Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

बाळ दीक्षित यांचे पत्राचें                                                     लेखांक १२.                                             १७१४ कार्तिक वद्य १३.
उत्तर छ २६ र॥वल,

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळ दीक्षित स्वामीचे सेवेसी-
पोष्य गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय आनंदातिशय लेखनद्वारा चित्त संतोषवावें विशेष आपण पत्र पाठविलें तें सुसमयीं प्रविष्ठ होऊन संतोष जाला प्रस्तुत नेम केला आहे ऐसा कीं येथील सर्वांचा निरोप घेऊन अखर कार्तिकपर्यंत येथून निघोन तुमचे भेटीस येतों कुटुंब-संरक्षण श्रीमध्ये होय ये गोष्टीचा विस्तारें मजकूर लिहिला तो सर्व समजला त्यास यंदाच श्रीस जावयाचें मानस असल्यास तिकडील सर्व गुंता उगवल्यानंतर इकडे येऊन भेट घेऊन जावें श्रीस जावयाचा यंदा अनमान असल्यास मग इकडे यावयाचें करू नये आह्मीच तिकडे आल्यानंतर भेटीचा लाभ घडेल कुटंब-संरक्षणाचा प्रकार विस्तारें लिहिला त्यास ध्यानांत आहे सांप्रत असलियास विस्मरण होणार नाहीं आह्मी पत्र लिहितों त्याचे उत्तर मात्र येते त्यावेगळें पत्र येत नाहीं ह्मणोन तुह्मी लिहिलें त्यास नवल आणि विशेष कांहीं असल्यास पत्र पाठवावें तें कांहीं नाहीं आणि प्रकृतहि प्रस्तुत ठीक नाहीं ज्वर येत होता नुकताच राहिला आहे नागपुरास जाण्याची सोय पुण्याकहून कीं भागानगराकडून हें लिहावें ह्मणोन लिहिलें त्यास वाटा दोहींकडील हि चांगल्याच परंतु इकडील मार्गानें सोबत मिळणें कठिण असें आहे रवाना छ २६ कार्तिक वद्य १३ हे विनंति.