[१६७] श्रीमोरया.
वंशावळ : दाभाडे मोकद्दम, मौजे तळेगाव, त॥ चाकण, प्र॥ जुन्नर, सुभे खुजस्तेबुनियाद, मोकद्दमी तक्षीम चवथी मौजे मजकूरची, यांचा मूळ पुरुष बजाजी पाटील दाभाडे. त्यास पुत्र दोन, (१) येस पाटील दाभाडे, (२) सोमाजी दाभाडे. वडील येस पाटिल दाभाडे हे मोकद्दमी करीत होते. यांणीं राजाराम महाराज यांची सेवा केली. चंदीचे मुक्कामीं महाराजास पुत्र झाला ते समयी महाराज यांणीं पुत्रोत्साहात इनामजमीन मौजे तळेगाव येथे पांच चावर दिल्ही. त्याचे पूर्वी देखाजी दाभाडे यांची वांटणी होऊन महाराजाचे दरबारी फारकत्या जाल्या होत्या. पाटिलकीशी वारसा देखोजी पाटील यांचा नाहीं. येसपाटील यांस पुत्र दोघे, वडील खंडेराव व धाकटे शिवराव दाभाडे. शिवरावास संतान नाहीं. ते महाराज छत्रपति यांणी वऱ्हाडांत मोहिमेस पाठविले होते तेथे युध्दप्रसंग होऊन देवलोकास गेले. वडील खंडेराव दाभाडे यांणी राजश्री राजाराम महाराज व संभाजी महाराज यांची सेवा निष्ठेने केली. ते समयी स्वामी कृपाळू होऊन पहिले अठरा कारखाने यांची हवालदारी दिल्ही. पुढेहि सेवा निष्ठेने करीत गेले. नंतर स्वामी कृपाळू सेनाखासखेल हें पद दिल्हें व इनाम वतनबाब सेवेप्रमाणें देत गेले. नंतर राजश्री शाहू महाराज स्वराज्यांत दिल्लीहून आले. त्यांचेही कारकीर्दीस सेवा निष्ठेनें करीत गेले. तेव्हा स्वामी कृपाळू होऊन स्वराज्यातील सेनापति व सेनाखासखेल ही दोन्ही पदें दिल्ही. जरीपटका, चौघडा, हत्ती, घोडा, पागा, शिकेकटार, पालखी, पांची वस्त्रे, शिरपेच, चौकडा, कठी, तुरा, कडी, बहुमानपुरस्सर दिल्हें, दोन्ही पदांचे कारकून नेमिले, बितपशील.
नि॥ सेनापति | नि॥ सेनाखासखेल |
१. मजमदार, भास्करराव, नारोराम मंत्री यांचे बंधू. |
१. मजमदार, कोन्हेरपंत. |
१. फडनीस, नारो गोविंद नारुळकर. | १. दिवाण, जिवाजी गोविंद. |
१. चिटणवीस, शामराव कान्होजी गपचुप. |
१. फडणीस, खंडेराव दाभाडे सेनाखासखेल. |
१. कापडणीस, नारो बल्लाळ कानविंदे | १. चिटणवीस, देवराव. |
२. दफतरदार १. चिमणाजी काबू. १. गणोबा काळेकर. ---- २ |
१. पोतनीस, खंडेराव दाभाडे, सेनाखासखेल. |
१ पोतनीस, खंडेराव दाभाडे सेनापति. | १. जमेनीस पिलाजी परभू. |
१ जमेनीस, खंडोबा बाजी परभू. | १. सबनीस, रखमाजी शिवदेव बेहरे. |
१ सबनीस, चंदो यशवंत. | १. पागनीस कोन्हेरपंत मजमदार. |
१ जमेचे मजमदार, रामचंद्र दादाजी बरेकर | |
१ पागनीस, राघो रामचंद्र मेणकर | |
४ शागीर्द पेशा. १ पीलखान्यातकडील हवालदार भानू. १ पखाली फतू १ नालबंद, माणीक १ भालदार, तय्यब. ------ ४ |