Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
दिकत्यानीचस्वमुखेकेलेअग्नीसमवेतजाण्याकर्त्तांश
कटदेखीलत्याणीचअणविलाउत्थानश्राद्धाचाचरूहि
करविलादर्भासनावरआपणअसतापुढेंघटिकादोनघ
टिकाप्रयाणसमयत्याकाळीशिष्टमंडळीसपुसतातकिंऐसास
मारंभकोण्हीपाहिलाअहेकिंकायत्याजवरूनसर्वा
नीआश्विर्यकेलेंकिदीक्षितआपणधन्यअहासर्वत्रइ
हलोकींपरलोकींधन्यताजाहलीतीपत्रींकायल्याहवी
आपणहीत्यांचेपरमआप्तत्याचीनिष्ठाआपलेठिकाणी
आपणत्यांचेचालविलेह्मणूनलिहिलेंअहेवडिला
नीतरअपलेपरमसाधनकेलेशिवस्मरणवनारायण
स्मरणातचगेले॥ भालेत्रिपुंड्रकंभातिकंठेरुद्राक्षलि
का॥मुखेषडक्षरोमंत्र: सशिवोनात्रसंशय:॥ अंतकाले
चमामेवस्मरन्मुक्त्वा कलेवरं॥ य:प्रयातिसमद्भावंया
यतिनास्त्यत्रसंशय:॥ अतिसारजाहल्यानंतरपूर्वया
तनेचाअर्षसंबंधीउपद्रवजाहल्यामुळेंअतुरसंन्या
सघेवुनदेहकृष्णप्रवाहकरावाहाहीसिध्दांतहोताप
रंतुअग्नीचीसेवाचाळीसवर्षेकेलीत्यानेचकले
वराचेंदहनकेले॥ दहेयंसर्वगात्राणिदिव्यान्लोकान्स
मच्छतीतिगरुडपुराणे ॥ दीक्षिततरदिव्यदेहधारण
करूनविमानारूढहोवुनब्रह्मसायुज्यतेसगेले॥
यदामनसिवैराग्यंजायतेसर्ववस्तुषु॥ तदैवसंन्यसे
द्विप्रोअन्यथापतितोभंवत्॥ संन्यास:कोटिजन्मसु॥
वसिष्ठ:॥ न्यायगतधनस्तत्वज्ञाननिष्ठोजितेंद्रिय:
॥ श्राध्दकृत्यसत्यवादीचग्रहस्छोपिहिमुच्यते॥ हेही
अर्थघडलेप्रतिपदेपासोनषष्ठीपर्यंततिलप्रायप्र
पंचादिकपदार्थांतचित्तनाहींऐसेसाधनघडलेपुढें
अमचीचिंताआपणासअसादिवदेशकालानुरूपऔध्व
देहिकहीजाहले सर्वोपरिआपणवडि
लाचेसर्वागोष्टिचेचालविलेतसे
चचालवांवेह्मणोनअह्मिविनंती
ल्याहवीतरउपरोधिकदिस
तेकारणऐसेजेअह्मिपारंप
र्यागतआश्रितचअहोपत्रीवि
शेषकायल्याहंवेहेआशीर्वादा:
संतु अखंडित प्रतापोस्तु ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७०] श्रीरेणुकाप्रसन्न.
*श्रीमत्सर्वोपमायोग्यगोब्राह्म
णप्रतिपालकश्रियाविराजितरा
जमान्यराजश्रीरावसाहेबयांसि
आश्रितांतर्गतरामचंद्रदीक्षितवनानादीक्षितअया
चितकृतानेकआशीर्वादविनंतिऐसीजेयेथीलवर्त
मानश्रावणवद्य३सौम्यवासरपर्यंतजाणुनस्वकीयलि
हीतअसावेंविशेषश्रावणशुध्दषष्ठीससूर्योदयादा
रभ्यदोनप्रहरपर्यंतईश्वरस्मरणवपुण्यसूक्ताचेपठण.
यज्ञशाळेतघरचेवबाहीरचेमंडळीसुध्दाभजनहोत
अस्तादोनप्रहरादेहावसानकरूनतीर्थरूपखंडदीक्षि
ततात्याब्रह्मसायुज्यतापावलेऐसेकितीएकप्रकार
कोठेपाहण्यातवऐकण्यातअलानाहिंगांवातीलब्रा
ह्मणासदृष्टांतजाहलाकिंदीक्षितासमविमानअलेअहे
चतुर्थीसविचारिलेंकिंनक्षत्रकोणअहेतेव्हांअह्मीं
बोलिलोंकिंउदयीकउत्तरानक्षत्रअहेमगत्याणीउत्त
रकेलेकिंतिपादनक्षत्रअहेअमचेप्रयाणषष्ठीसहोयीं
लसातदिवसअनशनव्रतजाहले॥सौरपुराणे॥शि
वक्षेत्रेनिराहारोभूत्वाप्राणान्परित्यजेत्॥ शिवसायु
ज्यामाप्नोतिप्रभावात्परमेष्ठिन:॥ लिंगपुराणे॥ याव
त्तावन्निराहारोभूत्वापाणान्परित्यजेत् ॥ शिवक्षेत्रेमु
निश्रेष्ठशिवसायुज्यप्नुयात्॥ तस्मात्अनशनेनअ
क्षय्यागतिरिति॥ अनशनव्रतासआरंभजाहल्या
नंतरसंधेचेंउदकत्रघेतहोतेत्याव्यतिरिक्तकाहीये
कनाहीशकटावरपंचाग्नीसमवेतसरंभकरोनकृष्णेस
जावुनतेथीलविधीअरणीपात्रासुद्धात्यांच्याबरोबरजा
हला॥ एवमेषोग्निन्दग्ध: पात्रायुधविभूषित:॥ अन्या
न्लोकानत्तिक्रम्यपरंब्रह्मैवविंदति॥ यायोगेकरूनब्रह्म
सायुज्यताजाहलीआणिसेवटासत्रिरात्रपर्यंतअतिसार
हीजाहला॥ अतिसारेणमरणंयोगिनामपिदुर्लभं॥ सारां
शमहापुण्यश्लोकईश्वरस्मरणदेहावसानजाहल्यानंतर
राहिलेदानधर्माचाहीपर्यादेशकालानुरूपअगोधर
अठदिवसचाललाचहोतापंचमीससवृषगोशतकेलेंष
ष्ठीसदोनप्रहरपर्यंतआसन्नप्रयुक्तदानेंकेलीसर्वसंकल्पा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६९] श्री . २८ ऑक्टोबर १७४०.
आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधरविश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान तहा मोकदमानी मौजे रेटवडी तालुके खेड, प्रांत जुन्नर, सुहुरसन इहिदे अर्बैन मया व अलफ. राजश्री बापूजी बाजीराव यांचे तीर्थरूप बाजी भीवराव, पुरातन राज्यांतील सेवक, एकनिष्ठपणें सेवा करीत आले. हालीं फिरंग्याचे मसलतेस तारापूरचे येलगरसमयी युध्दांत सरकार कामास आले. यास्तव, याजवरी कृपाळू होऊन मौजे मजकूरची मोंगलाई, बाबती, चौथाई, सरदेशमुखी व साहोत्रा देखील इनाम यासी व यांचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने दिला असे. तरी इनाम अनभवतील या पत्राची प्रत लेहून घेऊन अस्सलपत्र मशारनिलेस परतोन देणें. प्रतिवर्षी नूतनपत्राचा आक्षेप न करणें. छ १७ साबान. आज्ञा प्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६७] अ श्री . ११ जानेवारी १७३९.
गंगाजान्हवीसमान मातुश्री वेणूबाई काकी वडिलांचे सेवेसी :-
अपत्ये बाजीराव बल्लाळ साष्टांग नमस्कार वि॥ येथील त॥ पौष वद्य १३ पावेतों स्वकीय लिहीत जाणें. विशेष. पौष शु॥ ११ स तारापुरावर हल्ला केला ते समयीं बाजी भिंवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी जाहाले. ईश्वरें मोठें अनुचित केले ! तुह्मास मोठा शोक प्राप्त जाला. आमचा तर भाऊ गेला. त्यास, तुह्मी वडील. दु:खाचें परिमार्जन करून विवेक करावा. त्यांची मुलें व चिमणाजी अप्पा आहेत, त्यांचेहि त्याजपेक्षां अधिक चालेल. परंतु आमचा भाऊ गेला. बाजू गेली. उपाय नाहीं. त्यास, चिमणाजी भिंवराव हे पाठविले आहेत. हें सांगतील तें ऐकावें. सारांश, मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा. मजवर दृष्टी द्यावी. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंति.
[१६८] श्री . ११ जानेवारी १७३९.
राजश्रिया विराजित राजमान्यराजश्री चिमणाजी भिंवराव स्वामीचे सेवेसी :-
पोष्य चिमणाजी बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. राजश्री बाजीराव यांस देवाज्ञा जाहाली. त्यांचा परिणाम उत्तम प्रकारें ह्मणावा तैसा जाहाला. बाजीराव लौकिकानें गेला. आमची बाजू गेली या गोष्टीनें श्रम जाहाले. त्याचा विस्तार लिहिता फार आहे ! पत्रीं कोठवर लिहावा ? मातुश्री वेणुबाई काकीस वृध्दापकाळी महदु:ख जाहाले ! होणार बलवत्तर ! ईश्वरइच्छेस उपाय नाहीं ! ती॥ मातुश्रीचें समाधान करून परिमार्जन करावें. सारांश, विवेके करून दु:खाचा परिहार केला तरच होईल, अन्यथा होणार नाही. मातुश्री वडील आहेत. सर्वांचे समाधान करणे युक्त असे. वरकड गेली गोष्ट येतीशी नाहीं. चिरंजीव र॥ बापूजीराव व गंगोबा हे उभयता आह्माजवळ सुखरूप आहेत. त्यांचेविशी आपले समाधान असो देणें. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
पिलाजी गायकवाड याचा ज्येष्ठ पुत्र संभाजी गायकवाड कामास आला. समागमें पागा हुजरात होती. ती कामास आली. लेकवळे कामास आले. शिलेदार पथकें होती ती फितूर होऊन पेशवे मिळाली. पाणी पाजावयाचे मिसे चाळीस हजार फौज पळून गेली. उदाजी पवार मात्र कामास आले. सायंकाळ जाल्यावर नंतर पेशवे यांचे फौजेनें हत्ती सहा घटका रात्रीस मुडद्यासुध्दा लष्करात नेला. नंतर हे वर्तमान मागें यशवंतराव सेनाखासखेल यांसी सांडणीस्वार लढाई सुरू जाल्यावर रवाना जाला होता तो पोहोचल्यावर, कळले. ते फौजेनिशी तयार होऊन चढोन गेले. त्यांनी युद्धप्रसंग करून मुडदा व निशाणे वगैरे नेहली होतीं ती आणून, त्रिंबकराव सेनापति यांस अग्न देऊन, तैसेच पंतप्रधान यांचे मागें लागले. पेशवे पुढें पळो लागले. ते पुढे, हे मागें कूच दरकूच सातारियास दाखल जाले. बाजीराव पेशवे राजवाडयात जनानखान्यात लपोन राहिले आहेत व यशवंतराव सेनाखासखेल व सवाईबाबूराव दाभाडे मागें लागले आहेत. त्याजवरून राजश्री शाहू महाराज किल्ल्याचे दरवाजापाशी येऊन उभे राहिले. सेनाखासखेल व बाबूराव आले. त्यांस राजश्री यांणी आज्ञा केली की, तुह्मी माझा गळा कापून ब्राह्मणास मारणे, मी अपराधी आहे. ऐसे उत्तर महाराजांचे ऐकोन उभयतां बंधू कूच करोन रुसोन तळेगावी आले. मागे राजश्री तयारी करून समजाविशीकरिता तळेगावास आले. बोलण्या-चालण्याची तोड पडोन, राजश्रीस मेजवानी सवाई यांचे वाड्यात केली. तेथे मोहरांचा व रुपयांचा चौतरा करून वर राजश्रीस बसविले. ते समयीं राजश्रींनी गळयात पडदाळे व तरवार घालून, बाजीराव यास हातीं धरून, उमाबाईस बोलावून आणोन, पडदाळयांतील तरवार काढोन, बाईपुढे ठेवली, व बाजीराव याजला पायावर घातले, आणि बोलले कीं, तूं आपले हातें याचा गळा काप. नंतर समजूत पडली. परस्परे बहुमान दिल्हे. नंतर राजश्री यांणी कृपा करोन यशवंत दाभाडे यांस सेनापतीचं पद दिधले व सवाई बाबूराव दाभाडे यांस सेनाखासखेलचें पद दिधले. नंतर महाराज सातारियास गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
चकनामा इनामाचा शके १६२५ सुभानुनाम संवत्सरे माघ शुध्द २ भानुवासरे ते दिवशी खंडोजी बिन येसाजी पाटील दाभाडे मौजे तळेगाव तर्फ चाकण, सरकार जुन्नर, यांसी लिहून दिल्हा चकनामा ऐसाजे :- तुह्मांस महाराज राजश्री छत्रपतिस्वामी कृपाळू होऊन मौजेजकुरी इनाम जमीन चाहुर पांच दिल्ही. त्याचे आज्ञापत्र मौजेजकुरास सादर जालें ऐसाजे :- स्वस्तिश्री राज्याभिषेक १७, प्रजापतिनाम संवत्सरे, चैत्र शुध्द १४, सौम्यवासरे, आज्ञा केली ऐसीजे :-खंडोजी बिन येसाजी पाटील दाभाडे, मोकदम, मौजे तळेगांव तर्फ चाकण, सरकार जुन्नर, यांस महाराज कृपाळू होऊन मौजेजकुरी इनामजमीन चाहुर पांच रास दिल्हा असे. सदरहू इनाम वंशपरंपरेने खाणें. कोणीं हरकत करील त्यास श्री डोळेश्वराची शपथ असे, आणि बेताळिसा पूर्वजांची आण असे, गोहत्या ब्राह्मण हत्येचे पातक असे. हा इनामाचा चकनामा लिहून दिल्हा. खंडोजी दाभाडे यांस पुत्र तिघे, वडील त्रिंबकराव, मधले यशवंतराव, धाकटे सवाई बाबूराव, खंडेराव दाभाडे यांस मुतखडयाचे आजाराने मृत्यू आला. मौजे तळेगाव येथे थडगे आहे. त्यांचे मागे त्रिंबकराव दाभाडे यांस सेनापतीची वस्त्रे जालीं. कारकून मंडळीस वस्त्रे बरहुकूम खंडेराव दाभाडे यांचे कारकीर्दीस जाली त्याप्रमाणे जाली. ते समयी यशवंतराव यांस सेनाखासखेलीचीं वस्त्रें जालीं. नंतर त्रिंबकराव दाभाडे सेनापति गुजराथेंत मोहिमेस जात होते तेसमयीं बाजीराव बल्लाळ प्रधान यांणी डभईचे मुक्कामी युध्दप्रसंग केला. तेथें हत्तीचे पायीं अंदू घालून तुंबळ युध्द केले. प्रात:काळापासून अस्तनापर्यंत लढाई होत होती. त्या हत्तीवरील महावत गोळी लागोन मेला. नंतर खासे यांनी जातीनिशी तिरंदाजी करून युध्द केले. ते समयीं कमानीच्या चिल्याने बोटांची कातडी उडोन गेली. लढाई शिकस्त जाली. नंतर भावशिंगराव टोके यांचे बारगिरानें दगा करून जोड गोळया मारल्या. त्या मस्तकी बसल्या. त्यायोगे मृत्यू रणी हत्तीवर पावले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६७] श्रीमोरया.
वंशावळ : दाभाडे मोकद्दम, मौजे तळेगाव, त॥ चाकण, प्र॥ जुन्नर, सुभे खुजस्तेबुनियाद, मोकद्दमी तक्षीम चवथी मौजे मजकूरची, यांचा मूळ पुरुष बजाजी पाटील दाभाडे. त्यास पुत्र दोन, (१) येस पाटील दाभाडे, (२) सोमाजी दाभाडे. वडील येस पाटिल दाभाडे हे मोकद्दमी करीत होते. यांणीं राजाराम महाराज यांची सेवा केली. चंदीचे मुक्कामीं महाराजास पुत्र झाला ते समयी महाराज यांणीं पुत्रोत्साहात इनामजमीन मौजे तळेगाव येथे पांच चावर दिल्ही. त्याचे पूर्वी देखाजी दाभाडे यांची वांटणी होऊन महाराजाचे दरबारी फारकत्या जाल्या होत्या. पाटिलकीशी वारसा देखोजी पाटील यांचा नाहीं. येसपाटील यांस पुत्र दोघे, वडील खंडेराव व धाकटे शिवराव दाभाडे. शिवरावास संतान नाहीं. ते महाराज छत्रपति यांणी वऱ्हाडांत मोहिमेस पाठविले होते तेथे युध्दप्रसंग होऊन देवलोकास गेले. वडील खंडेराव दाभाडे यांणी राजश्री राजाराम महाराज व संभाजी महाराज यांची सेवा निष्ठेने केली. ते समयी स्वामी कृपाळू होऊन पहिले अठरा कारखाने यांची हवालदारी दिल्ही. पुढेहि सेवा निष्ठेने करीत गेले. नंतर स्वामी कृपाळू सेनाखासखेल हें पद दिल्हें व इनाम वतनबाब सेवेप्रमाणें देत गेले. नंतर राजश्री शाहू महाराज स्वराज्यांत दिल्लीहून आले. त्यांचेही कारकीर्दीस सेवा निष्ठेनें करीत गेले. तेव्हा स्वामी कृपाळू होऊन स्वराज्यातील सेनापति व सेनाखासखेल ही दोन्ही पदें दिल्ही. जरीपटका, चौघडा, हत्ती, घोडा, पागा, शिकेकटार, पालखी, पांची वस्त्रे, शिरपेच, चौकडा, कठी, तुरा, कडी, बहुमानपुरस्सर दिल्हें, दोन्ही पदांचे कारकून नेमिले, बितपशील.
नि॥ सेनापति | नि॥ सेनाखासखेल |
१. मजमदार, भास्करराव, नारोराम मंत्री यांचे बंधू. |
१. मजमदार, कोन्हेरपंत. |
१. फडनीस, नारो गोविंद नारुळकर. | १. दिवाण, जिवाजी गोविंद. |
१. चिटणवीस, शामराव कान्होजी गपचुप. |
१. फडणीस, खंडेराव दाभाडे सेनाखासखेल. |
१. कापडणीस, नारो बल्लाळ कानविंदे | १. चिटणवीस, देवराव. |
२. दफतरदार १. चिमणाजी काबू. १. गणोबा काळेकर. ---- २ |
१. पोतनीस, खंडेराव दाभाडे, सेनाखासखेल. |
१ पोतनीस, खंडेराव दाभाडे सेनापति. | १. जमेनीस पिलाजी परभू. |
१ जमेनीस, खंडोबा बाजी परभू. | १. सबनीस, रखमाजी शिवदेव बेहरे. |
१ सबनीस, चंदो यशवंत. | १. पागनीस कोन्हेरपंत मजमदार. |
१ जमेचे मजमदार, रामचंद्र दादाजी बरेकर | |
१ पागनीस, राघो रामचंद्र मेणकर | |
४ शागीर्द पेशा. १ पीलखान्यातकडील हवालदार भानू. १ पखाली फतू १ नालबंद, माणीक १ भालदार, तय्यब. ------ ४ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६६] श्री.
हकीगत : आपले वडील मल्हार गोविंद व विनायक नारायण व गणेश नारायण धडफळे, वास्तव्य कसबे पुणे यांचे वेळेस श्रीमंत राजश्री बाजीराव बल्लाळ प्रधान पेशवे यांस मौजे हिंगणगांव त॥ सांडस प्र॥ पुणे येथे दजी थोरात, पुंड, मवाशी, गढी बांधोन राहात होता, त्यानें तीस कोस धावणे करून, छापा घालून, श्रीमंत पेशवे यांस व अंबाजीपंत पुरंदरे यांस धरून, हिंगणगावचे गढीमध्ये नेऊन अटकेस ठेविले. तजदी बहुत केली. तेवेळेस आपले वडील त्रिवर्ग यांणीं बहुत कष्ट मेहनत करून श्रीमंतांस मंडळीसुध्दा गढीबाहेर काढून अटकेंतून मोकळे केले. मग श्रीमंत आपले फौजेत जाऊन जमाव करून राहिले. नंतर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ प्रधान कैलासवासी, यांणी सैदाची कुमक मदतीस आणून, तोफांसह वर्तमान हिंगणगावावर जाऊन, दमाजी थोरात व त्याचा कारभारी येसमाळी बोरीकर यांस धरून कैद केले. बेडया घालून किल्ले पुरंदरास ठेविले. गढी पाडून नदीत टाकिली. हिंगणगावच्या पांढरीवर खराचा नांगर फिरविला. पुढे श्रीमंत पुण्यास आले तेव्हा धडफळे मशारनिल्हे यांचे वाडयांत येऊन राहिले. धडफळयावर मेहेरबानी श्रीमंतांची बहुत, यामुळें अडीच तीन वर्षे पुण्यांत आले ह्मणजे धडफळयाचे घरी राहावें. नंतर बाजीराव यांणी खाजगत वाडा पुण्यांत बांधावयास जागा शेक सादात पीरयाचे दक्षिणेस घेऊन त्या जाग्यावर नऊ बुरुजी वाडा, मोठा कुसूं घालून बांधिला. मग तेथे राहूं लागले. धडफळे बहुत प्रकारें सरकार कामकाजास पडले, सबब श्रीमंत बाजीराव पेशवे कृपावत होऊन, धडफळयास इनाम जमीन वंशपरंपरा देऊन इनामपत्रे करून दिल्ही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६५] श्री. १२ जानेवारी १७५१.
आशीर्वाद उपरी. श्रीमंताची दोन जोडी आह्माकडे आली कीं तुह्मांकडे ऐवज अखेर साल त॥ आठ नवलाख रुपये राहतात, त्यास, तूर्त राजेहि मातुश्री ताराबाईनें अटकाविले, दाभाडियासीहि स्नेह ठीक आला नाहीं. फौज तो धरली पाहिजे. फौजेचे समाजाविशीस पांच सात लाख रुपये कमी आले, त्यास तुह्मी यासमयीं ऐवजाची मदत करणें, ह्मणून आज्ञा आली. त्यास खावंदांनीं दोन जोडी पाठविली. दोनवेळ तेंच लिहिले. त्यास कांहीं न दिल्हें तर कार्यास न ये. आमचा सर्वांचा विचार ह्मणावा तर सालगु॥ बाकी तिसरा हिस्सा राहिला. हालसाल मिळोन निमे साल जालें. परंतु सवंगाईमुळे पैसा वसूल होत नाहीं. रयत बटाई घ्या ह्मणते; नाहीं तर पळोन जातात. पैसा उगवत नाहीं. याप्रकारें येथील फजिती आहे. कांही लिहिता पुरवत नाहीं. बुंदेलखंडी चार लाख रुपये कर्ज देणें ते अद्याप वारत नाहीं. शहरी देणें तें तसेच. श्री काशीमध्यें हुंडी केली. तेथे ऐवज तूर्त न मिळे. तेव्हा तेथे कर्ज घेणे लागले. असा प्रसंग ईश्वरे पाडिला. परंतु केवळ हौष. खावंदास लिहिले तर तेही श्रमी होतील. याजकरितां येणे प्र॥ तूर्त तजविजेने श्रीमंतास विनंति करून हें वर्तमान सर्व विदित करून येणेप्रमाणें ठहरावणें.
उदमी, कापडकरी यांची वरात केली. साठ बासष्ट हजारांत कबूल करणे. ते रुपये देणें. ऐवज लाऊन, पाठवून दिल्हाच आहे. कलम १. |
सरकारी दोन लाख रुपये तूर्त मागतात. त्यास, लाख रुपये तूर्त कबूल करणे. त्याजपैकी तुह्मांजवळ ऐवज असेल तो देणे. बाकी भरीस ऐवज शहरी जोशीबावा पासून घेऊन जाणे. तूर्त दरबारचा विचार राखणे. १. |
आजी दोन महिने दरबारचे वर्तमान कळत नाही. तर ऐसे करीत न जाणे. वरचेवर वर्तमान लिहीत जाणे. सातारा मातोश्री ताराबाईंनी फितूर केला. राजे किल्लेयावर नेले. त्यास, पुढें ताराबाई काय करितात? व श्रीमंतांनी काय केले? यमाजीपंत श्रीमंतांकडे आला किंवा मातोश्री ताराबाईंकडे गेला ? ताराबाईंचे फितुरांत कोण कोण आहेत ? तें सविस्तर लिहिणें. सारांश, वर्तमान पंधरा रोजांचे पंधरा रोजांत वर्तमान लिहीत जाणे. |
येथे धरणींपारणीं सावकाराचीं होऊ लागली. अशी गत कधीं न जाली. येथील आह्मी हरकसें संभाळूं. परंतु श्रीमंतांनीं लिहिले त्यास उपाय नाही, याजकरिता लाख रुपये कबूल करून देणे. १. सातारा मातोश्रींनीं गडबड केली. त्यास, श्रीमंतांनी त्यांची विचारणा काय केली? ते लिहिणे. १. |
मित्ती माघ वद्य ११. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६३] श्री. १२ जानेवारी १७५१.
आशीर्वाद उपरी. तुह्मी हुंडी केली त्याप्रमाणें हुंडी सर्वची करून दिली. जे जबाबी होती तेही पाठविली. जबाब श्रीचे येतांच पाठवून. पठाणाचा व वजिराचा हर्षामर्ष, मार्ग चालत नाहीं, ऐवज परम संकटें श्रीस पावतो. हल्लीशिक्केयासी भाव श्रीमध्यें दरसद्दे रुपये पांच जाले आहेत. याजकरितां कांही हुंडणावळ मिळेल तर घेत जाणें. पठाणांनीं बहुत धूम केली आहे. चहूंकडे मोठा दंगा आहे. राजे ईश्वरसिंग विष भक्षिलें, मेले. राज्य माधोसिंगास दिल्हे. श्रीमंताचें पुण्य समर्थ ! नासरजंगासारखा रिपु अनायासें वारला ! दाभाडियाची कितेक गौरीच आहे. गडकिल्ला त्याजकडे नाहीं. त्याचे हातें कांहीं होत नाहीं. त्यास, जें वर्तमान होत जाईल तें लिहीत जाणें. मातोश्री ताराबाईंनी मनसुबा काय योजिला आहे तें लिहिणें. तिणें त्याप्रमाणें मनसुबा केला ! पुढें श्रीमंतांनीं काय योजना केली तें लिहिणें. वरचेवर साद्यंत वर्तमान लिहीत जाणें. गडबडेचा प्रसंग आहे, याजकरितां वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. मीरखान, जगदळे, अद्याप आले नाहींत. येथे फौजेविना काम होत नाहीं. रांगडे लोक ! रांगडी रयत ! ते कोठे आहेत हेहि कळत नाहीं. देशी असिलें तर श्रीमंताकरवीं ताकीद करवणें. आह्मी याजउपरी यमुनातीर प्रांतें जाऊन. पैसा कोठीलही वसूल होत नाहीं. जान विकत नाहीं असे परम संकट आहे. नासरजंग वारलेयावर कोण नवाब जाले ? श्रीमंताशीं त्यांशी कसे सख्य आहे तें लिहिणे. ताराबाई यांहीं संभाजीराजे यांशी पैगाम केला आहे किंवा काय ? तें लिहिणें. सारांश, वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. ताराबाईजवळ कोण कोण फितुरांत आहे तेहि लिहिणें. दाभाडियांशी सलूखच होईल. त्यास, श्रीमंतांशी व दाभाडियांशी सलूख जालियावर श्रीमंत कोणीकडे जाणार, काय मनसुबा, तो लिहिणें. सातारा कांही श्रीमंताची फौज आहे किंवा नाहीं, तें लिहिणें. मित्ती वाघ वद्य ११. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.
[१६४] श्री. १२ जानेवारी १७५१.
चिरंजीव राजश्री बाबूराव यासी गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरी. पेशजी तुह्मांस लिहिले होते जे प्रीथीसिंगास चाकरीस येणे ह्मणोन. त्यास, तुह्मी सातारा गेला होता. त्यास, हालीं तुह्मी श्रीमंताजवळ आला असाल. त्यास, एक थैली श्रीमंताचे नावें राजे प्रीथसिंग याजला पाठविणें जे प्रस्तुत फौजेचें जरूर कामकाज आहे. त्यास, तुह्मी आपले फौजेनसी खासापंताजवळ जाऊन सामील होणें, विलंब न करणें, ह्मणून पत्र जरूर पाठविणें. वरचेवर दरबारचे वर्तमान लिहीत जाणें. मित्ती माघ वद्य ११. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.