Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
राया नागरशा कडे देशले देसाये पाटेल पाटल्हारे खुमनासिर रयेत या सर्वांहि पूर्विच भेद कला होता ॥ तेणे करोन प्रतापस्या रायाचा पराजयो पावला ।। त्या वरोन राया नागरस्याने सर्वा पाटला देसायाला रयेतिला उचित देणे दिधलीं ।। देसायांस अश्व दिधले ।। कोण्हास हस्तकंकणे ॥ कोण्हास सुवर्णसांखळिया दिधल्या ।। या प्रकारें उचित देणी दिधलीं ।। या प्रकारें राया नागरस्याने विना कष्टि राज्य स्वहस्तिं केलें ।। शके १२५४ मध्यें वर्षे १५ पावेतों नागरस्यान राज्य केलें ।। शालिवाहन शके १२६९ पावेतों ।। त्या नंतरे सोमवंशि क्षेत्रियाहि बहिस्कृत केलें व रायाने त्यांसि दंडिलें ।। तें चि ऐसें ।। जें राया नागरस्याचा पाळकपुत्र जईतचुरि होता ।। त्याचा पुत्र नामे भागडचुरि ।। द्वालिबंद नाईकवडा येशवंत होता ।। बहुतां युद्धा मध्ये जयो पावला ।। हाणोन रायाने सेनाधिपति केला ॥ तेणे किती येक कार्ये रायाचि बहुते प्रकारें उतमान्वयें यथापुरषार्थि सिद्धि पावविली ॥ ऐसें जाणोन राया नागरस्याने साष्टिचा कारभार दिधला ॥ तेणे करोन भागडचुरि आपलि स्वतासी कामाविस करों लागला ।। त्या नंतरे सेताचि मोजणि केलि ।। काठि हात ७ सात करोन जमिन मोजिली ।।१२॥ काठियांचा बिघा १ येक त्यास धारा ।। २ बिघे यांसि हारा १ त्याचे फरे ४ राजंरयतेने दिवानास द्यावे यैसा तह केला ।। येकसें अठाविसा बिघ्या चावर येक केला ।। या प्रकारें कामाविस करों लागला ॥ तें राया नागरस्यासिं मानलें ।। की हा आपले हितार्थि उत्तम प्रकारें वर्तुणक स्वामिकार्ये तत्पर ह्मणोन रायाने अधिकाधिक मान्यता कलि ।। दिवसें दिवस प्रतिष्ठा वाढली ।। यैसि कामाविस वरुषें १२ अधिकोत्तर भरलीं ।। ते समई ईश्वरी ईछा म्हणोन भागडचु-याचि बुद्ध फिरली ॥ स्त्रिवेशनि प्रवर्तला ।। कित्येकां भल्या भल्यांच्या स्त्रिया बळत्कारें भोगिल्या ।। भल्या भल्यांच्या ईजति घेतल्या ।। कित्येकां पासोन द्रव्य घेतलें ।। आणि अभिळासवृत अद्भुत ह्मणोन गा-हाणि राया नागरस्यास गेलिं ॥ तेधवां अतिशयें गा-हाण्यास रायान ह्मणितलें की आपण त्यास सिक्षा लाविन, तुह्मी चिंता न करणे ।। यैसिया प्रकारें भागडचुरि उन्मत होउन रायाचि हि चिंता मनी नाहिं ।। जीवास उदार ह्मणोन राजा हि मनि दचके ॥ जर बळाढ्य आणि जीवास उदार ।। ह्मणोन राजा तयास दुखवित नसे ।। परंतु आशंकित असे ।। जर यैसिया दुष्ट-कर्मास दंड करावा ॥ परंत त्यासि जें महत्व दिधलें होतें ते पाळित गेला ।। यैसें असतां मालाड माहालिचा सोमदेशला सोमवंशि त्याचे बंधुचि स्त्रि अतिसुंदर जाणोन तजविज भागडचु-यान मांडिलि ।। जर ते स्त्रि बळत्कारें हरावि ।। ह्मणोन तो सोमदेशला व त्याचा बंधु व घरांतिल पुरुष अवघे आणोन बंध केले ॥ बंदिरखानी दिवस पांच होते ।। तेधवां त्यास वर्तमान कळला जर आज्ञा भागडचु-याची सिपायास जालि जर जावोन ते स्त्रि काढोन आणावि ॥ ते आईकोन सोमदेशल्यान ताबडतोब सेवक रवाना केला जर ते स्त्रि उताविळ पळवावि ।। तेधवां तो सेवक घरि जावोन समाचार सांगितला ।। जर ऐसें होणार ह्मणोन ते स्त्रि त्या सेवक समागमि घेवोन कु-हारास नेंलि ।। तेथे रात्र क्रमिली ।। तेधवां हे सिपाये धरि येवोन पाहों लागले ।। तेधवां ते स्त्रिला न देखत ।। ह्मणोन भागडचु-या जवळ गेले ।। जर ते पळविली ह्मणोन भागडचुरि के.पला ।। मग त्या सोमदेशल्याचा बंधु ते स्त्रिचा भ्रतार ताबडतोब मारिला ।। तो वर्तमान कु-हारासं कळला ।। मग तेथोन भाईदरा मात्रुपक्षि नेलि ॥ तेथे मास येक होति ॥ तेधवां ते माईबापास चिंता वर्तलि ।। जर हे सगर्भ चहुमासाचि ॥ हे येथे ठेविता कामा नये ।। जर प्रसूत-- काळि प्रगट होईल आणि त्या भागडचु-यास कळेल तर आपणास वाईट होईल आणि ईलाहि काढोन नेईल ।। ह्मणोन समागमि बाप घेवोन भिवंडी मामारपक्षि घेवोन गेला ।। तेथे ते ठेविली ।। मग तेथे ते प्रसूत जालि ॥ पुत्र जाला ।। तो वाढला ।। वरुषें १२ भरलि ।। तेधवां तो मुल शास्त्रविद्या-पूर्ण जाला ।। तेधवां येक दिवस त्या मुलास वर्तमान मातेन सांगितला जर तुझा पिता भागडचु-यान मारिला ।। तें आईकोन तो मुल मनी विस्मित होउन अभिमानि पडला ॥ जर त्याण्हे माझा पिता मारिला ।। त्यास मी मारिन ।। हा निश्चये करोन आपले कुटुंबि बैसोन विचार केला ।। तेधवां ते सर्व मामारपक्ष त्यास साह्ये जाले ।। हा अभिमान आमचा ।। ह्मणोन दिवस दिवस आपले समंधि भाव त्यांस पाचारोन विदित केलें ।। ते हि साह्ये त्या मुलास जाले ।। मग थोरथोर ठीकाणि अवघ्याचि समंते घेवोन पत्र नागरस्यास पाठविलें ।। जर मला देशालिक देसिल तर आपण पित्याचा सुड घेईन ।। भागडचुरि मारिन ॥ तुझी आज्ञा असेल तर आपण तुझे चरण देखावयास येतों ।। आणि जी सेवा भागडचुरि करित असे ते द्वीगुण ग्या करावि ॥ ऐसें पत्र प्रविष्ट माहिमा राया प्रत जालें ।। राये वाचोन अभिप्राव मनासि आणिला जें रायाचे मनि होतें तें तें चि होउन आलें ।। जर दुरात्मा घातकि भागडचुरीयाचा परस्परे घात होईल आणि तो राजाज्ञा अन्य करिल ह्मणोन परस्परें कायें होवोन येतें ह्मणोन रायाचे चित्तास आलें ।।