मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

बापू शिवाजी कमावीसदार जाफराबाद यास पत्र                             लेखांक १०.                                             १७१४ कार्तिक वद्य ७.
वानवले याजवळ दिल्हे छ २० र॥वल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापुजीपंत स्वामीचे शेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें विशेष प॥ जाफराबाद येथील कामावर तुह्मास (नेमिलें ) त्यास राजेश्री हरबाजी नाईक वानवले याजकडील कारकून व तुह्मी एकविचारे माहालाचे कामाची वहिवाट करीत जावी याप्रो तुह्मांस लिहिलें असतां म॥- निल्हेनी पेशजी निळोपंत कारकून तेथें पाठविला होता त्याच्याने लिहिणे वगैरे काम येथास्थित आटोपेना सबब राजेश्री मल्हार रघुनाथ यास पाठविलें त्यास तुह्मीं त्याजला तेथील कामाचा येखादा इतल्ला देत नाहीं व एकविचार कोणतेहि काम न करितां दुई चालता ह्मणून समजले त्यास ही गोष्ट चांगली नाहीं वानवले याजकडून मल्हारपंत आहे ते व तुह्मी एकत्र होऊन कोणतेहि काम करावें यांत इकडील संतोष याउपर या गोष्टीचा बोभाट इकडे न यावा लिहिल्याप्रमाणे करावें दुसाराचा यैवज पो म॥रचा गावगना वसूल केला तो रहिमतखान व गोसावीसिंग वगैरे वरातदार महमद ईभराइमखा याजकडील यास तुह्मी दिल्हा ह्मणून कळ (लें) त्यास इकडील परवानगी नसतां ऐवज वसूल त्यास देण्याचे प्रयोजन काये असी गोष्ट होऊं नये मिश्रीखान पठाण याजवर कायमखान सजावल करून पाठविला अस्तां अद्याप मिश्रीखान जमियत सुधा तेथेंच आहे. त्याची सिबंदी दूर जाली नाहीं महालीं उपद्रव व तुह्मांसी कटकट तनख्याचे ऐवजाची करणार ह्मणून समजले त्यास पेशजी तुमच्या लिहिण्यांत ठाण-दखल जालें अैसें असून अद्याप हा बखेडा मोडला नाहीं अपूर्व आहे बंदोबस्त करून लवकर ल्याहावे वानवले यांचे कारकून मल्हारपंत यास इतल्ला देऊन कामकाज सुरळीत करावें बोभाट येऊ न द्यावा नाइकासी प्रतर्ना नाहीं मग नाईक कोणता हि कारकून ठेवोत काये बाध आहे तुह्मी समंजेस आहां ऐसे आह्मांस कळ (लें) असोन असा बोभाटा ऐकिला याचे आश्चर्य वाटलें र॥ छ २० र॥वल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.