Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

शक १४०० नंतर सुमारें साठ वर्षांनीं प्रकरण पांचवें लिहिलें गेलें. ह्या प्रकरणांत पाठारे प्रभूंची वंशोत्पत्ति सांगण्याचा प्रयत्न केलेला असून पाठारे प्रभूंची महिकावतीप्रांतांत जी स्थापना झाली तिचें कथन केलें आहे. ह्या प्रकरणाच्या कर्त्याचें नांव समजण्यास साधन नाहीं.

प्रकरण पांचवें रचून झाल्यावर सुमारें चाळीस पन्नास वर्षांनीं म्हणजे शक १५०० च्या सुमारास भगवान् दत्त किंवा भगवान् नंद दत्त नामें करून कोण्या पुरुषाच्या हातीं प्रकरण दुसरें, तिसरें, पांचवें व सहावें अशी चार प्रकरणें गेलीं. तेव्हां त्याला असें दिसलें कीं प्रकरण दुसरें व तिसरें मिळून एक स्वतंत्र हकीकत आहे आणि प्रकरण पांचवें व साहावें मिळून दुसरी स्वतंत्र हकीकत आहे. पहिल्या हकीकतींत महिकावतीच्या राज्यांतील सर्व कुळांची शक १०६० पासून वंशपद्धति दिली होती व दुस-या हकीकतींत प्रामुख्यें करून पाठारे प्रभूंची वंशपद्धति दिली होती. अशा दोन स्वतंत्र हकीकती भगवान् दत्ताच्या हातीं पडल्या. प्रत्येक हकीकतीला एकेक पद्य उपोद्धात भगवान् दत्तानें जोडला. प्रकरण दुसरें व तिसरें या गद्य प्रकरणांना प्रकरण पहिलें हें पद्य प्रकरण जोडलें आणि प्रकरण पांचवें व साहावें या गद्य प्रकरणांना प्रकरण चौथें हें पद्य प्रकरण जोडलें. अशा त-हेनें दोन स्वतंत्र बखरी तयार झाल्या. प्रकरण पहिलें, दुसरें व तिसरें मिळून पहिली बखर व प्रकरण चौथें, पांचवें व साहावें मिळून दुसरी बखर. भगवान् दत्ताच्या नंतर दुसरा एक अनामक संहिताकार आला. त्याला असें दिसलें कीं दुसरी बखर ही पहिल्या बखरीचा च धागा पुढें चालविणारी आहे. सबब त्यानें ह्या दोन्ही बखरी एका पुढें एक लावून, प्रस्तुत छापला जाणारा सबंध ग्रंथ बनविला. ह्या दुस-या संस्कारकानें भगवान् दत्ताच्या संस्करणांत अधूनमधून कांहीं जास्त मजकूर घातला. " मत्छा पासुनि च्यारि ते नरहरी पर्यंत जाले कृती,'' हा श्लोक, विजयानगरच्या राज्याचा नाश झाल्याचा उल्लेख, बाबर हें नांव, वगैरे शक १४६० च्या व शक १५०० च्या नंतर झालेल्या वृत्तान्ताचे जे दोन चार उल्लेख ह्या ग्रंथांत आले आहेत ते ह्या द्वितीय संस्कारकानें घातलेले आहेत. ग्रंथाची रचना वेळोवेळीं कसकशी होत गेली ती खालील तक्त्या वरून स्पष्ट होईलः:-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पहिला संस्कारक जो भगवान् दत्त तो कोण कोठील केव्हांचा वैगरे कच्ची किंवा पक्की हकीकत, अनुमानिक देखील, बिलकुल उपलब्ध नाहीं. अनामक जो दुसरा संस्कारक त्याचें नांव हि माहीत नाहीं, तेव्हां तो कोणकोठचा हा प्रश्न त्याज संबंधानें काढण्यास अवसर हि रहात नाहीं. भगवान् दत्त हें लौकिक नांव नसून जर सांप्रदायिक नांव असेल तर दत्त हा भगवान् नामक गुरूचा शिष्य ठरेल. कोंकणांतील साधुसंतांत भगवान् हें नांव नवीन च उपलब्ध झालें, असा ह्या विधानाचा अर्थ होतो. दत्ताला कविता करण्याचा नाद होता, हें प्रकरण पहिलें व प्रकरण चौथें ह्यां वरून सिद्ध आहे. भगवान् नंद दत्त, हें जें नांव प्रकरण चौथ्याच्या प्रारंभीं आलें आहे त्या वरून असे म्हणतां येतें कीं दत्त हा भगवानाचा नंद म्हणजे नंदन ऊर्फ मुलगा किंवा शिष्य होता.