Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ५. १७१४ कार्तिक वद्य ५.
बहेरी बाहादूर याचे व वीरभद्र आप्पा याचे नावे पत्रें
येकाच मजकुराची दोन्ही देवदुर्गाचे स्वराज्याविसी.
राजश्री राजे व्यंकटपा नाइक बलवंतबहेरीबाहादूर मुतहवरुद्दौला राबेजंग गोसावी यांसि-
सकल गुणालंकरण अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्त्रे॥ गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असले पाहिजे विशेष संवस्थान देवदुर्ग येथील स्वराज्याचा अमल राजश्री सिद्धेश्वरराव नि॥ राजश्री रामचंद्रराव जगन्नाथ याजकडे आहे त्यास सन १२०० व सन १२०१ सालचा फडच्या करून देण्याविसी आपल्याकडील अमीलास ताकीद व्हावी दिकत पडू नये र॥ छ १८ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
सदरहु आशयेंच वीरभद्र आपा याचे नांवे पत्र येक एकूण २ दोन पत्रें पीरणशाहा फकीर जालनापूरकर याजविसी दोन पत्रे.