Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कोंगाडा [(कुह् to deceive) कोहट: किंवा कुहट: = कोघडा = कोगाडा = कोंगडा ] deceitful.
कोंच [ कूर्च = कोंच ] (स. मं. )
कोटिंबें [ कुटांबुकं = कोटंबें, कोटिंबें ] कुट म्ह० घडा, त्यांतील पाणी पडण्याची नाळी.
कोठचा [ क्वत्य = कोठच (चा-ची-चें ) ]
कोठचें - कुतस्त्यं = कोठचें. अंतःस्थं = आंतचें.
अत्रत्यं = एथचें. बहिस्थं = बाहेरचें.
तत्रत्र्यं = तेथचें गृहस्थं = घरचें.
मध्यस्थं = मधचें.
कोठार [ कूटागार = कोठार ] कूटागाराः सुवर्णखचिता दृश्यन्ते स्म । ( कारंडव्यूह ) (भा. इ. १८३४)
कोठावणें [ कुत्रापयति = कुठ्ठावे = कोठावे. कुत्रापनं = कोठावणें ] कोठावणें म्ह० कोठें जातोस म्हणून विचारणें. कथादीनां सर्वेषां पुकं आह शाकटायनः (भा. इ. १८३३)
कोठी [ कुटि: ( सभा) = कोठी ] संस्थानांतून office या अर्थी कोठी शब्द योजतात.
कोड १ [ कोट = कोड ] त्वक्पुष्पं कोटस्तुमंडलं ॥ (केयदेव-पथ्यापथ्यविबोध).
-२ [ कुड्यं Curiosity = कोड ] कोड पुरविणें to satisfy curiosity.
-३ [ कौतुक = कोडुअ = कोड ] कोड पुरविणें म्ह० कौतुक पुरविणें. कोडकौतुक असा जोड शब्द हि आहे. फारसी व मराठी असे जोड शब्द मराठींत पुष्कळ आहेत. परंतु प्राकृत व संस्कृत असे जोड शब्द मराठींत विरळा सांपडतात. पैकीं हा एक आहे. (भा. इ. १८३५)
कोंड [ कुंड् रक्षणे. कुंड्य = कोंड ] दक्षणेकरितां ब्राह्मण कोंडणें म्ह० बंदोबस्तानें राखून ठेवणें. ( धा. सा. श.)
कोडगा १ [ कूटक: = कोडगा ]
-२ [ कृतघ्नः = कडगा = कोडगा ]
कोंडगोळें [ कुंडगोलकत्वं ] ( कुंडगुळें पहा)
कोंडवाडा [ कुंडवाट ] गुरें राखण्याची जागा. ( धातु कोश-कोंड ६ पहा)
कोंडा [ कुट्टः ( ज्ञा. अ. ९ पृ. ३४ )
कोंडाळे १ [ कुंडलं = कोंडळें = कोंडाळें ]
-२ [ कुंडालयं = कोंडाळे ]
कोंडी [ कुंडिका = कोंडी ] कोंडी फोडणें-रक्षिलेली जागा भेदणें ( धातुकोश कोंड ६ पहा)