Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ६. १७१४ कार्तिक वद्य ५.
राजश्री हैबतराव आटोळे समशेरबहादूर गोसावी यांसि--
अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्त्रे॥ गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहिणे विशेष पीरणशाह वलद सैद अमल फकीर जालनापूरकर यास नवाब बंदगानअली याणी कसबे जालनापूर प॥ म॥र येथील आमदनिदराम व बरामद याजवर चुंगी मुठी सरकारचे महसूल सिवाय खैरात बतरीक फकीर लोकास येणार जाणार व बुजर्गाचे उरसाकरितां वगैरे पंधरा बिघे जमीन व वीस झाडे आंबे सुधां व दोन विहिरी पेशजी अबदु गफार व वजहुदीन यांस इनाम होता तो जप्त करून यास बफरजंदान इनाम करून देऊन भोगविटीयास सनद करून दिल्ही आहे त्यास स्वराज्याकडील मोकासदार वगैरे अडथळा करतात सनदे प्रो चालू देत नाहींत ह्मणोन फकीर म॥र यांणी नवाब बंदगानअली यांस अर्ज केला त्याजवरून नवाबाचे फर्मावण्यांत आले कीं चुंगी वगैरे सरकारचे महसुलासिवाय बुतरीक खैरात आहे व मलाही मामूल दुस-याकडे होता तो हाली यास दिल्हा असता अटकाव करण्याचे प्रयोजन नाही त्यास येविसी तुह्मी पत्र ल्याहावें याजकरितां हे पत्र लिहिलें असे की सदरहू चुंगी वगैरे व पंधरा बिघे इनाम पीरणशाह फकीर याजकडे चालवावा कोणी नवाबाकडील अडथळा करील त्यास ताकीद करावी खैरातीचे काम आहे र॥ छ १८ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
सदरहू मजकुराचे पत्र ज्यानकूबाई आटोळे यांचे नावे पीरणशाहविसी.