Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कुबड [ कुब्ज + अस्थि = कुब्ब + हाड = कुबाड = कुबड ] (स. मं. )
कुबडा १ [ कूबरः ( कुब्जः ) = कुबडा ] कुब्जपासून कुबडा निष्पादण्याची जरूर नाहीं.
-२ [ कुब्जट: = कुबडा ] (खुजा १ पहा)
कुबडी [ कुब्जयष्टि = कुबडी ] कुबड्याची काठी.
कुंबा [ कुंभः a pot = कुंबा = (चांभाराचा) ]
कुंभा [ कुंभ (योनिः) = कुंभा (देवकुंभा)] (भा. इ. १८३४)
कुभांड [कुष्मांडं (खोटी कल्पना) = कुब्भांड = कुभांड ]
कुंभारमाशी, कुंभारीण [ कुंभीरमक्षिका ]
कुयाड [ कुयं ह वै नाम कुत्सितं भवति । उत्तरगोपथत्राह्मणषष्ठः प्रपाठकः । ] कुयाड या शब्दांतील आड प्रत्यय आढ्यदर्शक आहे. हें कुयाड काय आहे ? म्हणजे ही कुत्सित अनिष्ट गोष्ट काय आहे ? ( भा. इ. १८३४)
कुरकुर [ कुर (आवाज करणें ) ( पुनरुक्त) कुरकुर. कुर म्हणजे शोकाचा, तक्रारीचा आवाज करणें. कुर शब्दे असा पाणिनि सामान्य अर्थ देईल. परंतु मराठी अर्थावरून दिसतें कीं, मूळ संस्कृत अर्थ शोकस्वर असा होता.] (भा. इ. १८३५)
कुरकुरणें [ कुर शब्दे. कुरकुर (द्वित्व).] 'कुर शब्दे' असा सामान्य अर्थ पाणिनिधातुपाठांत दिलेला आहे; परंतु मराठींत कुरकुरणें म्ह० तक्रारीचा किंवा नापसंतीचा शब्द काढणें असा ज्या अर्थी अर्थ प्रचलित आहे, त्या अर्थी संस्कृतांत कुर म्हणजे तक्रारीचा शब्द करणें असा अर्थ असावा, नव्हे होता, असें म्हणावें लागतें. कुररी हा शब्द कुर ह्या धातूपासून संस्कृतांत निघाला आहे. कुररीप्रमाणें शब्द करणें म्हणजे दुःखाचा, नापसंतीचा शब्द करणें. (भा. इ. १८३५)
कुरकुली [ कर्करी = करकली = कुरकुली ] संस्कृतांत कर्करी म्ह० रोंवळी. रोंवळीसारखें वेळूंच्या पत्र्यांचें बनाविलेलें जें पात्र तें कुरकुली. लहानगी फुलांची टोपली. (भा. इ. १८३६)
कुरघोडी [ कुमारघोटिका = कुंवरघोडी = कुरघोडी ] कुमारघोटिका हा पाणिनिकालीन आर्यांत मुलांचा खेळ असे. त्यांत ज्या मुला वर डाव येई त्याला घोडा करीत व त्याच्या पाठीवर घोड्यावर बसतात तसें बसून विजयी पक्षांतील मुलें विवक्षित मर्यादेपर्यंत फिरत.
कुरड, कुरडणें [ कुड् ( खाणें ) = कुरड, कुरडणें ] (भा. इ. १८३३)