Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुत्रा, कुत्री, कुत्रें - संस्कृतांत कुक्कुरः ( रः, री, रें ) असा शब्द उपलब्ध आहे. त्यापासून कुकरा, कुक्रा असा अपभ्रंश मराठींत व्हावा परंतु कुत्रा असा अपभ्रंश मराठींत रूढ आहे. हिंदीत कुत्ता असा अपभ्रंश आहे. ह्या वरून एक च अनुमान करावें लागतें. तें हें कीं संस्कृतसमकालीन प्रांतिक संस्कृतसम भाषांत कुत्तुरः किंवा कुत्तर: असा शब्द रूढ असावा. बहुशः संस्कृतांतच कुत्तर: असा शब्द असावा. कुत्र्यांचीं पिलें कु कु असा शब्द करतात त्यावरून त्यांना हाका मारतांना कु कु अशी हाक आपण मराठे मारतों. ही कु कु हाक मराठ्यांनीं अलीकडे नव्यानेंच उत्पन्न केली व प्रचारांत आणिली असें म्हणण्यास कांहींच पुरावा नाहीं. ही हाक आपण महाराष्ट्रींतून व महाराष्ट्रीनें संस्कृतांतून वंशपरंपरेनें घेतली असली पाहिजे, हें निश्चित आहे. कां कीं कुक्कुर शब्दांत हि पहिला अवयव कु आहे व दुसरा अवयव हि कु च आहे. हा कुक्कुर शब्द संस्कृतांत हि अपभ्रंश च आहे. मुळांत हा शब्द कुकुकर: असा होता. त्याचा संक्षिप्त उच्चार कुक्करः असा संस्कृतांत रूढ झाला इतकें च. वैदिक पूर्वभाषेंत हा कुकुकर: शब्द असावा व त्या पूर्वीच्या भाषेंत नुसत्या कु ह्या शब्दानेंच श्वन् या अर्थाचा बोध होत असावा. तो कु शब्द प्रांतिक संस्कृत भाषांत राहिला. ज्याप्रमाणें अश्व पासून अश्वतर, गु पासून गुतर (गुरूं), महिष पासून महिषतर (म्हसरूं) हे शब्द र्हस्वत्वदर्शक होतात, त्याप्रमाणें च कु शब्दा पासून र्हस्वत्वदर्शक शब्द कुतर हा होतो. त्या कुतर: ह्या प्रांतिक संस्कृत शब्दापासून मराठी कुतरा, कुत्रा हा शब्द निष्पन्न होतो. कुत्र, कुतर हें मूळ रूप-त्याचीं तिन्हीं लिंगीं कुत्रा, कुत्री, कुत्रें अशीं मराठींत रूपें होतात व प्रांतिक संस्कृतांत कुतर, कुतरी, कुतरं अशीं रूपें होतात. कोशांत कुतर, कुत्र असा अकारांत शब्द दिला पाहिजे व त्याचीं तिन्हीं लिंगीं कुत्रा, कुत्री, कुत्रें अशीं रूपें होतात असें दर्शविलें पाहिजे. ( भा. इ. १८३६)
कुथणें [ कुथ् पूतीभावे, दौर्गंध्ये] शरीरांत दौर्गंध्य होतांना जो शब्द मनुष्य करतें तें. (ग्रंथमाला)
कुंदा [ स्कुद: ( स्कुंन्द् to jump स्कुंदते ) = कुंदा ] कुस्तींतील एक पकड (पेच) आहे.
कुन्हा १ [ क्नस् ४ ह्वरणे ] (धातुकोश-खुनस २ पहा )
-२ [कुहना (मिथ्येर्यापथकल्पना) = कुन्हा ]
कुपी [ कूपी ( a bottle ) = कुपी ] ( भा. इ. १८३६) ना. को. ६