Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बळवंतराव लक्ष्मण शेळूकर यास. लेखांक ७. १७१४ कार्तिक वद्य ५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बलवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष महमद दौलतखान बहादूर याणी आपले तालुकियाचे मामलतीचें काम राजश्री विठल चंडी राजश्री राजे राये-राया-बाहादुर यांचे आप्त यांजकडे सांगितलें आहे त्यास दौलतखान बहादूर यांजकडील तालुक्यांत तुह्मांकडील मामलतीचा जो ठराव जाला असेल त्याचाहि निकाल जाला पाहिजे याजकरितां अजमुल-उमरा–बहादूर व राज्याजी यांचे सांगण्यात आलें की माहालांत ज्यास्ती उपद्रव न करितां वाजवी निकाल ठरावा प्रो करून घेत तें करवावे व पंतमजकुर यांचे हरयेकविसी साहित्य होत असावें त्याजवरून हे पत्र लिहिलें असे राजश्री विठल चंडी यांचा आगत्यवाद राज्याजीस त्यापक्षी तुह्मीहि अगत्य धरून यांचे हरयेकविसी साहित्य करीत जावे व मामलतीचा निकाल उपद्रव न होतां करून घ्यावा यांत राज्याजीचा संतोष आहे र॥ छ १८ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.