Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
त्याहि राज्य केलें येकछत्री ।। देव तयां वोळगतो दिनरात्री ॥ महापवित्र आचरती ॥ सत्यवंत ते ।। २१ ॥ त्या तिघा मध्यें येक पुत्र ।। सुमेध नामे. पवित्र ॥ त्याणे धरिला राजभार ।। सूर्य वंशाचा ।। २२ ।। कोणे येके दिनी ।। इछा उपजलि तया लागुनी ॥ सर्वश्व त्यजुनी ॥ तपश्चर्य आरंभिलें ॥ २३ ॥ चवदा सहस्त्र वरुषें धुम्रपान ।। मोहन-मुख वर्जिले अन्न ॥ तैं जाला प्रसंन्न ।। महादेव ।। २४ ॥ प्रसंन्न जाला त्रिपुंरारी ।। कर ठेविला मस्तका वरी ।। माग माग झडकरी ॥ प्रसंन्न जालों तुज ॥ २५ ॥ येरु ह्मणे गा विश्वनाथा ।। युद्धी जिंतावें म्या समस्तां ॥ हा वर देइं गा त्वरिता।। देवादिदेवा ॥ २६ ॥ शंभु ह्मणे तथास्तु ॥ तुं सर्वांसि अजितु ॥ त्या वरदें राज्य केलें बहुत ।। वसुंधरेचें ॥ २७ ॥ तेण्हे ईंदु केला वोळगणा ।। पन्नग-गंधर्वगणा ।। इत्यादि समस्तासिं जाणा ।। आज्ञा त्याची ॥ २८ ॥ तवं त्यासि जाला पुत्र ।। सनोघ नामें पवित्र ।। तयाचा महाभद्र ।। सूर्यवंशी ॥ २९ ॥ आतां समग्र सांगतां विस्तार ।। ग्रंथ वाढेल थोर ।। मागिल कथा अंतरेल समग्र ।। सहजें चि जाणा ।। ३० ॥ तया महाभद्राचा सगुण ॥ सगुणाचा त्रीविक्रम ।। नभ अनाशन महाशन त्रीविश ।। तयाचा कमळाकर ।। कमळाकराचा गोपुर ।। गोपुराचा अवतार ।। महाराजा तो ।। ३२ ॥ द्वारकाचा त्रीविक्षु ।। तयाचा दिपकु ॥ महाराजा विख्यातु ।। महाप्रभु तो ॥ ३३ ।। तयाचा प्रतापसेन । तयाचा निजभान ।। तयाचा तेजभानु ।। महाप्रभु तो ॥ ३४ ॥ ज्ञानधराचा प्रदिप्तु ।। प्रदिप्ताचा महादिप्तु ।। तयाचा महाशंखु ।। राजाधिराज ॥ ३५ ।। तयाचा ब्रह्मसाधु ।। तयाचा मचकुंद ॥ तयाचा प्रबोधु ।। महाराज तो ।। ३६ ॥ तयाचा संवेध ।। तयाचा निष्टु ।। तयाचा महाप्रयागु ।। परम प्रतापि तो ।।३७॥ तयाचा जरिजु ।। तयाचा महाविजु । तयाचा भोजु ।। ब्रह्मपदांबुजि सदा रत ।। ३८ ।। तयाचा महिंद्रपाळ ।। तयाचा अजपाळ ।। अजपाळाचा दशरथ भुपाळ ।। सूर्यवंशी ।। ३९ ।। दशरथासिं च्यार पुत्र ॥ राम लक्ष्मण भरथ शतृघ्न मोहोदर ।। तया माजि राज्य धर ॥ श्रीरामचंद्र ॥ ४० ।। श्रीरामचंद्र जेष्ट पुत्र ।। तो साक्षांत राज्यधर ।। पाहा सातवा अवतार ॥ अवतरला सूर्यवंशी ॥ ४१ ॥ नीर्विकार आकारलें ।। तें अव्यक्त व्यक्तिसी आलें ।। स्वयें ब्रह्म चि प्रकाशलें ॥ जोतिस्वरुप ॥ ४२ ॥ तों बोलिले श्रीरामचंद्र ।। तयासि बोलिजे घटेश्वर ।। सहश्रनाम अधिकार ॥ तया श्रीरामा ।। ४३ ।। तया पासुनि परंपरा ।। श्रोते दत्तचित्ते अवधारा ॥ सांगतों असं सविस्तरा ॥ परंपरा अनुपम्ये ॥ ४४ ॥ श्रीराम अंकुश ।। अंकुशाते तिघे पुत्र ॥ महाबळिये महाविर ।। जेष्ट तया माजि मांधातृ ॥ तयाचा जनार्दन ।। ४५ ।। तया पासोनि धर्मराजा ॥ धर्मा पासोनि शंभुध्वजा ।। शंभु पासुनी निवृात राजा ॥ जे धनुर्धर बळिवाढ्ये ॥ ४६ ॥ तयाचा शीवशक्ती ।। तया पासाव येवंती ।। जे क्षेत्री, जिंको शकती ।। भुमंडळासी ।। ४७ ।। येवंतिरायाचा सुनेस्वेखु ।। तयाचा ब्रह्मभेखु ।। तयाचा आद्येपुरुषु ।। महाराज तो ।। ४८ ॥ कृतायुग संपले तेरा शत नृपवर ।। त्रेतायुगि वंश करावया पवित्र ।। ह्मणोनि जाला अवतार ।। सूर्यवंशी ॥ ४९ ।। एवं संपले त्रैतायुग ।। द्वापारि कथा पवित्र ॥ पुढिल आईका वंशमार्ग ।। श्रोतेजनी ।। ५० ॥ ऐसे नांदले नृपवर ॥ तवं श्राघदेव जाला आदित्यासिं पुत्र ॥ तेणे मांडिला यज्ञ थोर ।। महीमंडळां ।। ५१ ।। आले रुषि समस्त ।। होमद्रव्य मेळविलीं बहुत ॥ पूर्ण केलि पुर्णाहुत ॥ समस्त रुषीं ॥५२॥ समस्तरुषिवरदानाचि आहुती ।। तेथे कंन्या जंन्मली महाशक्ती ।। ते दीधलि भूपती ।। श्राधदेवासी ।। ५३ ॥ मग ती गेला ब्रह्मभुवना ॥ तेणे प्रसंन्न केलें चतुरानना ।। यका सहस्त्र वरुषे हट-निग्रहा ।। प्रसंन्न केला ।। ५४ ॥ तो प्रसंन्न जाला विरंची ।। ते कंन्येचा पुत्र रची ॥ नावे श्रुदिमन्य हाची ।। महाक्षेत्री ।। ५५ ।। मग तो राज्य करितां ।। अनर्थ घडला अवचिता ।। तो पुनरपि जाला वनिता ।। रुद्रशापें ।। ५६ ।। शिवें प्रणिली दाक्षायणी ।। ते रूपें जालि तरुणी ॥ मग तेथोनि महेश आणि भवानी ।। आलि काम्यकवनासी ।। ५७ ॥ ते सुखाचि संगती ।। अंकि बैसलिसे शक्ती ॥ तवं उदो केला गभस्ती ॥ तये वेळां ।। ५८ ॥ ते प्रसन्न काळीं ।। ब्रह्मा आला विनवावया चंद्रमौळी ॥ ते लाजोनि शैल्यबाळी ।। वढिला अंबर ।। ५९ ॥ देखोन मुरडला चतुरानन ।। भवानिने विनविला त्रीनयन ॥ देवा चाल जावों आणके स्थान ॥ यकांतासी ।। ६० ।। हे देवरुषितापसाचें वन ।। येथे तृप्ति नव्हे पंचबाण ।। हे बैसले स्थान ।। अंकि तुझे ॥६१।। देव ह्मणे हें वन पवित्र ॥ पुष्पी दाटले तरुवर ।। छाया महासीतळ सकुमार ।। भुमि हे ।। ६२ ।। आणि येक असे अवसर ॥ ये वनि जो येईल नर ।। तो नारि होइल ऐसें हर ।। शाप वदला ६३ ॥ तवं तो श्राधदेवाचा नंदन ।। पारधि खेळे सुदीमन्य ।। टाकोनि आला तें वन ।। नेणतां अकस्मात ।। ६४ ॥ तों तेणे शाप त्या वना ।। तटाकी रिघाला स्नाना ॥ तेणे चि वीपरित जालें चिन्हा॥ पालटलें स्वरुप ।। ६५ ।। तेणे पालटलि पुरुष आकृती ॥ सुदीमन्यु जाला शक्ती ॥ तेथे सोमाचा नंदन पारधि खेळतां त्या वनाप्रती ।। आला बुध ॥ ६६ ।। ते देखोनियां सकुमारी ।। तेजरासि राजपुत्री ॥ ते बुधे रथा वरि झडकरी ।। घेवोन मंदिरि नेलि पैं ।। ६७ ।। तियेसिं जाले तिघे पुत्र ॥ जे सोमवंशि महापवित्र ।। तेथे आला रुषेश्वर ।। वशिष्टमुनी ।। ६८ ॥ तो सूर्यवंशिचा गुरु ।। स्त्रिरुपें देखिला श्राधदेवाचा पुत्रु ।। तो दुखवला रुषेश्वरु ।। मना माजी ॥ ६९ ॥ मग सूर्यवंशा लागी ।। प्राण त्यजु पाहे सानुरागी ।। पद्मासन घालुन वेगी ।। बैसला तपासी ॥ ७० ॥