वाहे ॥ ८४ ॥ तेणे जाला हाहाकार ।। रणि मांडला महागजर ।। विरे विर पडले थोर ।। मिरवे तोडर चरणि पैं ।। ८५ ।। खाखाईल्या रणमोहोरी ।। वाजताति रणभेरी ।। नाद उमटला अंबरी ॥ ब्रह्मकटाह होतसे ।। ८६ ।। मांदळा दिधला घावो ।। नाद अतिशयें पाहा हो ।। हा चि त्याचा प्रभावो ।। गुप्त ठावो दाखविला ।। ८७ ।। लागले डफांचे झणत्कार ।। नाना वाद्यांचे गजर ।। काहाळा वाजति गंभिर ।। तेण्हे वीर धांवती ॥ ८८ ॥ जीवित्वाची नाहि आस ।। मृत्यासि जाले उदास ।। महाउग्र सूर्यवंश ।। क्षेत्रि दारुण ॥ ८९ ।। नाचतसे रणधेंडा ।। सीरे होत सेर गण्डा ॥ येक धरोनियां सोंडा ।। हस्ति पेलिती ।। ९० ॥ शस्त्रें वाजति सणसणा ।। बाण सुटती झणझणा ।। तुर्क बहुत आले रणा ।। मृदघटप्राये ।। ९१ ।। क्षेत्रिवंशि राज्यधर ।। महाभारि रणरंगधिर ।। युध्दी भिडति तुर्क अश्वार ।। येकमेकां ।। ९२ ।। माजले रणकेसरी ।। कुंजर घालिती उदरी ।। ऐसि होतसे झुंझारी ।। महामारि मीसळले ॥ ९३ ।। गर्जति क्रोधाच्या बळें ।। घाव हाणति महासळें ।। रणा माजि देति उफाळे ।। वेळोवेळा ।। ९४ ।। पाचारिलें तुर्का आमदासी ।। क्रोधें गिळों शके आकाशी ।। तेथे तुं कोण मज पुढा होसी ।। अमंगळा पापिया ।। ९५ ॥ उडगणा माजि शशी ।। तैसा रामदेवराजा रणमहिसी ।। वर्षला अमित्य बाणासी ।। तुर्का वरी ॥ ९६ ।। घाव हाणति नगारा ॥ भेरिया वाजति सैरावैरा ।। तेणे पडिला भेदरा ।। म्लेंछासीं ।। ९७ ॥ तवं धार्विनला हुशैन ।। बंधुसि आला टाकोन ।। मांडलें युध्द दारुण ।। रणभुमिसां ॥ ९८ ॥ दोन्हि येकवटले सोहोदर ॥ पराक्रमे अतिसुंदर ।। रणी महादुर्धर ।। आड घातलें तेही ।। ९९ ।। हसनाचा यावा सांभाळिला ॥ समुधें वरिच्या वरि तोडिला ।। आपण फिरोन पाचारिला ।। धिरा राउता ह्मणोनी ॥ १०० ॥ दोघां मांडलें निर्वाण ॥ सणसणा वाजति धनुष्यबाण ।। मारिति अतिनीर्वाण ॥ येकमेकां ॥ १ ॥ ऐसें होतसे उभयता झुंज ।। समुधाचा बाण जैसि विज ।। नावेक हृदयांबुज ।। दुखवलें जाणा ॥ २ ॥ तेणे वींधिला सुमध प्रधान ।। मुर्छना आलि तया लागुन ।। तें देखोन चित्र धावोन ॥ आला जवंळी ।। ३ ।। चित्र ह्मणे हसनासी ।। बहु मिरविता पाइकिसी ।। जवं देखिला नाहि शशी ।। तवं प्रकाश उडगणाचा ॥ ४ ॥ मातंगा वरि जैसा केसरी ।। तैसा हुसेनासि क्षेत्री ।। भयभित होउनि वगत्रीं ।। काळिमा चढली ।। ५ ॥ मग चित्रें वधिला हुसेन ।। सैन्या माजि प्रताप गहन ।। पारके विर पळवोन ।। चित्र विजय जाला ॥ ६ ॥ छेदिलें हुशेनाचें सिर ।। रणतुरे बाजिंनलि अपार ।। तवं धाविंनले महाविर ।। माहांमद -तुर्काचे ॥ ७ ॥ तेथे जाला आवर्त ।। येकमेकांते पाचारित ॥ हलकालोळ रणात ।। मांडला तथे ॥ ८ ॥ माहांमदाचा बाप अल्ली ।। सवा मणाचि फिरंग तोळिली ।। हाहाकारें बोंब केली ।। ह्मणे हारपलें पुत्र माझें ।। ९ ॥ यैसे दोनि वधिले सहोदर ।। महापराक्रमि अल्लिचे कुमर । रणि पडले ह्मणोनि उत्तर ।। स्त्रियेसिं काये द्यावें ॥ १० ॥