Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

तदनंतरे स्वल्पदिनी राजा केशवराव शांत जाला ।। त्याचा पुत्र रामदेवराव गिरिस राहिला ।। मग राजा बिंबाने शालिवाहन शके १२१६ मध्यें चाल केलि ।। आणि गुजराथ प्रांता होवोन अहिनळवाडा पुर–पाटण दक्षणप्रांति देश विलाईत नाईकि या पैकि ठाणे-कोकण माहिम पावे तवं काबिज करोन परतापुर राज्यधाम द्वादश राजे सूर्यवंशि आणि २४ राजे सोमवंशि आणि सेनासमुदाये व सेवकजन आणि नवखुमे शेषवंशि आणि सेनासमुदाये राहिला ।। रायाचे प्रथम राणिचे नावं नागरसिद्धि ।। द्वितिये स्त्रिचें नावं गीरिजा ॥ जेष्ट पुत्राचें नाम प्रतापशा ।। कनिष्ट पुत्राचें नाम पुरशा ॥ त्याचा जन्म प्रतापपुरास जाला ॥ राजा संतोष पावोन धर्म रायें येक लक्ष दामाचा केला ।। कित्येकांस वस्त्रें भुषणे दिधलीं ।। तदनंतरें राया बिंबाने आपलें प्रधानास आज्ञा केलि ।। माहिम बेटाचि वसाईत करविली ।। वाडिया दत्ति लावविल्या ।। माहिमाचे द्वादश भाग केले ॥ मग कोणे येके दिवसीं शाळिवाहन-शका १:२७ मध्यें राजा बिंब बाग पाहावयास माहिमा गेला ।। तर ते माहिम जागा उत्तम रम्य स्थळ देखोन आज्ञा प्रधाना प्रत दिधली कीं येथे माहाल बांधावा ।। आणि ते माहिमी बारा भागाचे बारा माहाल आपले वंशिकासि रायाने दीधले ।। ते कोणकोण ।। स्त्रियां समवेत नामाभिधानें गोत्रें उपनामे अनुक्रमे सांगतों ॥ त्याचि वगत ॥ काशेश्वर राजा राणि सावित्री काश्यप गोत्र उपनाम बनकेकर ॥ १ ॥ मदसुदन राजा राणि लक्ष्मी गर्ग गोत्र उपनाम मानपुर्वक ॥ २ ॥ विद्रुमसेंन राजा राणि गोदावरि वशिष्ट गोत्र उपनाम वारा ढकर ॥ ३ ॥ विक्रमाकृति राजा राणि रखुमावती भारद्वाज गोत्र उपनाम राणे ।। ४॥ सैन्यजित राजा राणि सुल्लजा गौतम गोत्र उपनाम ग्रामसमंध ।। ५ ।। सहस्त्रसेन राजा राणि भागिरथि पौलस्ति गोत्र धृतधृत ।। ६ ।। पौंडरिक राजा राणि भानुतनया जमदाग्नि गोत्र उपनाम मोळकर ।। ७ ।। अनंतकिर्ती राजा राणि संध्यावळी चेवनभार्गव गोत्र उपनाम भांडारिक ॥ ८ ॥ वासुदेव राजा राणि गौतमि अगस्ति गोत्र उपनाम वरोळि धाकटी ॥ ९ ॥ सुमंत राजा राणि सुलक्षणा कर्दम गोत्र उपनाम वैद्य ॥ १०॥ माधाता राजा राणि विख्याती कौशीक गोत्र उपनाम वरोळि मोटी ॥ ११ ॥ देवदत्त राजा राणि कामाक्षा हरित गोत्र उपनाम वानठेकर ।। १२ ।। हे द्वादश राजे नावाणिक ।। या ईतर दुसरे पुरो जे देशोदेशिचे काळप्रस्ताय मोडोन आपले कुटुंबि कोकणि माहिमास आले सह परिवारि त्याचि नामाभिधाने तथा गोत्रें सूर्यवंश तथा सामवंश त्याचि वगत ।। छ ।। सूर्यवंशि राजे त्याचि वगत ।। वृद्धविष्णु गोत्र सुरदास पुरो दुर्गदेशिचा राजा माहिमास आला ॥ १ ।। पौतमाक्ष गोत्र भारद्वाज राजा सिभ्रदेशिचा आपले कुटुंबि माहिमास आला ॥ २ ।। पौतमाक्ष गोत्र भीमराज भीमाडीपुरा होवोन काळप्रस्तायें माहिमासि आला ॥ ३ ॥ मांडव्य गोत्र शिवराज सिळापुरा होवोन माहिमासि आला ।। ४ ।। कौंडण्य गोत्र भीमराज मायापुरा होवोन माहिमास आला ।। ५॥ मांडव्य गोत्र शिवदास प्रभु सौराष्ट्र-देशा होवोन म्लेंछभयें माहिमास आला ।। ६ ।। विश्वामित्र गोत्र गोरखिराज गोदापुरा होउन कोकणि आला ।। ७ ।। हरित गोत्र श्रीपतराम साजापुरा होवोन म्लेंछें धाड दिधलि ह्मणोन गोत्रि ईछित माहिमास आला ॥ ८ ॥ कौंडण्य गोत्र देवप्रभु पैठणा होवोन माहिमास आला ॥ ९ ।। पौतमाक्ष गोत्र शामराज श्यामक्षेत्रा होवोन माहिमास आला ॥ १० ॥ शौनल्य गोत्र शिवराज साहाज्यापुरा होवोन महाम्लेंछ–भयें माहिमास आला ।। ११ ।। मांडव्य गोत्र त्रिंबकराज मायापुरां होवोन माहिमास आला ॥ १२ ॥ वृद्धविष्णु गोत्र त्रिंबक प्रभु त्रिवेणिनगरा होवोन माहिमास आला ।। १३ ।। वृद्धविष्णु गोत्र केशवराज त्रिवेणि नगरा होवोन माहिमास आला ॥ १४ ॥ ब्रह्मजनार्दन गोत्र गणेशराज गोदावरि-पुरा होवोन माहिमास आला ।।१५ ।। विश्वामित्र गोत्र सिवराम दामोदर प्रभु द्वारके होउन माहिमास आला ।। १६ ।। वृद्ध-विष्णु गोत्र दामोदर प्रभु त्रिवेणी–नगरा होवोन माहिमास आला ॥ १७ ॥ ब्रह्मजनार्दन गोत्र गणेश प्रभु आपुले समुदायें कोकणि आला नेवाळया होउन ॥ १८ ॥ वशिष्ट गोत्र केशवराव पैठणा होवोन माहिमास आला ।। १९ ।। वशिष्ट गोत्र नारायण प्रभु पैठणा होवोन माहिमास आला ।। २० ।। भारद्वाज गोत्र विष्णु प्रभु आपले पारिवारि पूर्वदेशा होवोन माहिमास आला ।। २१ ।। वशिष्ट गोत्र केशवराव पैठणा होवोन माहिमास आला ॥ २२ ॥ ब्रह्मजनार्दन गोत्र त्रिंबकराव आपुले परिवारै पैठणा होवोन महिमास आला॥२३॥ पौतमाक्ष गोत्र श्रीपतराव आपुले परिवारे पैठणा होवोन माहिमास आला ।। २४ ।। हरित गोत्र परशराम आपले परिवारे पैठणा होवोन माहिमास आला ॥ २५ ॥ वशिष्ट गोत्र गोपाळ प्रभु गोपुरा होवोन माहिमासि आला ।। २६ ।। वशिष्ट गोत्र कृष्णनाथ प्रभु पैठणा होवोन आपले समुदायें कोकणि आला ॥ २७ ॥ काश्यप गोत्र चंद्र प्रभु चिंचगावां होवोन कोकणि आला ॥ २८ ॥ अंगिरस्य गोत्र दामोदर प्रभु दावाजिपुरी होवोन कोकणि आला ॥ २९ ॥ वशिष्ठ गोत्र श्रीपद्मराव स्त्रिपुरा होउन माहिमासि आला ।। ३० ॥