Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ख
खइ [ क्षति ] तुला खइ लागली. (खय पहा)
खंगणें [ क्षंजनं - खँगणें. क्षंजनं = खँचणें. ज = ग. ज = च ] (भा. इ. १८३५)
खचणें [ क्षंजनं = खँचणें ] ( खंगणें पहा)
खचित् १ [ खलुचित = खलचित्= खचित् (खरोखर) ( अव्यय ) ] (भा. इ. १८३६)
-२ [ खलुचित् = खचित् ]
खचून [ खच् (बांधणें, एकावर एक जडवणें). खचित्वा = खचून भरणें, खचून मारणें, जेवणें इ. इ. इ. शेवटीं खचन म्हणजे अति पुष्कळ.
खच्ची [क्षय्यः (शक्य क्षेतुं)= खच्ची] क्षय करण्यास शक्य.
खंजीर [ खङ्गजीर: = खज्जीर: = खंजीर ] खड्गविशेष.
जीरखड्गे वाणिग्भेदे (विश्वकोश).
खट १ [ क्षतं = खट (न. ) ] खट म्ह० खवडा, क्षत. खट झालें म्हणजे खवडा, क्षत. डोईला खटें झालीं म्हणजे क्षतें झालीं.
-२ [क्षत wound = खट wound] डोक्याला खटें पडलीं.
खटरूट [ खट्वारूढः (जाल्मः) =खटरूट] निंद्य माणूस.
खटकन्, खटदिनि [ चटकर पहा ]
खटनट [ खट कांक्षायां व नट नृतौ ] हा शब्द महाराष्ट्रांत सामान्य स्त्रीपुरुषांच्या बोलण्यांत हमेश येतो. (भा. इ. १८३२)
खटपट [ खाट् कृत्य प्याट् कृत्य किंवा पाट् कृत्य. ह्या शब्दांत खाट् व पाट् हे अवयवशब्द आहेत. ह्यापासून खाटपाट = खटपट हा मराठी शब्द निघाला आहे. ] ( भा. इ. १८३६ )
खटारा - हा शब्द पुष्कळ वर्षे व पुष्कळांनीं भोगून खिळखिळी झालेल्या बायकोला लावतात. क्षत्ता स्यात् सारथौ दाःस्थे वैश्यायामपि शूद्रजे ( भट्टोजी, उणादि २५९) क्षत्तृ = क्षत्तार = खट्टार ( खटारा ) क प्रत्यय = अ. आपल्या म्हातार्या बायकोला विनोदानें खटारा म्हणण्याची चाल महाराष्ट्रांत अशिष्ट ब्राह्मणांत आहे. (भा. इ. १८३३)
खट्याळ १ [ खट + आल = खटाळ = खट्याळ ] ( भा. इ. १८३२ )
-२ [ खट्वारूढः = खट्यालू = खट्याळ. खट्वाक्षेपे २-१-२६ ] going astray.
खंड [ स्कन्ध् १ संचये ] ( धातुकोश-खंड २ पहा)
खडखडणें [ खड् मंथे घुसळण्यासारखा हलवून नाद करणें] ( ग्रंथमाला)
खडखडून १ [ खटखटयित्वा = खडखडून] खटखटाय म्हणजे शब्द करून उठणें. खडखडून जागें होणें म्हणजे शब्द करून व उठून जागें होणें. (भा. इ. १८३६)
-२ [खटखटायते] (धातुकोश-खडखड २ पहा]
खंडलमंडल [ खंडल ( खंड् to break ) मंडल ( to construct) म्हणजे मोडजोड, मोडजोड. Distruction and construction ]