Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

दिसण्याला हा पुंल्लिंगी क्रियापद- प्रयोग कोंकणांत चित्पावनांत व क-हाड्यांत अद्याप हि आढळतो. ही कोंकणी लकब झाली. जुनी संस्कृत लकब, स्वप्न सांगविला (पृष्ठ ५३, ओळ ११) ह्या प्रयोगांत दृष्टीस पडत्ये. स्वप्न हा शब्द संस्कृतांत प्राय: पुल्लिंगी आहे. सबब, सांगविला हें पुल्लिंगी रूप केशवाचार्यानें प्रौढपणें आपल्या लिखाणांत घातलेलें दिसतें. परंतु, लौकिकांत स्वप्न हा शब्द मराठींत नपुंसकलिंगी आहे, हें केशवाचार्याच्या दृढ परिचयाचें होतें. सबब, हें हें नपुंसकलिंगी सर्वनामरूप स्वप्न ह्या पुल्लिंगी शब्दा मागें केशवाचार्यानें किंवा त्याच्या नकलकाराने लावून "हे स्वप्न सांगविला" हें विचित्र वाक्य निर्माण केलें असावें ! ह्या बखरीत सरता हा जुनाट शब्द आलेला आहे. "सरता केला संतांत” हें वाक्य संतमालांतून आलेलें जुन्या मराठी भाषेच्या अभ्यासकांना अवगत आहे च. येथें सरता म्हणजे गणणा केला जाणारा, स्मरण केला जाणारा, स्मर्यमाण, असा अर्थ आहे. तो सरता केला संतांत म्हणजे तो संत लोकांत स्मरला गेला, गणला गेलो असा अर्थ होतो.

तो जातींत सरता केला म्हणजे तो जातींत गणला गेला. हा सरता शब्द संस्कृत स्मृ धातू पासून निघालेला आहे. स्मृ चा अपभ्रंश सर असा मराठींत होतो. उदाहरणार्थ, विस्मृ चा मराठी अपभ्रंश विसर, करूं बद्दल करोन अशी अक्षरवटिका ह्या बखरींत एकदां आली आहे. अनुनासिका च्या टिंबा बद्दल सबंद न हें अक्षर लिहिण्याची संवय बाजीरावादि पेशव्यांच्या पत्रांत आढळते. ती च लकब ह्या कोंकणी बखरींत आढळल्यास चमत्कार नाहीं. असले आणीक कांहीं प्रत्यय व प्रयोग ह्या बखरींत आहेत, ते सर्व देऊन जागा अडविणें प्रशस्त दिसत नाहीं.

७. बहि:स्वरूपाची छाननी झाल्या वर, आतां बखरीच्या आंतील मजकुराचा परिचय निर्धास्तपणें करून घेण्याच्या उद्योगास लागणें सुयुक्त दिसतें. आंतील मजकुराचा परिचय करतांना, छाननीची पहिली बाब म्हटली म्हणजे बखरींत दिलेली शकसंवत् वगैरे कालगणना बरोबर आहे किंवा नाहीं तें तपासणें. कोणत्या शकाला कोणता संवत् जुळतो, ही स्थूल बहि:छाननी मागें होऊन गेली च आहे. तीथ, वार वगैरेंच्या सूक्ष्म छाननीला आतां हात घालूं. एकंदर सबंद बखरींत शकसंवताचे जेवढे म्हणून स्थूल किंवा सूक्ष्म उल्लेख केले आहेत त्यांचा तक्ता असा:-- (तक्ता पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)

सूक्ष्म तपासणीच्या कार्यास लायक अश्या नोंदी ह्या तत्त्क्यांत १, ७, ८, १०, २५, २७, अश्या फक्त सह आहेत. कारण त्यांत महिना, पक्ष, तीथ, व वार अशा तपशिलाच्या दोन दोन, चार चार बाबी दिल्या आहेत. बाकीच्या एकवीस नोंदींत हा तपशील सबंध किंवा आंशिक, बिलकुल नाहीं. सत्तावीस नोंदीं पैकीं नोंद २७ खेरीज करून कोणत्याहि एका नोंदींत संवत्सराचें नांव दिलेलें नाहीं. तें हलगर्जीपणानें दिलें नाहीं, असाच केवळ ग्रह करून घ्यावयास न लगे. संवत्सराचें नांव न काढण्याचें कारण असें आहे कीं, बखरकार शक व संवत् असे दोन्ही आंकडे मनांत धरून वर्षगणना करण्यास शिकलेला होता. दोन किंवा अधिक मोजण्यांनीं वर्षगणना करण्याची ही संवय किंवा अपरिहार्यता परराज्याखालीं रखडणा-या प्रजेस सहज प्राप्त होत असते. स्वराष्ट्रांतील जुन्या कालगणने बरोबर परकीय राजांनीं प्रचलित केलेली काळगणना सांगितल्याशिवाय वर्षगणना बिनचुक एकदम वाचकाच्या किंवा श्रोत्यांच्या ध्यानात येण्यास विलंब लागेल, अश्या भीतीनें परराज्याच्या दडपणाखालीं खितपतणा-या हल्लक लेखकांस स्वकालगणनेच्या गौण साक्षीला परकीयकालगणनेची प्रमुख साक्ष देणें सोईचें वाटतें. वंशपद्धति ऊर्फ प्रकरण दुसरें हा प्रबंध रचणारा जो केशवाचार्य त्याला त्यानें आपला प्रबंध ज्या मूळ टिपणांवरून रचिला त्या टिपणांत गुजराथेतीलं अन्हिलवाड पट्टणाहून आलेल्या परकीय बिंब राजांचा विक्रमसंवत् स्वकीय देशांत चालणा-या शकाच्या जोडीला लावलेला आढळला.